Jaisalmer Fort History
भारतात अश्या अनेक ऐतिहासीक वास्तु आहेत की ज्यांना त्यांच्या अद्भुत बांधकामामुळे आणि अनोख्या वास्तुशिल्पामुळे वैश्विक वास्तुंच्या यादीत सहभागी करण्यात आले आहे. अगदी अश्याच वास्तुंपैकी एक किल्ला राजस्थानात आहे – ’’जैसलमेर किल्ला’’ जो अनेक वैशिष्टयांमुळे ओळखल्या जातो. हा किल्ला जगातील सर्वात मोठया किल्ल्यांपैकी एक आहे आणि आपल्या बांधकामामुळे आणि काही विशेष वैशिष्टयांमुळे इतर किल्ल्यांपेक्षा एकदम वेगळा आहे.
या किल्ल्याच्या आत अतिशय आकर्षक आणि सुरेख हवेली, मोठ मोठे भवन, व्यापार्यांचे आणि सैनिकांचे सुबक निवासस्थान परिसर आणि भव्य मंदिरं देखील आहेत. आणि या वास्तुच या किल्ल्याला इतर किल्ल्यांपेक्षा वेगळी ओळख देतात.
जैसलमेर येथील हा भव्य किल्ला कित्येक मोठया युध्दांचा साक्षिदार राहीला आहे. या विशाल किल्ल्याने स्वातंत्र्या नंतर 1965 ते 1971 दरम्यान झालेल्या भारत-पाक युध्दात लाखो लोकांना सरंक्षण देऊन आपली महत्वपुर्ण भुमिका पार पाडली होती. इतकेच नव्हे तर हा किल्ला आपल्या अद्भुत वास्तुकलेमुळे देखील प्रसिध्दीस आला आहे.
जैसलमेर किल्ला भारतीय, ईस्लामी आणि फारशी वास्तुशैलीचे अनोखे उदाहरण आहे. किल्ल्याच्या बांधकामात पिवळया रंगाचे दगड आणि रेती वापरण्यात आली आहे त्यामुळे या किल्ल्याचा रंग पिवळा आणि सोनेरी दिसतो त्यामुळे हा किल्ला लांबुन चमकदार दिसतो.
हा किल्ला अतिशय आकर्षक, भव्य आणि मनोहारी दिसतो. या किल्ल्याला गोल्डन फोर्ट आणि सोनार दुर्ग या नावांनी देखील ओळखल्या जाते. आपल्या भव्यतेमुळे आणि सौंदर्यामुळे हा किल्ला राजस्थानातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इतिहासात देखील या किल्ल्याचे आपले असे आगळे वेगळे महत्व आहे, चला तर जाणुन घेउया वैश्विक वास्तुंमधल्या सुचींमध्ये आपले नाव कोरणाऱ्या या जैसलमेर किल्ल्याविषयी….
जैसलमेर किल्ल्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Jaisalmer Fort Information in Marathi
भारतातील विशाल जैसलमेर किल्ला राजस्थानातील जैसलमेर इथे थार मरूस्थलाच्या त्रिकुटा पर्वतावर स्थित आहे. इसवीसन 1156 मध्ये राजपुत योध्दा ’’रावल जैसल’’ यांनी हा किल्ला बनविला होता. हा किल्ला अनेक महत्वपुर्ण आणि ऐतिहासिक युध्दांची साक्ष देत आजही उभा आहे. या किल्ल्याच्या निर्मीती संदर्भात अनेक ऐतिहासीक घटना जोडल्या गेल्या आहेत.
ईतिहासकारांच्या मते गौरचा सुल्तान उद दीन मुहम्मद याने आपल्या प्रदेशाचे रक्षण करण्याकरता राजपुत शासक रावल जैसल ला एका षडयंत्रात अडकविले आणि त्यावर आक्रमण करून किल्ल्यावर ताबा मिळवीला
त्याने या किल्ल्यात राहणाऱ्या लोकांना बळजबरीने बाहेर काढले आणि या किल्ल्याला पुर्णपणे उध्वस्त करून टाकले. पुढे सम्राट जैसल ने त्रिकुटा पहाडावर नवा किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला त्याकरता त्यांनी प्रथम जैसलमेर शहराचा पाया रचला आणि त्याला आपली राजधानी म्हणुन घोषीत केले.
परंतु त्यानंतर देखील राजा रावल जैसलचा या किल्ल्यावर अधिकार राहीला नाही. ईसवीसन 1293-94 मधे राजा जैसलचा त्यावेळी दिल्लीवर राज्य करणाऱ्या सुल्तान अलाउद्दीन खिलजी समवेत संघर्ष झाला. त्यात राजपुत शासक रावल जैसल ला पराजयाचा सामना करावा लागला. या पराजयानंतर सुल्तान अल्लाउद्दीन खिलजीने जैसलमेर येथील किल्ल्यावर आपला कब्जा मिळवीला व जवळजवळ 9 वर्ष या किल्ल्यावर आपले शासन चालविले.
त्यानंतर जैसलमेर किल्ल्यावर दुसरा हल्ला मुगल सम्राट हुमायूं ने इसवीसन 1541 ला केला. राजा रावल ने मुगल शासकांच्या शक्ती आणि ताकदीला ओळखुन मोघलांसमवेत मैत्री करण्याचा निर्णय घेतला व मोघलांसोबत आपले संबंध घट्ट होण्याकरता आपल्या मुलीचा विवाह मोगल सम्राट अकबराशी लावुन दिला.
या किल्ल्यावर ईसवीसन 1762 पर्यंत मोघलांचे शासन राहीले त्यानंतर जैसलमेर किल्ल्यावर मुलराज महाराज यांनी आपला अधिकार स्थापीत केला. ईसवीसन 1820 मध्ये मुलराज यांच्या मृत्युनंतर त्यांच्या नातवाने गजसिंह ने जैसलमेर च्या या भव्य किल्ल्यावर कब्जा केला.
भारत पाक युध्दादरम्यान जैसलमेर किल्ल्याने दिली अनेक लोकांना शरण:
ज्या तऱ्हेने भारतावर ब्रिटीशांनी आपले शासन चालविले आणि मुंबईच्या बंदरांवर समुद्री व्यापार सुरू केला. अश्यात मुंबईची फार भरभराट झाली परंतु जैसलमेरची अवस्था मात्र हालाखीची होत गेली.
तिकडे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि पाक यांच्यात फाळणी झाली परंतु पाकिस्तानने आपल्या क्रुर आणि दृष्टी हेतंुना घेऊन भारतावर सुरूवातीला 1965 ला आणि त्यानंतर 1971 ला हल्ला केला परंतु या युध्दात भारताच्या विर सुपुत्रांनी पाकिस्तान ला धुळ चारली.
भारत पाक चे हे युध्द जैसलमेर च्या धरतीवर लढण्यात आले अश्यात या युध्दा दरम्यान तेथील लोकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने जैसलमेर येथील संपुर्ण नागरिकांना या भव्य किल्ल्यात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
वास्तविक जैसलमेरचा किल्ला इतका भव्य आणि विशाल आहे की त्या सुमारास जवळपास 5000 लोक त्या किल्ल्यात वास्तव्य करू शकत होते. अश्या तऱ्हेने जैसलमेर च्या या ऐतिहासीक किल्ल्याने भारत पाक युध्दादरम्यान आपले दायित्व आणि जवाबदारी ओळखुन असंख्य शरणार्थिंचे रक्षण केले होते.
जैसलमेर किल्ल्याची वैशिष्टयपुर्ण वास्तुकला – Jaisalmer Fort Architecture
राजस्थानातील जैसलमेर स्थित या किल्ल्याचे केवळ ऐतिहासीक महत्व आहे असे नव्हें तर हा किल्ला आपल्या अनोख्या आणि भक्कम वास्तुकलेमुळे देखील जगभरात प्रसिध्द आहे. या किल्ल्याची निर्मीती म्हणजे भारतीय, इस्लामी आणि फारशी वास्तुशैलीचा सुरेख आणि आश्चर्यजनक मिलाप आहे.
या किल्ल्याच्या निर्माणकार्यात पिवळया रंगाची रेती आणि पिवळया रंगाच्या दगडांचा उपयोग करण्यात आला आहे. दिवसा ज्यावेळी सुर्याची किरणं या किल्ल्यावर पडतात तेव्हां हा किल्ला सोन्यासारखा चमकतो आणि म्हणुन त्याला गोल्डन फोर्ट आणि सोनार दुर्ग देखील म्हंटल्या जातं. या किल्ल्याचे सौंदर्य पाहाण्याकरता देशातीलच नव्हें तर परदेशातील विदेशी पर्यटक देखील येत असतात.
जवळपास 76 मीटर ऊंच या विशाल जैसलमेर दुर्गाची लांबी 460 मीटर आणि रूंदी 230 मीटर आहे. या किल्ल्याला 4 भव्य आणि विशाल प्रवेशव्दार आहेत त्यातील एका व्दारावर विशाल तोफ देखील ठेवण्यात आली आहे.
या किल्ल्यात बनविण्यात आलेले भव्य राजमहाल, सुरेख हवेली, आणि विशाल मंदिर या किल्ल्याच्या सौंदर्यांत चार चांद लावतात. किल्ल्याच्या आत बनविण्यात आलेल्या हवेलींना अनेक मजले आहेत यांना फार शाही पध्दतीने बनविण्यात आले आहे.
किल्ल्याच्या खिडक्या आणि दरवाज्यांना देखील कलात्मक रितीने बनविण्यात आले आहे यात आकर्षक कलाकृती देखील आहेत. यातील अनेक हवेलींना त्यांच्या आकर्षणामुळे म्युझीयम बनविण्यात आले आहे.
या किल्ल्याच्या आत एक भव्यदिव्य असे लक्ष्मीनाथजीं चे मंदीर देखील बनविण्यात आले आहे मंदिरात बनविण्यात आलेल्या चित्रांमध्ये प्राचीन परंपरा आणि संस्कृतीची झलक पहायला मिळते इतकेच नव्हें तर शाही महल च्या आत एक विशाल वाचनालय देखील बनविण्यात आले आहे जेथे बरीच प्राचीन आणि पुरातत्व संबंधीत पुस्तकं ठेवण्यात आली आहेत.
या व्यतिरीक्त जैसलमेर च्या किल्ल्यात पाणी बाहेर काढण्याची सुध्दा व्यवस्था फार अप्रतीम करण्यात आली आहे याला ’’घूंटनाली’’ असे नाव देण्यात आले आहे. पावसाच्या पाण्याला चारी दिशांना किल्ल्यापासुन दुर नेण्याची व्यवस्था यात करण्यात आली आहे.
जैसलमेर येथील या शाही किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल – How To Reach Jaisalmer Fort
या भव्य किल्ल्याला भेट देण्याची योजना मनात तयार करत असाल तर या ऐतिहासीक किल्ल्यापर्यंत रस्ता, रेल्वे आणि विमानसेवेने देखील पोहोचता येते. हा भाग तीनही मार्गांनी चांगल्या तऱ्हेने जोडला गेला आहे. येथपर्यंत पोहोचण्याकरता खाजगी आणि सरकारी बसेस देखील उपलब्ध आहेत.
येथे दोन मुख्य बसस्थानक आहेत या शिवाय अनेक ट्रेन जैसलमेर मार्गाने जातात त्यामुळे पर्यटक सहजतेने सार्वजनिक आणि आपल्या खाजगी वाहनांनी किल्ल्यापर्यंत पोहाचु शकतात.
जैसलमेर चा भव्य किल्ला केवळ आपल्या ऐतिहासीक महत्वामुळेच नव्हें तर याच्या वैशिष्टयपुर्ण आणि भव्यदिव्य वास्तुकलेमुळे देखील आपल्याला त्याच्याकडे आकर्षीत करतो आणि म्हणुनच जैसलमेर चा किल्ला मुख्य पर्यटनस्थळांच्या यादीत समाविष्ट आहे.
Read Also:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी जैसलमेर किल्ला बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्