Jaigad Fort Information Marathi
महाराष्ट्राला किल्ल्याची भूमी म्हटल्या जाते. सुमारे ३०० हुन अधिक किल्ले असलेल्या महाराष्ट्राला इतिहासाचा प्रगल्भ वारसा लाभलेला आहे. यांत छत्रपती शिवरायांची जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, पन्हाळगड, रामशेज किल्ला आणि अनेक किल्ल्यांनी हि भूमी पावन झाली आहे. हे किल्ले म्हणजे केवळ इतिहासाचा वारसाच नाही तर शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा देखील उत्कृष्ट नमुना सादर करतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील असाच एक किल्ला म्हणजे ‘जयगड’.
होय आज आपण जयगड किल्ल्याचा इतिहास जाऊन घेणार आहोत. चला तर मग वाट कसली बघताय….
जयगड किल्ल्याचा इतिहास आणि माहिती – Jaigad Fort Information Marathi
जयगड किल्ल्याचा इतिहास – History of Jaigad Fort in Marathi
मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जयगड किल्ल्याची निर्मिती १६ व्या शतकात बिजापूर येथील राजाकडून करण्यात आली. परंतु बिजापुरी सल्तनत किल्ल्यावरील आपला ताबा फार काळ टिकवून ठेऊ शकली नाही. आणि या नंतर किल्ल्यावर संगमेश्वर येथील नाईक राजवटीने राज्य केले.
हा संघर्ष इथेच थांबला नाही. कधी बिजापुरी सल्तनतने तर कधी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावर सतत चढाई केली गेली. सरतेशेवटी १८१८ साली जयगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
जयगड किल्ल्याचे ठिकाण – Jaigad Fort Height & Location
हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात स्थित असून, गणपतीपुळे या तीर्थक्षेत्रापासून जवळच आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ५५ मीटर उंचीवर हा किल्ला आहे. या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १२ ते १३ एकर एवढे आहे.
जयगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे – Jaigad Fort Places to see
हा किल्ला शास्त्री नदी आणि अरबी समुद्र यांच्या मुखाशी वसलेला आहे. किल्ल्यावरून आपल्याला अथांग पसरलेला अरबी समुद्र पाहायला मिळतो. भले मोठे प्रवेशद्वार असून प्रवेशद्वार शेजारील बुरुज आजमितीला देखील चांगल्या परिस्थितीत आहेत. गडावर गणपती आणि हनुमानाची मंदिरे आहेत. तसेच किल्ल्यावर २-३ गोड पाण्याच्या विहिरी देखील खरोखरच पाहण्यासारख्या आहेत. गडाच्या मधोमध कान्होजी आंग्रे यांचा वाडा तसेच दीपगृह देखील आकर्षक आहेत.
जयगड किल्ल्याजवळील इतर पर्यटन स्थळे – Jaigad Fort Near Places to visit
कोकणातील प्रत्येक गोष्ट हि पर्यटन स्थळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जयगड पासून अगदी १०-१५ किमी वर गणपतीपुळे आहे. येथील जागृत गणपती नवसाला पावणारा आहे. शिवाय जयगड दीपगृह, रत्नागिरी मत्स्यालय इ. अनेक ठिकाणं भेट देण्यासारखी आहेत.
जयगडला कसे जावे – How to reach Jaigad Fort
यागडला रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने जात येते. जर तुम्ही रस्ते मार्गाने प्रवास करत असाल तर रत्नागिरी बस स्टॅन्ड वरून तुम्हाला बस, ऑटो किंवा टॅक्सी करावी लागेल. रेल्वेने प्रवास करायचा म्हटल्यास सर्वात नजीकचे रेल्वे स्टेशन रत्नागिरी आहे येथून जवळपास ४०-४५ किमी वर हा किल्ला आहे. तसेच हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर सर्वात जवळचे एअर पोर्ट रत्नागिरी आहे आणि येथून ४०-४५ किमी बस किंवा टॅक्सीने जयगडला पोहोचता येतं.
जयगडला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी – Best Time to visit Jaigad Fort
खरं तर येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते, परंतु जयगडला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम कालावधी ऑक्टोबर ते मार्च हा आहे.
जयगड किल्ल्याबद्दल काही महत्वाचे प्रश्न – FAQ About Jaigad Fort
उत्तर: रत्नागिरी.
उत्तर: हा किल्ला बिजापूर येथील राजांनी बांधला.
उत्तर: समुद्रसपाटीपासून सुमारे ५५ मीटर.
उत्तर: १८१८ साली.