Isaac Newton Information in Marathi
जगाच्या पाठीवर आजवर अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होवून गेले आहेत. ज्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक प्रकारचे महत्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांनी केलेल्या संशोधनाच्या बळावरच आज आपण आधुनिक जगात सुखाने वावरत आहोत. खरच, आपल्या इतिहास काळात होवून गेलेल्या वैज्ञानिकांनी जे काही शोध लावले त्यामुळेच आपणास अनेक गोष्टींची माहिती झाली.
तसचं, त्यांनी मिळवलेल्या माहितींच्या आधारे आपण अनेक उपकरणाचा शोध लावू शकलो. आज आपण सुद्धा या लेखाच्या माध्यमातून महान इंग्रज शास्त्रज्ञ, गणितज्ञ, खगोलीय प्रेमी, ज्योतिषशास्त्रज्ञ आणि प्रकाशकी या प्रकारची ख्याती मिळविणारे प्रसिद्ध ब्रिटीश वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांच्याबाबत सविस्तर माहितीचे लिखाण करणार आहोत.
“आयझॅक न्यूटन” महान भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ – Isaac Newton Information in Marathi
सर आयझॅक न्यूटन यांचा जीवन परिचय – Isaac Newton Biography in Marathi
पूर्ण नाव | आयझॅक न्यूटन |
जन्म | ४ जानेवारी १६४३ |
जन्मस्थान | वूल्स्थोर्पे मनोर |
आई | हन्ना |
वडिल | आयझॅक न्यूटन सिनियर |
सर आयझॅक न्यूटन यांचे सुरुवाती जीवन – Isaac Newton in Marathi
ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ म्हणून पूर्ण विश्वात प्रसिद्धी मिळवणारे महान ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म सन ४ जानेवारी १६४२ साली इंग्लंड मधील एका खेडे गावात झाला होता. त्यांच्या जन्माच्या दोन महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. म्हणून, न्यूटन यांच्या आई हन्ना यांनी न्यूटन 3 वर्षाचे असतांना दुसरा विवाह केला होता.
त्यामुळे न्यूटन यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले. आपल्या दुसऱ्या पतीच्या निधनानंतर सर आयझॅक न्यूटन यांच्या आई हन्ना परत आपल्या माहेरी आल्या. न्यूटन यांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या आईने त्यांना शेताकडे लक्ष देण्यास सांगितले. अश्या प्रकारच्या अनेक प्रसंगांना न्यूटन यांना तोंड द्यावे लागले होते.
सर आयझॅक न्यूटन यांची शैक्षणिक कारकीर्द – Isaac Newton Education
सर आयझॅक न्यूटन यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या आजोळी राहूनच पूर्ण केले. त्यांच्या अंगी मुळातच हुशारी असल्याने त्यांनी हाताला पडतील तशी कामे करीत आपले महाविद्यालयीन शिक्षण सुरूच ठेवले. त्याचप्रमाणे त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून आपले एम. ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
सर आयझॅक न्यूटन यांचे संशोधन कार्य – Isaac Newton Inventions
सर आयझॅक न्यूटन यांना गणित विषयाप्रती खूप गोडी असल्याने त्यांनी या विषयाला अनुसरून विविध शाखांमध्ये प्राविण्य मिळविले. न्यूटन यांच्या आदी गणित क्षेत्रांत प्रसिद्धी मिळवणारे महान वैज्ञानिक पास्कल यांनी मांडलेल्या विचारांच्या आधारे त्यांनी सर्वकष स्वरूपातील बायनॉमियलचा सिद्धांत मांडला.
या सिद्धांताच्या साह्याने दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग, आणि घन त्याचप्रमाणे घातांकाचे मूल्य सहज काढता येते. त्याचप्रमाणे, न्यूटन यांच्या आगोदर खगोलीय क्षेत्रांत प्राविण्य मिळविणारे महान शास्त्रज्ञ कोपर्निकस, गॅलिलिओ आणि केपलर यांनी आपल्या निराक्षणातून आकाशात दिसणाऱ्या सूर्य आणि ग्रह तारे यांच्या भ्रमणा बाबत बारकाईने आभ्यास केला होता.त्याआधारे त्या संशोधकांनी सूर्य मालेतील ग्रहांची रचना केली होती. केपलर यांनी तर सूर्य ग्रहाभोवती होणाऱ्या परिभ्रमनाचे सविस्तर वर्णन केले होते.
या सर्व गोष्टींचा सर न्यूटन यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यास गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची जोड देऊन ते नियम गणिताच्या माध्यमातून सिद्ध केले. सूक्ष्म कणांपासून प्रकाश किरण तयार होत असतात असे प्रतिपादन सर आयझॅक न्यूटन यांनी केले होते. याद्वारे प्रकाशाच्या परावर्तन आणि अपवर्तन या दोन्ही गुणांचे स्पष्टीकरण देता येते.
यांत्रिकी क्षेत्रांत संवेग आणि कोनीय संवेग दोघांच्या संवर्धनाचे सिद्धांत स्थापित केले. प्रिझमच्या साह्याने त्यांनी प्रथम पारदर्शक परावर्ति दुर्बीण तयार केली. तसचं, या आधारे त्यांनी रंगाचा सिद्धांत मांडला की, एक प्रिझम प्रकाशाला अनेक रंगांमध्ये आच्छादून टाकतो. ज्याप्रमाणे प्रकाशाचे उर्जा हे एक रूप आहे त्यानुसार उष्णता देखील प्रकाशाचेच एक रूप आहे हे त्यांनी सांगितले. तसचं, अत्यंत तापलेला पदार्थ पटकन थंड होतो परंतु, कोमट असलेला पदार्थ हळूहळू थंड होतो.
पृथ्वीचा आकार सपाट नसून गोलाकार आहे , असे न्यूटन यांच्या आधी होवून गेलेल्या महान खगोल शास्त्रज्ञांनी सांगितले होते. परंतु, पृथ्वीचा आकार गोल चेंडू सारखा नसून मध्यभागी विषुववृत्तीय भागाजवळ तिचा भाग तोडासा फुगीर आहे. व दोन्ही ध्रुवा कडील भाग चपटा असल्याचे न्यूटन यांनी सांगितले. अश्या प्रकारचे अनेक विचार त्यांनी आपल्या सिद्धांतातून लोकांसमोर मांडले. सर आयझॅक न्यूटन हे एक महान ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते.
त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीच्या बळावर भौतिक आणि गणित क्षेत्रांत महान ख्याती प्राप्त केली होती. सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या सिद्धांताच्या माध्यमातून गुरुत्वाकर्षणाचे नियम आणि गतीच्या सिद्धांतांचा शोध लावला. सर आयझॅक न्यूटन यांनी शोध लावलेली प्रसिद्ध शोध पत्रिका “फिलोसोफी नेचुरेलीस प्रिन्सिपिया मथेमेटिका” सन १६८७ साली प्रकाशित झाली होती. ज्यामध्ये त्यांनी गुरुत्वाकर्षण तथा गतीच्या नियमांची व्याख्या लिहिली होती.
सर आयझॅक न्यूटन यांचे स्वाभाविक जीवन – Isaac Newton Life Story
सर आयझॅक न्यूटन हे मुळात अपरंपरागत ख्रिचन धर्मीय असण्याबरोबर एक धार्मिक व्यक्ती देखील होते. आज सुद्धा नैसर्गिक विज्ञान क्षेत्रांत त्यांचे नाव घेतले जाते. न्यूटन एक महान शास्त्रज्ञ असण्याबरोबरच रॉयल सोसायटीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. त्यांनी ब्रिटीश सरकार मध्ये वार्डन आणि मास्टर ऑफ द रॉयल मिंट म्हणून सेवा दिली होती.
सर आयझॅक न्यूटन यांच्या सारख्या महान शास्त्रज्ञांकडे पाहून अश्या प्रकारची शिकवण मिळते की, परिस्थिती कितीही बेताची असली तरी न डगमगता आपल्या लक्षाकडे गुंज केली पाहिजे. तसचं, सतत कार्य करत दिवसांदिवस आपली प्रगती केली पाहिजे.