IPS Vishwas Nangare Patil chi Mahiti
मित्रांनो! काही व्यक्तिमत्व असे असतात ज्यांना पाहुन तुम्हाला त्यांच्या सारखं व्हावंसं वाटतं. आणि ही गोष्ट आपल्या करीता किती अभिमानाची होते जेव्हां ते व्यक्तिमत्व या आपल्या महाराष्ट्रातल्या मातीत जन्माला आलेलं, या मातीत रूजलेलं, वाढलेलं, शिकलेलं आणि कर्तबगारीनं सिध्दं झालेलं असतं.
खरं ना! चला या लेखात अश्याच कर्तबगार, रूबाबदार व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊया!
IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या विषयीची माहिती – IPS Vishwas Nangare Patil Biography in Marathi
IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या अल्पपरिचय – IPS Vishwas Nangare Patil Information In Marathi
नांव: | विश्वास नांगरे पाटील |
जन्म: | ५ ऑक्टोबर १९७३ |
जन्मस्थान: | कोकरूड, तालुका शिराळा जिल्हा सांगली |
शिक्षण: | बी.ए. एम.बी.ए कोल्हापुर विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ |
पद: | आय.पी.एस् पत्नी: रूपाली नांगरे पाटील |
मुलं: | जान्हवी, रणवीर |
पुरस्कार: | राष्ट्रपती शौर्य पदक (२०१३) |
IPS विश्वास नांगरे पाटील माहिती – IPS Vishwas Nangare Patil Mahiti
विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्र पोलिस खात्यात अधिकारी पदावर कार्यरत आहेत. पोलिस महानिरीक्षक पदावर ते सध्या कोल्हापुर भागात सेवा देत आहेत. ज्यासुमारास मुंबईत ताज या प्रसिध्द हॉटेल वर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यावेळी धडाडीने त्या हाॅटेल मधे शिरणारे प्रथम पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील होते.
ते एक अत्यंत प्रामाणिक आणि हुशार अधिकारी आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांना ते सतत मार्गदर्शन करीत असतात.
IPS विश्वास नांगरे पाटील यांचे शिक्षण आणि प्राथमिक काळ – IPS Vishwas Nangare Patil Education
बत्तीस शिराळा तालुक्यात कोकरूड हे गाव आहे. या ठिकाणी विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म झाला. तालुक्यातील शाळेत त्यांचे सुरूवातीचे शिक्षण झाले, त्यांचे वडिल त्या गावाचे सरपंच होते.
पुढे कोल्हापुर येथे शिवाजी विद्यापीठातुन त्यांनी बी.ए.ची पदवी इतिहास या विषयातुन यशस्वीपणे पुर्ण केली. बी.ए. ची पदवी मिळवतांना त्यांना सुवर्ण पदक मिळाले आहे. पुढच्या शिक्षणाकरीता त्यांनी उस्मानिया विद्यापिठात प्रवेश घेतला व एम.बी.ए पुर्ण केले व प्रशासकिय अभ्यासक्रमाचा सराव सुरू केला.
IPS विश्वास नांगरे पाटील यांची महत्वाची आणि प्रसिध्द कामगिरी – IPS Vishwas Nangare Patil Famous Performance
- मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला.
- मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया समोर असलेल्या प्रसिध्द अश्या ताज हॉटेल वर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी तेथे पोहोचुन परिस्थीतीचा अंदाज घेणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी विश्वास नांगरे पाटील हे एक होते.
- त्या सुमारास त्यांच्यासह केवळ दोन कॉन्स्टेबल आणि फक्त एक अंगरक्षक सोबत होते त्यांच्या सुरक्षेकरता सुरक्षाकवच देखील त्यावेळी नसतांना त्यांनी गोळीबार सुरू असलेल्या हॉटेल मधे प्रवेश केला. ९ एमएम च्या बंदुकीतुन ते दहशतवाद्यांचा प्रतिकार करीत होते.
- मागोवा घेत घेत ते सहाव्या मजल्यापर्यंत गेले.विश्वास नांगरे पाटलांच्या प्रतिकारामुळे दहशतवादी ताज च्या नव्या ईमारतीत जाऊ शकले नाहीत. नांगरे पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूम मधे गेले आणि तिथे असलेल्या सीसीटिव्ही च्या सहाय्याने ते दहशतवाद्यांच्या कारवायांची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकार्यांना पोहोचवित राहीले. एनएसजीचे कमांडो सकाळी पोहोचेपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांनी आपली जवाबदारी अतिशय निष्ठेने पार पाडली.
IPS विश्वास नांगरे पाटील यांच पुण्यात गाजलेले रेव्ह पार्टी प्रकरण – IPS Vishwas Nangare Patil’s Rave Party Case In Pune
ज्या सुमारास विश्वास नांगरे पाटील पुणे जिल्हयातील ग्रामीण पोलिसदलात अधिक्षक म्हणुन कर्तव्यावर होते तेव्हां पुण्यात ४ मार्च २००७ ला घडलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात त्यांनी केलेल्या कारवाई ने त्यांना फार प्रसिध्दी मिळाली होती.
सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे गावात एका शेतात रेव्ह पार्टी सुरू असल्याची बातमी पुणे ग्रामिण पोलिसांना मिळाली. त्यांनी छापा मारून तब्बल २८७ तरूण तरूणींना ताब्यात घेतले. प्रयोग शाळेत त्यां मुलामुलींच्या तपासणी नंतर त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले होते.
पुणे ग्रामिण पोलिसांनी केलेल्या या कारवाई मुळे विश्वास नांगरे पाटील त्यावेळी प्रसिध्दीच्या झोतात आले होते.
IPS विश्वास नांगरे पाटील यांचे पुरस्कार – IPS Vishwas Nangare Patil’s Awards
२०१३ साली विश्वास नांगरे पाटील यांना राष्ट्रपती शौर्य पदक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
IPS विश्वास नांगरे पाटील करियर – IPS Vishwas Nangare Patil Career
- जिल्हा पोलिस अधिक्षक अहमदनगर (२८ नोव्हें २००५ पर्यंत)
- ग्रामिण पोलिस अधिक्षक जिल्हा पुणे (२९ नोव्हें २००५ ते ३ जुन २००८)
- पोलिसदलात उपायुक्त मुंबई (४ जुन २००८ ते २०१०)
- ग्रामिण पोलिस अधिक्षक जिल्हा ठाणे (२०१० ते २०११)
- मुंबई पश्चिम विभागात अप्पर पोलिस आयुक्त
- कोल्हापूरचे पोलिस महानिरीक्षक (जून २०१६ ते २०१९)
- पोलीस आयुक्त, नाशिक शहर (२३/०२/२०१९ पासून कार्यरत)
विश्वास नांगरे पाटिल आज तरूणांचे आदर्श बनले आहेत. त्यांना पाहुन तरूणवर्गाला त्यांच्यासारखे व्हावेसे वाटते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात आणि त्यांचे मनोबल वाढविण्याकरता त्यांना प्रोत्साहन देतात.
अश्याच नवीन नवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत. आणि या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. धन्यवाद!