International Trains from India to other Countries
भारत हा जगातून सर्वात मोठा देश रेल्वेचे जाळे असणारा देश आहे आणि आपल्याला ही माहिती आहेच की दिवसाला करोडो लोक ह्याच रेल्वेतून संपूर्ण भारतभर प्रवास करत असतात. पण आपल्याला भारतातून विदेशात घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाड्यांविषयी माहिती आहे का? ज्या रेल्वेगाड्या आपल्याला भारतातून दुसऱ्या देशात घेऊन जातात, नाही ना तर आजच्या लेखातून जाणून घेऊया अश्या रेल्वे गाड्यांविषयी ज्या आपल्याला भारतातून परदेशात घेऊन जातात. तर चला पाहूया..
भारताच्या नजीकच्या देशांत जसे पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ या देशात भारतातून आपण रेल्वेने प्रवास करून जाऊ शकता. या सर्व रेल्वे गाड्यांना आंतराष्ट्रीय रेल्वे गाड्या आपण म्हणू शकतो. आता त्यापैकी काही रेल्वे गाड्यांविषयी माहिती पाहूया..
ह्या आहे भारतातून विदेशात जाणाऱ्या ट्रेन – International Trains from India To Other Countries
मैत्री एक्सप्रेस – Maitree Express (India to Bangladesh Train Name)
ही रेल्वे गाडी भारताच्या कोलकत्ता शहारापासून ते बांग्लादेश च्या ढाका पर्यंत जाणारी एकमेव रेल्वे गाडी आहे आणि या रेल्वे गाडीला मैत्री एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाते, भारतातून बांग्लादेश ला जाण्यासाठी या रेल्वेचा उपयोग होतो ही गाडी आठवड्यातून फक्त एकदाच दोन्हीकडून सुटते. आणि या रेल्वेला १४ एप्रिल २००८ ला ४८ वर्षानंतर परत सुरू करण्यात आले होते. ही पहिली रेल्वे आहे जी बांग्लादेश आणि भारत यांच्या दरम्यान चालू झाली होती.
समझोता एक्सप्रेस – Samjhauta Express (India to Pakistan Train)
समझोता एक्सप्रेस भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये चालणारी एक रेल्वे गाडी आहे, दिल्लीपासून पंजाबच्या अटारी रेल्वे स्थानाका पर्यंत या रेल्वे गाडीला भारताचे इंजिन आणि इथून समोर पाकिस्तान च्या रेल्वेचे इंजिन असे करत या रेल्वे गाडीला पाकिस्तान च्या लाहोर पर्यंत नेण्यात येत. या रेल्वे गाडीतील प्रत्येक प्रवाशाची व्यवस्थित रित्या चौकशी करून आणि सोबतच पासपोर्ट वगैरे पाहून त्यांनातरच सोडल्या जाते. तसेच जवानांच्या निगराणीत या रेल्वेला पाकिस्तान च्या बॉर्डर पर्यंत सोडण्यात येते.
दिल्लीपासून निघाल्यानंतर या ट्रेन ला पंजाब च्या अटारी पर्यंत एकही स्टॉप नाही आहे. या ट्रेन मध्ये ६ स्लीपर चे डबे आणि ३ एसी चे कोच आहेत. या ट्रेन ला यापूर्वी बरेचदा बंद करण्यात आलेलं आहे.
बंधन एक्सप्रेस – Bandhan Express (India to Bangladesh Train)
ही रेल्वे गाडी बांग्लादेश आणि भारत या दोन देशांच्या दरम्यान प्रवास करते. आणि या ट्रेन ची सुरुवात २०१७ ला झाली होती, ही ट्रेन सुध्दा मैत्री एक्स्प्रेस सारखी पश्चिम बंगाल च्या कोलकत्ता शहरापासून ते बांग्लादेश ची राजधानी ढाका पर्यंत ३७५ किलोमीटर चा प्रवास करत जाते. परंतु मैत्री एक्सप्रेस फक्त आठवड्यातून एकच दिवस सुरू असते पण ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस सुरू असते.
थार एक्सप्रेस – Thar Link Express (Train from India to Pakistan)
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या मध्ये चालणारी ही सर्वात जुनी रेल्वे आहे. जेव्हा दोन्ही देश एकत्र होते तेव्हापासून ही ट्रेन सुरू होती आणि या ट्रेन ला सिंध मेल एक्सप्रेस नाव देण्यात आले होते. आणि १९६५ मध्ये या ट्रेन चा रूळ खराब झाल्यानंतर ही ट्रेन बंद झाली होती परंतु २००६ मध्ये या ट्रेन ला पुन्हा सुरू करण्यात आले.
वरील लेखातून आपल्याला भारतातून भारताबाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांविषयी महिती झाली असेल, आशा करतो लिहिलेला छोटासा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला छोटासा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!