Motivational Bollywood Movies
आपल्या मनोरंजनचे साधन आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे चित्रपट.
चित्रपटसृष्टी मधले बहुंतांश चित्रपट हे एका प्रेरानादायी उद्देशानेच बनवलेले असतात. पण आपण त्याला एका मनोरंजनाच्या दृष्टीनेच पाहतो.
मित्रांनो आज आम्ही आपल्याला अश्या काही पाच चित्रपटांचे नाव सांगू जेणे करून तुम्ही ते चित्रपट पाहून तुम्हाला त्या पासून एक प्रेरणा मिळेल. तर या जाणून घेऊ कोणते आहेत हे पाच चित्रपट.
५ प्रेरणादायी हिंदी चित्रपट – 5 Inspirational Bollywood Movies
१) भाग मिल्खा भाग – Bhaag Milkha Bhaag
नाव ऐकूनच तुमच्या लक्षात आले असेल की आपण कोणा विषयी जाणून घेणार आहोत.
एक व्यक्तिमत्व मिल्खा सिंह हे सर्वात तेज भारतीय धावपटू होते.
जेव्हा ते भारतीय लष्करात कार्यरत होते तेव्हा पासूनच त्यांना धावण्याच्या खेळाचे वेड लागले.
त्यांचा जन्म हा ८ ऑक्टोंबर १९३५ पंजाब राज्यात वसलेले भटिंडा जिल्ह्यामध्ये गीविन्द्पुरा या मध्ये झाला. त्यांनी १९५८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळूवून दिले.
तसेच त्यांना भारतीय नागरी “पद्मश्री” या पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आले. त्यांना फ्लाइंग शिख्स असे पण म्हणतात.
२०१३ मध्ये त्यांच्या जीवनावर अधारित प्रदर्शित झालेला चित्रपट भाग मिल्खा भाग हा आपल्यासाठी एक प्रेरणादायी च ठरू शकतो.
हा चित्रपट एका सत्य घटने वर आधारित असून मिल्खा सिंघ यांच्या जीवनावर बनवलेला आहे.
पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर ते त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करतात.
या चित्रपटाचे निर्माता राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी हा चित्रपट काढला असून फरहान अख्तर याने मिल्खा सिंघ यांची भूमिका साकारली आहे व २०१३ च्या यशस्वी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होता.
२) ३ इडिएट – 3 Idiots
जर तुम्ही पण एक इंगीनिरिंग चे विध्यार्थी आहात तर तुम्ही नक्की एकदा हा चित्रपट पाहाच.
कारण हा चित्रपट तीन इंगीनिरिंगच्या विध्यार्थावर बनवलेला आहे. हा चित्रपट आपल्यासाठी एक प्रेरणादायी ठरू शकते.
घरच्यांचा कधी-कधी आपल्यावरती दबाव असतो आपली इच्छा नसून आपण एखादी गोष्ट करतो पण त्याची आपल्याला आवड नसल्यामुळे आपल्याला त्या मध्ये रस राहत नाही.
कॉलेज मध्ये असतांना आपल्याला खूप मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते.
या चित्रपटामध्ये सर्व परिस्थितींना सामोरे कसे जायचे व कसे लढायचे हे सांगितले आहे.
राजकुमार हिरांनी यांनी या चित्रपटाचे लिखाण करून विधू विनोद चोप्रा यांनी हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित केला. आपले जाणते कलाकार अमीर खान, करीना कपूर, आर. माधवन, शरमन जोधी, बोमन इराणी, ओमी सिंह. जावेद साहनी, जावेद जाफरी या कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे.
३) उडान – Udaan
अनुराग कश्यब, संजय सिंह आणि रोन्नि स्क्रेवाल्ला यांनी हा चित्रपट निर्माण करून १६ जुलै २०१० रोजी प्रदर्शित केला.
ही कथा दोन सावत्र भावांची आहे. जे कधीच एकमेकांची साथ सोडत नाही. आपल्या वडिलांकडून मिळात असलेला त्रास सहन करत तो मुलगा पुढे जात असतो.
शेवटी मिळत असलेल्या त्रासाला कंटाळून तो मुलगा घर सोडून निघून जातो आणि त्याच्या सोबत त्याचा सावत्र भाऊ देखील असतो.
आणि नंतर त्यांना त्यांच्या जीवनाची एक नाविन दिशा मिळते.
या चित्रपटात रजत बर्मेचा, रोहित रॉय, अयान बोरादिया, राम कपूर, मनोज सिंह, आणि आनंद तिवारी या जाणत्या कलाकारांनी अभिनय केला आहे.
४) तारे जमीन पर – Taare Zameen par
१४ डिसेंबर २००७ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट एका लहान मुलाच्या जीवनावर आधारित आहे.
जो डिस्लेक्सिक रीडिंग डिसऑर्डर या मानसिक बिमारीमुळे पिडीत असतो.
पण त्या मुलाची कला, रचनात्मक शक्ती खूप अधिक असते.
त्यानंतर त्या मुलाच्या आयुष्यात एक नविन आर्ट शिक्षक (अमीर खान) येतो, आणि त्याला त्या आजारापासून पासून सुटका करायला मदत करतो.
अश्या रीतीने या चित्रपटाचा शेवट आनंदायी होतो.
५) चक डे इंडिया – Chak De! India
चक डे इंडिया हा चित्रपट १० ऑगस्ट २००७ साली प्रदर्शित झाला.
यश चोप्रा प्रोडक्शन यांनी या चित्रपटाची रूपरेषा आखून हा चित्रपट निर्माण केला.
कबीर खान ( शाहरुख खान ) हा भारतीय हॉक्की संधाचा कप्तान असतो. संघामध्ये खेळत असतांना पाकिस्थान सोबत झालेल्या पराभावामुळे त्याला संघातून बाहेर काढण्यात येते. आणि समाजामधून त्याच्या आई व त्याला बहिष्कृत करण्यात येते.
गेलेली अब्रू परत मिळवण्यासाठी आणि हरवलेली निष्ठा मिळवण्यासाठी तो परत भारतीय महिला संधाच्या प्रशिक्षाची जवाबदारी घेतो. व त्यामध्ये जिंकून स्वतःची मान उंचावतो.