Indrayani Nadi
पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सह्याद्री पवर्तराजीच्या उंच डोंगररांगा उत्तर-दक्षिण पसरलेल्या आहेत. त्याच पर्वताचे फाटे पूर्वेकडेही गेलेले आहेत. कार्ल्याची प्रसिद्ध लेणी ज्या परिसरात आहेत, त्याला ‘आंदर मावळ’ म्हणतात; तर इंद्रायणी नदीचे खोरे म्हणजे ‘नाणेमावळ.’
इंद्रायणी नदीची माहिती – Indrayani River Information in Marathi
नदीचे नाव | इंद्रायणी |
उगमस्थान | लोणावळा, जि. पुणे, महाराष्ट्र |
उपनद्या | कुंडलिका |
नदीची लांबी | 4.62 कि.मी. |
नदीकाठावरील गावे | देहू, आळंदी |
नाणेमावळात सह्याद्रीच्या डोंगरात समुद्रसपाटीपासून सुमारे २३०० फूट उंचीवर कुरवंडे गावाजवळ इंद्रायणी नदी उगम पावते.
इंद्रायणीच्या उगमापासून जवळच ‘लोणावळा’ हे थंड हवेचे ठिकाण आहे. उगमापाशी इंद्रायणीचे पात्र लहान आणि उथळ आहे. उगमानंतर इंद्रायणी दोन मैलांपर्यंत दक्षिण दिशेने वाहते, नंतर ती दक्षिणपूर्वेला वळते; पुढे ती लोणावळा धरणाजवळून वाहते. अनेक गावांतून आलेले ओढे या ठिकाणी इंद्रायणीस येऊन मिळतात.
कामशेत गावाजवळ ‘कुंडलिका’ ही उपनदी इंद्रायणीस येऊन मिळते. पुढे ‘आंद्रा’ नावाची नदीही इंद्रायणीस आपला जलभार अर्पण करते. मग पूर्वेकडे वाहत ती देहूजवळून वाहत पुढे आळंदीला येते. आळंदीला इंद्रायणीच्या काठावर संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर आहे.
या मंदिरामागच्या बाजूस असलेला इंद्रायणी नदीचा घाट हा फारच सुंदर आहे.
पुढे सुमारे वीस मैल वाहत जाऊन उत्तरेस वळून ती तुळापूर या गावाजवळ भीमा नदीस आलिंगन देऊन तिच्यात सामावून जाते.
उगम पावल्यापासून भीमा नदीत विलीन होईपर्यंत इंद्रायणी नदी सुमारे अठ्ठावन मैलांचा प्रवास करते. दक्षिण पठाराच्या सर्वसाधारण असलेल्या उताराप्रमाणेच इंद्रायणी नदीचा उतार आहे.
पवना, मुळा-मुठा या नद्यांची खोरी इंद्रायणीच्या दक्षिणेस आहेत. इंद्रायणीच्या उत्तर बाजूला भीमा नदीचे खोरे आहे.
इंद्रायणी नदी – Indrayani River Mahiti
मावळ, राजगुरूनगर आणि हवेली या पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून इंद्रायणी नदी वाहते. इतर नद्यांच्या तुलनेत इंद्रायणी नदीची लांबी, तिचे पाणलोट क्षेत्र लहान आहे.
पुणे जिल्ह्याचा मध्य भाग इंद्रायणीच्या खोऱ्याने समृद्ध केला आहे. इंद्रायणीच्या खोऱ्यातून मुंबईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे जाते.
उगमापासून कामशेतपर्यंत इंद्रायणीचे पात्र फारच उथळ आणि काही ठिकाणी पसरट; तर काही ठिकाणी अरुंद असलेले दिसते.
पावसाळ्यात इंद्रायणी धो धो वाहते. तिचे पाणी लगतच्या शेतीमध्ये घुसून बराचसा भाग जलमय होतो; तर उन्हाळ्यात मात्र नदी अगदी झुळझुळ वाहते. उगमाकडे तर पात्रात फारसे पाणी नसते.
इंद्रायणी ही भिमेची उपनदी आहे. उतारानुसार इंद्रायणीचे तीन भाग होतात. डोंगराळ भाग, मैदानी भाग; आणि भीमा नदीस मिळतानाचा संथ वाहणारा भाग. नदीचा उगमाकडील भाग खडबडीत उथळ, रुक्ष आहे.
या नदीची वाहण्याची गती वळणदार आहे. इंद्रायणीच्या खोऱ्यातील जमीन काळी, सुपीक, गाळमिश्रित; तर काही ठिकाणी चुनखडीयुक्त आहे.
इंद्रायणीचा उगम होणाऱ्या डोंगराळ प्रदेशात भरपूर पाऊस पडतो; तर नदी जशी पुढे-पुढे वाहत जाते, तसे पावसाचे प्रमाण कमी कमी होते.
अशा प्रकारे इंद्रायणीचे खोरे छोटे असले, तरी इंद्रायणीने आपल्या लगतचा प्रदेश सुपीक, समृद्ध केला आहे. आळंदी, देहू ही पवित्र तीर्थस्थळे इंद्रायणीकाठीच आहेत.
इंद्रायणी नदी विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Indrayani River
उत्तर: नाणेमावळात सह्याद्रीच्या डोंगरात कुरवंडे गावाजवळ इंद्रायणी नदी उगम पावते.
उत्तर: कुंडलिका नदी.
उत्तर: मावळ, राजगुरूनगर आणि हवेली या तीन तालुक्यातून.
उत्तर: भीमा नदीची.
उत्तर: देहू आणि आळंदी.