भारत देशाच नाव आल कि आपली मान अभिमानाने उंचावते. भारत देशाचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. आपल्या देशाल स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बऱ्याच क्रांतिकारकांनी बलिदान दिले. बऱ्याच चळवळी, आंदोलन, सत्याग्रह झाले. त्या मध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला.
शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी इंग्रजांना आपला भारत देश सोडवा लागला. आणि आपला भारत स्वातंत्र झाला. त्याच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकावून भारत देश स्वतंत्र झाल्याच घोषित करण्यात आलं.
त्यानंतर दरवर्षी लाल किल्ल्यावर पंतप्रधान १५ ऑगस्ट ला तिरंगा फडकावतात तसेच शासकीय कार्यालय, शाळा कालेज मध्ये तिरंगा फडकावून ध्वजवंदन केल्या जाते.
या वर्षी १५ ऑगस्ट ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त संपूर्ण भारत देशात राष्ट्रीय सन साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवाशीयांना केले. त्या निमित्य “हर घर तिरंगा” ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये देशातील प्रत्येक घरी तुम्ही तिरंगा लावायचा आहे. परंतु ध्वजसंहितेचे पालन करून.
आता तुम्ही म्हणाल कि ध्वज संहिता म्हणजे काय? त्या मध्ये कोण कोणते नियम आहेत? घरोघरी तिरंगा लावतांना कोणती काळजी घ्यायची? याची सगळी माहिती आम्ही आज च्या या लेखातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग…
भारतीय राष्ट्रध्वज फडकविण्याचे नियम – Indian Flag Hoisting Rules
घरी राष्ट्रध्वज फडकवण्या आधी जाणून घ्या नियम:
दिनांक १३ ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या “हर घर तिरंगा” मोहीमे अंतर्गत आपल्या घरावर तिरंगा लावण्या आधी खाली दिलेले काही नियम जाणून घ्या व त्यांचे पालन करा.
- ध्वजारोहण करतांना हे लक्षात ठेवावे की, तिरंग्याचा सन्मान सर्वात महत्वाचा आहे.
- फाटलेला, मळलेला किवां खराब झालेला ध्वज लावू नये.
- तिरंगा प्लॅस्टिकचा नसावा. तो सुती किंवा पॉलिस्टर कापडाचा असावा.
- तिरंगा नेहमी सरळ म्हणजेच केशरी रंग सर्वात वरती अशाच फडकवला पाहिजे.
- आपला राष्ट्रध्वज तिरंगा नेहमी सरळ असावा झुकता नाही..
- तिरंग्याच्या जवळपास इतर कोणताही ध्वज त्यापेक्षा उंच अथवा त्याच्याबरोबरीने लावलेला नसावा.
- तिरंग्याच्या दांड्यावर इतर कोणतीही वस्तू म्हणजेच फुलं, माळा नसावी.
- तिरंग्याचा कधीही पोशाख म्हणून वापर वापर करू नये.
- तिरंग्यावर कधीही, काहीही लिहू नये.
- नव्या नियमानुसार तिरंगा आता 24 तास फडकवण्याची मुभा देण्यात आली आहे. सूर्यास्ताच्या वेळी तिरंगा खाली उतरवण्याची गरज नाही.