Illuminati: The Secret Society
आधीच्या काळात राजे महाराजे आपल्या राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या राज्याला कोणत्याही शत्रूपासून जर संकट असेल किंवा संपूर्ण राज्याची माहिती ठेवण्यासाठी काही व्यक्तींची नेमणूक करत असत, त्यांना त्या काळात गुप्तचर म्हटल्या जात असे, तेच जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे पृथ्वीवर असलेल्या वेगवेगळ्या देशांनी आपल्या गुप्तचर संघटना स्थापन केल्या.
ज्याप्रमाणे आपल्या देशाची गुप्तहेर संघटना RAW आहे, अमेरिकेची CIA आहे, या संघटना आपल्या देशासाठी गुप्तचर पद्धतीने माहिती गोळा करतात आणि आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी देशाला ती माहिती पाठवितात. अश्याच प्रकारची एक खूप जुनी एक संघटना आहे, तर आजच्या लेखात आपण या संघटनेविषयी थोडक्यात माहिती पाहूया.
इलूमिनाती : हजारो वर्षांपासुन जगावर राज्य करणारा ग्रुप – Illuminati: The Secret Society That Hijacked the World
इलूमिनाती काय आहे – What is Illuminati
इलूमिनाती ही एक संघटना आहे. या संघटनेची स्थापना १८ व्या शतकात झालेली आहे. जर आपण इंटरनेटवर या विषयी माहिती शोधायचे प्रयत्न केले तर आपल्याला ह्या संघटनेची स्थापना १७७६ मध्ये फक्त ५ लोकांनी केल्याची दिसून येते. आणि तेव्हा त्या पाच लोकांच नेतृत्व हे जर्मनीच्या इंगोल्स्ताद यूनिवर्सिटी चे प्राध्यापक एडम वीशॉप्ट यांनी केली होती.
सुरुवातीला या संघटनेचे नाव त्यांनी ऑर्डर ऑफ इलूमिनाती असे ठेवले होते. या संघटनेची सुरुवात त्यांनी कट्टरपंथ्यांच्या विरोधात केली होती. कारण कट्टरपंथी लोक जातीभेद करत होते. या संघटनेचा मुख्य उद्देश हा होता की जातीभेदाच्या ज्या काही भिंती कट्टरपंथी लोकांनी निर्माण केल्या होत्या त्या भिंतींना तोडून एक नवीन स्वतःचे साम्राज्य निर्माण करणे.
जर्मनीमध्ये असलेल्या इंगोल्स्ताद नावाच्या वस्तुसंग्रलयात प्राध्यापक एडम वीशॉप्ट यांनी लिहिलेल्या पुस्तकात या संघटनेच्या उद्देशांबद्दल लिहिल्या गेले आहे, नेमके कोणत्या कशासाठी या संघटनेची स्थापना केली गेली होती. ज्या ५ जणांना मिळून ही संघटना स्थापन केल्या गेली होती पाहता पाहता या संघटनेत हजारो लोक जुळले गेले.आणि या संघटनेचा अड्डा बनला होता प्राध्यापक वीशॉप्ट यांचे राहते घर.
या घरातच त्यांच्या गुप्त सभा व्हायच्या त्यांनतर योजना आखल्या जायच्या. पण काही दिवसानंतर या विषयी तेथील सरकारी लोकांना माहिती झाले. त्यानंतर प्राध्यापक वीशॉप्ट यांना त्या शहरातून दुसऱ्या शहरात पाठविण्यात आले. परंतु त्यांनतर सुध्दा ही संघटना सुरूच राहिली आणि अजूनही सुरूच आहे.
काही जाणकार लोकांचे म्हणणे आहे की फ़्रेंच राज्यक्रांतीच्या घडण्याच्या मागे या संघटनेचा हात आहे. एवढेच नाही तर अमेरिके सारख्या बलाढ्य देशाच्या माजी अध्यक्ष जॉन एफ.कैनेडी यांच्या हत्येच्या मागे सुध्दा या संघटनेचा हात असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. जॉन एफ.कैनेडी यांची हत्या २२ नोव्हेंबर १९६३ साली करण्यात आली होती, त्यांच्या मरणापूर्वी त्यांच्याजवळ एका महिलेला पाहिल्या गेले होते ज्या महिलेच्या हातात कॅमेरा सारखी दिसणारी एक छोटीशी बंदूक होती. त्या महिलेला एक नाव देण्यात आले होते आणि ते नाव होते ‘द बबुष्का लेडी’ पण आजपर्यंत कोणीही याचा तपास घेऊ शकले नाही की अमेरिकेच्या अध्यक्षांच्या खुणामागे कोणाचा हात होता.
वरील लेखात आपण पाहिले की इलुमिनाती ही एक संघटना आहे आणि त्या संघटनेची स्थापना कश्या प्रकारे करण्यात आली होती आणि या संघटनेचे प्रत्येक कार्य एवढं गुपित होते की त्याविषयी कोणालाही माहिती होत नाही. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन माहिती विषयक लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!
Conclusion:
या लेखात लिहिलेली सर्व माहिती इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहिती नुसार लिहिण्यात आलेली आहे. याविषयी आजपर्यंत कोणाला कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही आहे, काही वाचकांच्या मागणीनुसार आम्ही या विषयावर आपल्यासाठी माहिती घेऊन आलेलो आहे.