Secure Account Facebook
आज जवळपास प्रत्येक व्यक्ती कडे फेसबुक चे अकाऊंट उपलब्ध आहे. ज्यामुळे तो या जगाशी पूर्णपणे कनेक्ट राहू शकतो.
तसेच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची माहिती तो फेसबुक च्या माध्यमाने ठेवू शकतो. आणि लाखो किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीशी तो क्षणार्धात संपर्क साधू शकतो.
तर आपण आपल्या फेसबुक ला आणखी कशा प्रकारे सुरक्षित करू शकता, ते आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत. तर चला जाणून घेऊया काही गोष्टी ज्या आपल्या फेसबुक अकाऊंट ला सुरक्षित करू शकतात.
“ह्या टिप्स जाणून आपण करू शकता आपले फेसबुक अकाऊंट आणखी सुरक्षित” – How To Secure Facebook Account
१) आपल्या प्रोफाईल फोटोला सुरक्षित करून घ्या.
आपल्या फेसबुक च्या खात्यामध्ये आपला एक प्रोफाईल फोटो असतोच, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपण आपल्या फेसबुक खात्यामध्ये आपला फोटो सुरक्षित करून ठेवू शकतो.
आपल्या फेसबुक चा प्रोफाईल फोटो सुरक्षित करण्यासाठी आपल्याला त्यावर क्लिक करून आपण आपल्या फोटो ला सुरक्षित करू शकता.
त्यामुळे आपला असा फायदा होईल कि आपल्या नावाचे कोणीही फेक अकाऊंट बनून त्यावर आपला प्रोफाईल फोटो लाऊ शकणार नाही. म्हणून आपले फेसबुक चा प्रोफाईल फोटो सुरक्षित करून ठेवा.
२) आपल्या अकाऊंट ची गोपनीयता ठेवा.
जर आपल्या अकाऊंट ला आणखी सुरक्षित ठेवायचे असेल तर त्यामध्ये असलेली आपल्या अकाऊंट ची गोपनीयता हि आपल्याला ठरवणे आवश्यक आहे.
जेणेकरून आपल्या अकाऊंट ची माहिती काही ठराविक लोकांनाच पोहचेल. आणि आपले अकाऊंट सुरक्षित राहण्यास मदत होईल.
त्यासाठी आपल्याला आपल्या अकाऊंट मध्ये लॉग इन करून SETTING मध्ये जाऊन PRIVACY निवडावी लागेल.
३) पासवर्ड मजबूत निवडा.
आपण फेसबुक ला वापरत असाल तर आपल्या फेसबुक चा पासवर्ड हा बऱ्यापैकी मजबूत असायला हवा.
म्हणजेच आपल्या खात्याला कोणीही हॅक करू शकणार नाही.
सोबतच कोणत्याही अकाऊंट चा पासवर्ड हा एकसारखा न ठेवता वेग-वेगळा असायला हवा. त्यासाठी आपण आपला पासवर्ड मजबूत ठेवणे आवशक आहे.
४) फेसबुक चा डेटा व्यवस्थित ठेवा.
आपला डेटा हा सुरक्षित असायला हवा यासाठी आपण आपली गोपनीयता(Privacy) हि “Only Me” करून ठेवू शकता आपल्याला ज्या गोष्टी आपल्या मित्रांना दिसायला हव्या असतील त्याच आपण “Only Friend” करू शकता.
बाकी अनावश्यक गोष्टी आपण “Only Me” करून ठेवू शकता.
त्यामुळे आपला डेटा व्यवस्थित आणि सुरक्षित राहण्यास मदत होईल.
५) थर्ड पार्टी लॉग इन टाळावे.
बरेचदा होते असे कि आपल्याला कोणती तरी वेबसाईट लॉग इन करण्यासाठी फेसबुक चे लॉग इन मागते, त्यावेळी आपण आपली माहिती त्या वेब साईट ला देण्याअगोदर सर्वप्रथम ती वेब साईट पडताळून पहा जेणेकरून आपले खाते सुरक्षित राहण्यास मदत होईल.
६) सावधानी बाळगा.
फेसबुक चा वापर करत असताना आपल्याला आलेले अनावश्यक मेसेज कडे दुर्लक्ष करायला शिका काही मेसेज असे असतात ज्या पासून आपल्या फेसबुक च्या खात्याला धोका असू शकते, तर काही मेसेज मध्ये लिंक शेयर केलेली असते ज्या लिंक वर आपली एक क्लिक आपल्या खात्याला धोक्यात आणू शकते. म्हणून आपले फेसबुक चे खाते वापरत असताना सावधानगी बाळगा.
आपल्या खात्याला जास्तीत जास्त गोपनीय ठेवण्याचे प्रयत्न करावे जेणेकरूण आपले खाते सुरक्षित राहू शकेल.
ह्या काही छोट्याश्या टिप्स आपले फेसबुक चे खाते सुरक्षित ठेवू शकतात.
आणि आशा करतो कि आपल्याला आजच्या लेखातून काहीतरी शिकायला मिळाले असेल.
आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
THANK YOU!