Bullet Proof Jacket Information
बऱ्याच चित्रपटांमध्ये आपल्याला पाहायला मिळते की पोलीस आणि गुंडांमध्ये गोळीबार होतो आणि झालेल्या गोळीबारा मध्ये गुंडही गोळीबार करतात आणि पोलिसही, पण पोलिसांवर गुंडांनी केलेल्या गोळीबाराचा प्रभाव होतच नाही आणि त्यामुळे पोलिसांची बाजू बळकट होऊन पोलीस गुंडांवर विजय प्राप्त करण्यास यशस्वी ठरतात, पण असे का झाले काही जादू तर नसेल ना पण तेव्हा आपल्या लक्षात येते की जादू वगैरे काही नव्हती पोलिसांनी त्या गोळीबारात बुलेटप्रूफ जॅकेट चा वापर केलेला असतो, म्हणून त्यांच्यावर गोळीबार झाल्यावर सुध्दा ते त्या गोळीबारातून वाचले, काय आहे हे बुलेटप्रूफ जॅकेट आणि काय कार्य करते हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत तर चला मग पाहूया..
बुलेटप्रूफ जैकेट हे कसं बनते आणि कसं काम करते? – How to make Bulletproof Jacket And Information
बुलेटप्रूफ जॅकेट म्हणजे नेमकं काय असतं? – What is Bulletproof Jacket
एक प्रकारचे असे जॅकेट जे सैनिकांना गोळीबारापासून वाचवू शकते, ज्याचा वापर सैनिक किंवा पोलीस दुश्मनांच्या विरोधात गोळीबार करताना करतात. आणि गोळीबारापासून स्वतःची सुरक्षा करू शकतात. या जॅकेट वर बंदुकीच्या गोळीचा प्रभाव पडत नाही आणि बंदुकीची गोळी या जॅकेट ला पार करून जाऊ शकत नाही, या जॅकेटला बुलेटप्रूफ जॅकेट म्हटल्या जात.
बुलेटप्रूफ जॅकेट कशापासून बनतं? आणि याची रचना कशी असते? – Bulletproof Jacket Made by
या जॅकेट ला बनविण्यासाठी एका विशिष्ट मटेरियल चा वापर केला जातो, सुरुवातीला काही विशिष्ट फॅब्रिक चे निर्माण केल्या जाते. आणि त्यांनंतर या जॅकेट ला बनविण्यासाठी फायबर आणि कवच चे निर्माण केल्या जाते. या मटेरियल चे वजन खूप कमी असते, आणि या जॅकेट ला बनविण्यासाठी मुख्यतः पॅरा रैमिड सिंथेटिक फायबर चा वापर केला जातो. या जॅकेट ला बनविण्यासाठी आणखी एका फायबर चा वापर केला जातो ज्याला डायनिमा म्हणतात. ज्या फायबर ला पॉलिथिन च्या साहाय्याने बनविल्या जाते. हे दोन पदार्थ खूप मजबूत असतात आणि हलके सुध्दा.
या जॅकेट मध्ये दोन लेयर असतात पहिली सिरॅमिक आणि दुसरी बॅलेस्टिक या दोन लेयर मिळूनच या जॅकेट चे निर्माण होते. जेव्हा गोळी या जॅकेट ला लागते तेव्हा पहिल्या लेयर मुळे गोळीचा नोकदार भाग तुटतो आणि बंदुकीची गोळी छोट्या छोट्या भागांमध्ये जॅकेट वर पसरते. त्यानंतर जॅकेट ची दुसरी लेयर गोळीचा प्रभाव कमी करते म्हणजेच वेगाने येणाऱ्या गोळीचा वेग कमी करते. परंतु या गोळीच्या वेगामुळे जॅकेट घातलेल्या व्यक्तीला थोडासा झटका लागतो.
आपण जर या एका जॅकेटची किमंत पाहिली तर या जॅकेटची किमंत जवळजवळ ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत आहे. आणि या एका जॅकेटचे वजन हे सात-आठ किलो पर्यंत आहे. या जॅकेटमुळे सैनिकांची बंदुकीच्या गोळ्यांपासून सुरक्षा होते.
आपल्याला या लेखाच्या आधारे बुलेटप्रूफ जॅकेट विषयी अधिक माहिती झाली असेल, आशा करतो लिहिलेलेला लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!