Resume Format in Marathi
समोरची व्यक्ती प्रभावीत होईल अशा पद्धतीने बनवा आपला रीझ्युम..!
आज शासकीय, खासगी ईत्यादि क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतांना दिसतात . अशा ठिकाणी आपल्यालाही नौकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण अशा ठिकाणी सगळ्यात आधी पाहिला जातो तो तुमचा रीझ्युम.
जेव्हा आपण नोकरीसाठी अर्ज करतो तेव्हा आपण आपला रीझ्युम त्या ठिकाणी पाठवतो. आपला रीझ्युम अधिक चांगला बनवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.
परंतु प्रत्येकजण एक चांगला रीझ्युम तयार करू शकत नाही आणि त्यात अनेक चुका करतो. रीझ्युम तुमच्याबद्दल बरेच काही सांगतो आणि इतरांना प्रभावित करण्यासाठी तो परिपूर्ण आणि अथर्पूर्ण असायला हवा.
तसे तर आम्ही आजच्या लेखात सांगणारच आहोत कि आपण रीझ्युम(CV) बनवताना कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे. जेणेकरून इंटरव्युव घेणाऱ्या व्यक्तीवर आपला चांगला प्रभाव पडेल आणि आपल्याला तेथे नोकरी मिळेल.
तर मित्रांनो,
चला जाणून घेऊया काही टिप्स ज्या आपल्याला रीझ्युम(CV) बनवून नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतील.
“नोकरी साठी रीझ्युम (Resume) बनवताय मग वाचा ह्या टिप्स!” – How to Make a Resume in Marathi
रीझ्युम कसा बनवायचा?रीझ्युम बनवितांना कोणत्या मुख्य गोष्टी लक्षात ठेवाव्यात –
पदाच्या आवश्यकतेनुसार –
- तुमचा रीझ्युम नेहमी पोस्टच्या गरजेनुसार तयार करा.
- रीझ्युम कोणत्या पदासाठी (पोस्टसाठी )मागितला गेला आहे आणि या पदावर काम करणाऱ्यासाठी कोणत्या प्रकारच्या व्यक्तीची आवश्यकता आहे ते पहा.
- त्या पदासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तुम्ही प्रथम ठेवा कारण अशा प्रकारे तुम्ही त्यांचावर प्रभाव टाकू शकता.
अवांतर किवा अनावश्यक गोष्टी टाळा –
असे बरेच लोक आहेत जे आपल्या रीझ्युममध्ये बराचश्या निरर्थक गोष्टी लिहितात. तुमच्या छंदाबद्दल थोडक्यात लिहा.
समोरच्या व्यक्तीला आवडणार नाही असे काहीही त्यामध्ये नको. तुमच्या रीझ्युममध्ये फक्त तुमच्यातील ठळक गुणांचाच उल्लेख करावा म्हणजे तुमची छाप समोरच्यावर चांगली पडेल.
कुठे काय लिहायचे –
- रीझ्युमच्या सुरुवातीला तुम्ही तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि तुम्ही जिथे राहता ते ठिकाण लिहा . याच्या मदतीने तुमच्याबद्दलची सुरुवातीची माहिती समोरच्याला एका नजरेत उपलब्ध होईल.
- यानंतर तुम्ही त्यांना तुमच्या शिक्षणाबद्दल संपूर्ण माहिती म्हणजेच काळ, कालावधी ईत्यादि लिहा.
- नंतर तुम्ही तुमचा कामाविषयीचा अनुभव जसे तुम्ही कुठे काम केले, किती दिवस काम केले, तेथील अनुभव काय होता, तुमच्या कामाचा वेग काय आहे इत्यादी.
- नंतर तुम्ही तुमच्या वैयक्तिक गोष्टी जसे की छंद, तुम्हाला काय आवडते ईत्यादि, तुमचा कायमचा आणि सध्याचा पत्ता, तुमची जन्मतारीख ई.
- यानंतर शेवटी, तुम्हाला पुढे कसे जायचे आहे..?, तुमचे करिअरचे ध्येय लिहा. जसे तुम्ही लिहू शकता, मला नेहमी शिकत आणि चांगले काम करत पुढे जायचे आहे. अशा गोष्टी लिहिल्याने समोरच्या व्यक्तीवर चांगला प्रभाव पडू शकतो.
- शेवटी दिलेली माहिती हि संपूर्ण सत्य आहे अशी ओळ टाकून सत्यापित करा.
- यानंतर तुमचे नाव, सही आणि तारीख यायला हवी.
रीझ्युम एका पृष्ठापेक्षा जास्त नको –
तुमचा रीझ्युम एका पानापेक्षा जास्त नसावा ही सर्वात मोठी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सर्व माहिती एका पानावर असावी,
तुमचा रीझ्युम असा असावा कि त्याची प्रिंट काढल्यानंतर तुमची सर्व माहिती फक्त एका पानात मिळायला हवी आणि त्यात सर्वकाही समाविष्ट असले पाहिजे.
रंग टाळा –
बरेच लोक त्यांची गुणवत्ता ठळक करतात आणि ते वेगळ्या रंगाने लिहितात किंवा वेगवेगळ्या प्रकारे डिझाइन करतात. पण ह्या गोष्टी टाळायला हव्या.
रीझ्युम साधा आणि सूटसुटीत ठेवा. यामुळे तुमची चांगली छाप पडेल.
फोन नंबर आणि मेल आयडी –
- तुमचा फोन नंबर आणि मेल आयडी नीट नमूद केलेला असावा.
- नेहमी एकच नंबर द्या आणि एकापेक्षा जास्त फोन नंबर टाकू नका.
- याशिवाय, तुम्ही ज्या मेल आयडीवरून त्यांना रीझ्युम पाठवत आहात तो एंटर करा.
- चांगला रीझ्युम बनवण्यासाठी तुम्हाला त्यात सोप्या गोष्टी लिहाव्या लागतील. समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काहीतरी जाणून घ्यायचे आहे पण थोडक्यात, त्यामुळे फार अवांतर गोष्टी त्यात लिहू नये
रीझ्युम बनविण्यासाठी आणखी काही महत्वाच्या टिप्स – More Tips for Writing Resume
१) क्वांटिटी पेक्षा क्वालिटी वर भर द्या! – Emphasize Quality Over Quantity!:
रीझ्युम(CV) बनवताना लक्षात ठेवा. तुम्ही तुमचा रीझ्युम बनवत आहात तुमच आत्मचरित्र नाही.त्यासाठी तुम्ही त्यामध्ये तुमच्यात असलेल्या फक्त क्वालिटी दाखवा.
तुमच्या जीवनाविषयी माहिती देत बसू नका.
आपला रीझ्युम हा शॉर्ट पण स्वीट असायला हवा. कारण तुमचा रीझ्युम त्या ठिकाणी तुमच प्रतिनिधित्व करत असतो. म्हणून आपण क्वालिटी वर भर द्यावा क्वांटिटी पेक्षा.
२) शब्दांचे स्पेलिंग तसेच विरामचिन्हे – Check Spelling and Punctuation:
आपला रीझ्युम बनवताना काही गोष्टींची काळजी घ्यावी ज्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रीझ्युम मध्ये योग्य ते शब्दांचे स्पेलिंग तसेच विरामचिन्ह वापरावे.
जर एखाद्या वाक्यात काही शब्दांचे स्पेलिंग चुकीचे असले किंवा शब्दांची रचना चुकीची असली तर ते वाक्य वाचायला अवघड जाते. म्हणून आपण बरेचदा गोंधळून जातो.
त्यामुळे आपणच नाही तर कोणतीही व्यक्ती गोंधळून जाऊ शकते. म्हणून जेव्हाही आपण आपला रीझ्युम बनवणार त्यावेळी या गोष्टींकडे लक्ष द्या.
३) पैशांचा उल्लेख नको – Do Not Mention Money:
आपला रीझ्युम बनवत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसे त्यामध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्या कोणत्या नको असायला हव्या.
त्यामध्ये नको असणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे त्यामध्ये पैशांचा उल्लेख कदापि नको असायला हवा.
जसे मला एवढे मासिक वेतन पाहिजे तेवढे पाहिजे, किंवा आपण जर त्याआधी कुठे नोकरी केली असेल तर त्या ठिकाणाचे मासिक वेतन टाकणे वगैरे वगैरे !
ह्या गोष्टींचा उल्लेख आपण जर आपल्या रीझ्युम मध्ये करता तर त्याविषयी नोकरी देणाऱ्यावर या गोष्टीचा वाईट प्रभाव पडू शकतो.
म्हणून आपल्या रीझ्युम मध्ये कुठेही पैशांचा उल्लेख करू नका.
४) आपल्या आवडी निवडी टाका – Mention YourInterest:
जीवनात प्रत्येकाला कश्याच्यातरी माध्यमातून काही गोष्टींची आवड निर्माण होते, ज्यामध्ये तो स्वतःच्या आवडी निवडी शिकून जातो.
आणि मोठे झाल्यावर त्याला त्या गोष्टींना वेळ देता येत नाही. पण तरीही त्या कला आपल्यात जिवंत राहतात.
तर बऱ्याच कंपनी मध्ये किंवा ऑफिस मध्ये त्यांच्या कामगारांसाठी कौशल्य विकासाची संधी असते.
म्हणून आपला रीझ्युम बनवतेवेळी आपल्या रीझ्युम मध्ये आपल्या आवडी निवडी टाकाव्या जेणेकरून आपल्याला भविष्यात त्या गोष्टीची मदत होईल.
५) सोशल मिडियाचे खाते हि टाकू शकता – Mention Your Social Accounts:
आजकाल एखाद्या व्यक्तीला चांगले जाणण्याचे साधन झाले आहे सोशल मिडिया ! जिथे प्रत्येक व्यक्तीच्या आवडी निवडी आपण जाणून घेऊ शकतो.
आपल्या रीझ्युम ला बनवत असताना आपण त्यामध्ये आपले सोशल मिडियाचे खाते हि टाकू शकता.
आपल्याजवळ असलेले फेसबुक,इंस्टाग्राम, लिंकडीन,ट्विटर इत्यादी खात्यांचा सामावेश आपण आपल्या रीझ्युम मध्ये करू शकतो.
त्याचा हि आपल्याला चांगल्याप्रकारे फायदाच होऊ शकतो.
६) तुमचा पत्ता टाकायला विसरू नका! – Mention Your Address:
आपल्या रीझ्युम मध्ये पत्ता टाकणे, म्हणजे आपण जेथे कायमस्वरूपी राहत असाल तो पत्ता टाकणे गरजेचे आहे.
जेणेकरून आपण जर त्या नोकरीसाठी निवडले जाता तर आपल्याला निवडल्या गेल्याचे पत्र आपल्या पत्त्यावरच भेटणार असते त्यासाठी आपण आपल्या रीझ्युम मध्ये आपला कायमस्वरूपी पत्ता टाकणे गरजेचे असते.
आणि आपण जर आपला पत्ता टाकायला विसरलो तर आपल्याला त्या नोकरी विषयी जी माहिती मिळायची असेल ती मिळणार नाही.
म्हणून आपण आपल्या रीझ्युम मध्ये पत्त्याचा उल्लेख करणे खूप आवश्यक आहे.
७) स्वतःची जाहिरात करा – Advertising Your Self:
येथे जाहिरात करणे म्हणजे ठीक ठिकाणी भिंतीला पोस्टर लावणे किंवा स्पीकर लाऊन किंचाळणे नसून तर आपल्या रीझ्युम मध्ये स्वतःला एका वेगळ्या पद्धतीने दर्शवणे होय.
त्यासाठी आपल्यात असलेल्या कला गुणांना कागदावर एका चांगल्या पद्धतीने उतरवणे म्हणजे स्वतःची जाहिरात करणे होय.
तर रीझ्युम मध्ये काही गोष्टी मांडण्याच्या वेळेस आपण लक्षपूर्वक त्या गोष्टींचा उल्लेख करायचे प्रयत्न करा जेणेकरून आपले वेगळे पण नोकरी देणाऱ्याला दिसून येईल. आणि आपल्याला ती नोकरी करायची संधी आपल्याजवळ चालून येईल.
८) अनुभव टाकू शकता – Add Your Experience:
आपण जर एका ठिकाणापेक्षा जास्त ठिकाणी काम केले असेल तर आपण आपल्या रीझ्युम मध्ये त्या ठिकाणांचा उल्लेख आपल्या रीझ्युम मध्ये करू शकता.
त्यावरून नोकरी देणाऱ्या कंपनीला कळून जाईल कि तुम्ही त्यांच्या कशा प्रकारे उपयोगी येऊ शकता.
आणि आपल्याला नोकरी मिळण्याची संधी चालून येऊ शकते. म्हणून रीझ्युम बनवतेवेळी आपण आपला अनुभव टाकायला विसरू नका.
९) साधेपणा ठेवा – Keep Simplicity:
आपल्या रीझ्युम मध्ये आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रीझ्युमला साधेपणा असणे गरजेचे आहे. आणि तसेच आपल्या रीझ्युमधील अक्षरं ठळक असणे आवश्यक आहे.
साधेपणामुळे आपल्या रीझ्युमधील प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे दिसून येईल. त्यासाठी आपल्या रीझ्युमला साधेपणा देण्याचे प्रयत्न करा.
१०) खात्री करून घ्या! – Make Sure:
म्हणतात ना “अति घाई संकटात नेई”म्हणजे एखाद्या कामाला आपण घाईमध्ये केले तर आपल्यावर संकट ओढवू शकते.
तसेही घाईमध्ये कोणती तरी गोष्टी आपल्या हातून बरेचदा राहून जातेच त्यासाठी आपला रीझ्युम बनवतांना कोणतीही घाई न करता आपण शांततेत आपला रीझ्युम बनवावा.
आणि शेवटी एक वेळ खात्री करून घ्यावी कि कोणती गोष्ट आपल्या रीझ्युम मध्ये टाकायची तर राहिली नाही ना!
वरील दिलेल्या गोष्टींना आपला रीझ्युम बनवितेवेळी लागू करा. आपण पाह्साल कि आपला रीझ्युम सर्वांपेक्षा उत्तम दर्जाचा बनलेला आहे.
तर आता तुम्हीही तुमचा रीझ्युम चांगल्या पद्धतीने बनवू शकता.
चला तर मग तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी आमच्या माझी मराठी कडून शुभेच्छा.ऑल दि बेस्ट..!
तर मित्रांनो, आपण आजच्या लेखात पहिल्या काही टिप्स ज्या आपला रीझ्युम बनवतेवेळी आपल्या कामात येतील.
आणि आशा करतो कि आपल्याला आजचा लेख आवडला असेल. आजचा लेख आवडला असेल तर ह्या लेखाला आपल्या मित्रांमध्ये शेयर करा.
तसेच सोबतच आपला अभिप्राय द्यायला विसरू नका. कारण आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे.
अजून असे वेगळे वेगळे लेख बघण्यासाठी आवर्जुन भेट द्या majhimarathi.com ला.