प्राणी आणि मानवामध्ये फक्त समज आणि ज्ञान यांचा फरक असतो. मानवाची बुद्धी विकसित झाली आहे आणि तो हळू हळू शिकत चालला आहे.
जर आजच्या काळात कोणताही मानव यशस्वी आहे तर त्याची एक गोष्ट नक्कीच चांगली आहे कि तो प्रत्येक क्षणी काहीना काही शिकत राहतो.
शिकत राहणे हि मानवाची ओळख आहे कारण कि, जो शिकत राहतो तोच जिवंत राहतो बाकीचे फक्त आपल्या जीवनातील वेळ व्यतीत होतांना बघत राहतात.
How To Learn From Everyone in Marathi – प्रत्येक माणसांपासून कसे शिकावे ?
मग आपण कोणत्याही क्षेत्रात असो प्रत्येक मानवास अनेक गोष्टी यायला पाहिजेत जसे कि डॉक्टरांना चांगल्याप्रकारे बोलता आले पाहिजे जे त्याच्या अभ्यासक्रमात शिकविले जात नाही.
एका चांगल्या सेल्समंनचा बोलण्याचा दृष्टीकोन चांगला हवा नाही तर त्याकडून कोणीच वस्तू विकत घेणार नाही.
यासाठीच म्हटले जाते कि लोक आपल्या कडील वस्तू पेक्षा आपल्या व्यक्तीरेखेला जास्त महत्व देतात मग ती वस्तू कोणतीही असो.
मग या व्यक्तिरेखा (attitude) ला कसे अंगीकारायचे जर डॉक्टर असेल तर त्यास चांगल्या प्रकारे बोलायला शिकायचे कोठून ?
या प्रश्नाचे उत्तर आहे कि, प्रत्येक मानव फक्त पुस्तक आणि पाठ्यक्रमीत शिक्षणापासून शिकत नाही.
काही गोष्टी आपल्याला लोकांकडून आणि आसपासच्या परिसरांतून शिकाव्या लागतील.
यासाठी आपल्याकडे प्रत्येकापासून शिकण्यासाठीची तांत्रिक पद्धत असायला हवी, जी मी या लेखाछंदात उल्लेखीत करणार आहे.
या ५ माध्यमाने आपण आपले ज्ञान प्रत्येक मानवाकडून घेवून वाढवू शकता.
चला मग या विषयास सुरु करू या. Learn from everyone
*सर्वात आधी आपल्या निरीक्षण शक्तीला वाढवा.
*निरीक्षणाचा अर्थ असा कि, तुम्ही किती बारकाईने छोट्यात छोटी वस्तूला पाहण्याचा समजण्याचा व ऐकण्याचा प्रयत्न करता.
जर तुम्ही कोणत्याही मनुष्यास भेटता त्याच्या बोलण्याच्या पद्धतीला समजा व शिका, त्याच्या उभे राहण्याच्या पद्धतीला समजा, त्याच्या चालण्याच्या आणि प्रत्येक क्रियेला समजून ती आत्मसात करा.
यासाठी तुमची निरीक्षण शक्ती जितकी चांगली असेल तेवढ्याच लवकर आपण लोकांना समजाल व त्यांच्या कडून शिकाल.
तुम्ही बसमध्ये, ट्रेनमध्ये, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाकडून शिकतांना इतके एकटीव होसाल कि प्रत्येक क्षणास तुम्ही काही ना काही शिकत राहाल.
तुम्हाला आळस दूर दूरपर्यंत दिसणार नाही. आळस ह माणसाला तेव्हा येतो जेव्हा माणसाकडे काही विलक्षण व विशेष करायला राहत नाही परंतु जेव्हा तुम्ही प्रत्येक माणसाकडून शिकाल तेव्हा तुम्हाला जीवन सुंदर आणि सुगम वाटेल.
इंटरनेटवर आपल्या क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्कात राहा
इंटरनेटवर बरेच भारतीय बऱ्याच वेबसाईट आणि You Tube वर चानल बनवत आहेत.
जर तुम्हाला वाटल तर त्यांच्याशी संपर्क करून संवाद साधून त्यांच्या कडून बरच काही शिकता येत.
त्यांनी लिहलेल्या ब्लॉगवर त्यांचे आर्टिकल्स वाचून किंवा You Tube च्या प्रत्येक ज्ञानाचा भांडार असलेले विडीओ पाहून पण शिकता येते.
आपल्यापेक्षा छोट्याकडूनही शिकता येते.
असं जरुरी नाही कि तुम्ही वयात आणि वर्गात ज्ञानी आहात म्हणून सगळ येत.
असं आपल्या डोक्यात नसाव कि आपल्याला सर्व काही येत.
अस जर केल तर आपल्या ज्ञानात भर पडत नाही.
आपल्याला प्रत्येक माणसाकडून ज्ञान घेत राहायचे आहे. ज्ञान घेत राहायचे आहे. ज्ञान घेण्यास नेहमी तयारीत असावे.
अयशस्वी लोकांकडूनही शिकावे.
हा हा ! ! तुम्हाला नक्कीच हे ऐकायला अजब वाटत असेल कि, त्यांच्याकडून काय शिकायचे? चला, मग एका उदाहनाद्वारे या गोष्टीला समजून घेवू.
समजा, तुम्ही एक मेडिकल उघडत आहात आणि माझी हि गोष्ट स्वीकारून एका अयशस्वी मेडिकल चालवणाऱ्या व्यक्तीशी भेटले व सल्ला घेतला तर तुम्हाला हि गोष्ट समजली कि चुकीच्या ठिकाणी मेडिकल उघडू नये.
मेडिकल उघडण्यास चांगली जागा पण पाहिजे.
सर्वात महत्वाचे :- लक्ष एका बाजूने
जर तुमचे लक्ष एकाच बाजूने असेल तर बारीक-सारीक गोष्टीकडे लक्ष जाणार नाही त्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता जेवढी चांगली असेल त्याच गतीने कोणत्याही समस्याचे निराकरण करू शकता.
*टीप लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही प्राणायाम करू शकता.
मग येथून सुरु होत आहे तुमच्या शिकण्याचा प्रवास कारण जो शिकत आहे तोच जिवंत आहे. ज्याने शिकणे बंद केले तो जिवंत प्रेत आहे.