Buy Mobile on EMI
कुठलीही वस्तू विकत घेताना आपल्याला त्या वस्तूची वाजवी किंमत मोजावी लागते. आणि त्या वस्तूची वाजवी किंमत मोजल्या नंतरच आपल्याला ती वस्तू खरेदी करता येते. मग ते कोणतीही वस्तू असो.
बरेचदा आपल्याजवळ आपली आवडती वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे उपलब्ध नसतात, त्यामुळे आपण ती वस्तू पैसे आल्या नंतर खरेदी करायचे ठरवतो पण आजच्या काळात तुंमच्याकडे मुभलक पैसे नसले तरीही तुम्ही कुठलीही वस्तू विकत घेऊ शकता. आणि त्या पैशांना महिन्यावारी भरू शकता. त्याला EMI असे म्हणतात.
तर आजच्या लेखात EMI म्हणजे काय आणि EMI ने मोबाईल कश्या प्रकारे विकत घेता येतो हे जाणून घेऊया तर चला पाहूया..
EMI वर मोबाईल कसा विकत घेतात – How to Buy Mobile on EMI
EMI म्हणजे काय? – What is EMI
EMI चा फुल फॉर्म Equated Monthly Installments असा होतो, म्हणजे एक ठरवलेली रक्कम ठरवलेल्या वेळेत आपल्याला भरावी लागते. याचा अर्थ असाच की आपण घेतलेल्या वस्तूच्या मोबदल्याची किंमत आपल्याला महिन्यावारी भरावी लागते. जसे आपण एखाद्या बँकेकडून किंवा एखाद्या कंपनी कडून घेतलेले कर्ज हप्त्याच्या माध्यमातून भरतो यालाच EMI म्हटल्या जात.
EMI वर मोबाईल कसा विकत घेतात? काय प्रक्रिया असते – How to Buy Mobiles on EMI
EMI वर एखादी वस्तू आपण दोन प्रकारे विकत घेऊ शकतो, एक ऑनलाईन माध्यमातून आणि एक ऑफलाईन माध्यमातून, ऑनलाईन माध्यमातून मोबाईल विकत घेण्यासाठी आपल्याला एखाद्या ई-कॉमर्स वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. आणि ऑफलाईन माध्यमातून मोबाईल विकत घेण्यासाठी आपल्याला एखाद्या मोबाईल च्या दुकानावर जावे लागेल.
आपल्याकडे जर क्रेडिट कार्ड्स असेल तर आपल्याला सहजरित्या EMI वर मोबाईल मिळून जाईल. आणि क्रेडिट कार्ड नसेल तर आपल्याला थोडं कठीण जाईल तर आपण सुरुवातीला क्रेडिट कार्ड चा वापर करून EMI वर मोबाईल कसा खरेदी करतात पाहूया..
खालील काही स्टेप फॉलो करून EMI वर विकत घ्या मोबाईल:
Step 1: सर्वात आधी आपल्याला इंटरनेट वर फ्लिपकार्ट,अमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपनी च्या वेब साईट वर जाऊन आपले खाते उघडावे लागेल जर आपले आधीच या साईटवर खाते असेल तर योग्यच.
Step 2: तुम्हाला हवा असलेला मोबाईल त्या ई-कॉमर्स साईट वर शोधा.
Step 3: त्या मोबाईल वर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला त्या पेज वर EMI चे ऑप्शन दिसतील, त्या EMI च्या ऑप्शन वर क्लिक करा आणि तुम्हाला हवा असलेला प्लॅन निवडा.
Step 4: हवा असलेला प्लॅन निवडल्या नंतर Buy Now वर क्लिक करा.
Step 5: Buy Now वर क्लिक केल्या नंतर तुमच्या क्रेडिट कार्ड ची माहिती भरावी लागेल ती माहिती योग्य प्रकारे भरावी.
Step 6: त्यानंतर तुमची ऑर्डर Place करा.
अश्याप्रकारे आपण क्रेडिट कार्ड च्या माध्यमाने EMI वर मोबाईल विकत घेऊ शकता.आणि जर कोणाकडे क्रेडिट कार्ड उपलब्ध नसेल तर काही वेबसाईट च्या माध्यमातून आपण एखादी वस्तू EMI वर विकत घेऊ शकता, फक्त त्या साईट्स वर आपल्याला व्हेरिफिकेशन करून मागितलेल्या कागदांची पूर्तता करावी लागते. आणि आपल्याला तेथूनही EMI वर एखादी वस्तू विकत घेता येते.
वरील लेखातून आपल्याला माहिती झाले असेल की EMI चा वापर करून कश्या प्रकारे आपण कुठलीही वस्तू विकत घेऊ शकतो.
आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!