Expensive Vegetables in the World
आपण कधी बाजारात गेलेले आहात काय? गेलेले असणार तर आपल्याला माहिती असेल कि एखादी भाजी विकत घेण्यासाठी जास्तीत जास्त किती रुपये मोजावे लागतात. बाजारातील एखाद्या भाजीचा भाव जास्तीत जास्त १५० किंवा २०० रुपये किलो असेल, किंवा त्यापेक्षाही कमी.
पण जगात अशीही एक भाजी आहे जिचा भाव हा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. आणि लोक या भाजीला विकत घेऊन खातात सुद्धा आणि या भाजीचे लोणचे सुद्धा बनवितात.
तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि कोणती आहे हि भाजी जिची किंमत हि लाखोंच्या घरात आहे, आणि हि भाजी एवढी महाग असेल तर या भाजीचे काही ना काही महत्व तर असेलच ना तर चला पाहूया या भाजीविषयी आणखी थोडी माहिती.
तर चला जाणून घेवूया, या सर्वात महाग भाजीविषयी.
जगातील सर्वात महाग भाजी, पहा किती आहे किंमत.- “Hop Shoots” Expensive Vegetables in the World
हि भाजी कोबी, टमाटर, आलू, यापैकी कोणतीही भाजी नसून या भाजीचे नाव “हॉप शूट्स” (Hop Shoots) असे आहे. आणि या भाजीच्या फुलाला हॉप कोन्स असे म्हटले जाते. याच फुलांचा वापर करून बियर बनविल्या जातात.
सोबतच या भाजीच्या बाकीच्या छोट्या छोट्या फांद्यांना जेवणामध्ये भाजी म्हणून वापरतात. या भाजीला जगातील सर्वात महाग भाजी म्हणून विकल्या जाते, बरेच श्रीमंत लोक या भाजीला विकत घेण्यासाठी मागे पुढे करतील,
या भाजीला आपल्याला फक्त एक किलो विकत घ्यायचे असेल, तर आपल्याला भारतीय चलनानुसार एका किलोसाठी ८२ हजार रुपये मोजावे लागतील.
या भाजीची शेती करण्यासाठी मार्च महिन्यापासून तर जून पर्यंतची योग्य वेळ असते. या भाजीला ब्रिटेन, जर्मनी आणि बाकीच्या युरोपीय देशांमध्ये उगविल्या जाते. या भाजीला उगविण्या करिता ऊन आणि जमिनीमध्ये थोड्याश्या प्रमाणात ओल असणे आवश्यक आहे.
एका दिवशी ६ इंचापर्यंत या भाजीची वाढ होते, वेळेत हि भाजी कापल्या गेली नाही, तर या भाजीच्या फांद्या खूप जाड्या होतात आणि या जाड्या फांद्या खायच्या कामात येत नाहीत.
सुरुवातीला या भाजीच्या फांद्या नारिंगी रंगाच्या असतात आणि यानंतर त्या फांद्या हिरव्या रंगामध्ये बदलतात.
हॉप शूट्स या भाजीचे फायदे – Benefits of Hops
- या भाजीमध्ये एंटीबायोटिक गुण पाहिले जातात.
- हि भाजी एखाद्या जडी-बुटीचे कार्य करते,
- दातांचे दुखणे या भाजीचे सेवन केल्याने कमी होऊ शकते.
- टीबी सारख्या काही बिमाऱ्या या भाजीचे सेवन केल्याने कमी होऊ शकतात.
- या भाजीचे सलाद करून आपण खाऊ शकतो.
- सोबतच या भाजीचे लोणचे केल्या जाऊ शकते.
आपल्यासारखा एक सामान्य माणूस या भाजीला विकत घेण्यासाठी हजार वेळा विचार करेल कारण हि भाजी आपल्या बजेट च्या बाहेर आहे. तरी सुद्धा जगात असेही काही लोक आहेत जे या भाज्यांना विकत घेऊन खातात.
तर हि होती जगातील सर्वात महाग भाज्यांपैकी एक भाजी आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असणार आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!