होळी निबंध – Holi Nibandh Marathi
आजच्या वैज्ञानिक युगात मनुष्य चंद्रावर देखील जाऊन पोहचला. परंतु बुद्धीबरोबर आपल्या मनाचा विकास होणेही तितकेच आवश्यक म्हणून कदाचित मन प्रसन्न ठेवण्यासाठी सणांची सुरुवात झाली असावी.
हाच भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे. होळी हिंदूंचा प्रसिद्ध सण आहे. होळी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात येते.
प्रत्येक सणाला काही ना काही ऐतिहासिक गोष्ट असते. त्याच प्रमाणे यालाही स्वत:चा एक इतिहास आहे.
हिरण्यकश्यपूनामक एक नास्तिक गर्विष्ठ राजा होता. त्याने स्वतः ला ईश्वर म्हणून घोषित केले आणि आपल्या प्रजेला सांगितले की, प्रजेने त्याची पूजा करावी जी व्यक्ती त्याची पूजा करणार नाही त्याला शिक्षा करण्यात येईल.
परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद विष्णूभक्त होता. आणि त्याने आपल्या पित्यास देव मानण्यास नकार दिला.
Marathi Information on Holi
हिरण्य कश्यपुला या गोष्टीचा खूप राग आला म्हणून त्याने प्रल्हाद ला खूप त्रास दिला.
परंतु प्रल्हाद त्याला देव मानण्यास तयार नव्हता शेवटी त्याने आपली बहीण होलिकेला बोलावलं, जिच्या जवळ ईश्वराने दिलेले एक असे वस्त्र होते ज्याला आग जाळू शकत नव्हती.
होलिका लाकडांच्या ढीगावर ते वस्त्र परिधान करून, प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली.
आणि ईश्वराचा चमत्कार पाहा!
होलिका जळून भस्म झाली पण प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही.
म्हणून जो ईश्वराच्या वरदानाचा दुरुपयोग करतो त्याच्यासाठी तेच वरदान अभिशाप बनते.
जसे होलिकेच्या बाबतीत घडले. सत्य काहीही असो परंतु ही घटना दरवर्षी आपणास पाप आणि अन्यायाची होळी करण्याचा उपदेश करते.
तुम्हाला माहिती आहे का होळीचा या सणाचा संबंध श्रीकृष्णाशी पण आहे.
गोप-गोपिकांची होळी फार प्रसिद्ध आहे. आज ही बरसान्याची होळी प्रसिद्ध आहे.
गोकुळ निवासी बरसान्याला जाऊन होळी खेळतात.
लोकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली लठमार होळी विख्यात आहे. तेथील गल्ल्यांमध्ये कृष्ण आणि राधेच्या प्रेमाचा वर्षाव होतो.
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात होळी खेळली जाते.
होळीच्या दिवशी लोक आपल्या गल्लीच्या चौकात लाकडे जमा करून खूप उंच होलिका (म्हणजे एक लांब लाकूड त्या लाकडांच्या ढीगात लावतात) बनवितात.
संध्याकाळी स्त्रिया नारळ धूप इ. नी होलिकेची पूजा करतात.
तिला फेऱ्या घालत दोरा गुंडाळतात. रात्री ठरलेल्या मुहूर्तावर होलिका दहन केले जाते. होळीत गव्हाच्या ओंब्या भाजून मित्रांमध्ये वाटून खातात.
Marathi Essay on “Dhulivandan”
होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगांची होळी असते. त्याला रंगपंचमी असे देखील म्हटल्या जाते.
प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जातो. यात लहानापासून थोरापर्यंत, गरीब, श्रीमंत सर्व जण भाग घेतात.
त्यात अल्लडपणा हर्षोल्हास असतो. तरुण युवकांच्या टोळ्या गात नाचत रस्त्यावर येतात.
पाण्यात व रंग मिसळून एकमेकांच्या अंगावर टाकतात. एकमेकांच्या तोंडाला लाल, गुलाबा रंग लावतात व एकमेकांना मिठ्या मारतात.
रंगीबेरंगी चेहरे आणि रंगीबेरंगी कपडे मजेदार दिसतात.
सकाळपासूनच बायका फराळाचे पदार्थ व मिठाया बनवू लागतात.
बाजारात तर १५ दिवस आधीच रंग, रंगांच्या पिचकाऱ्या मिळतात.
दुपारपर्यंत होळीचा गोंधळ संपतो. रात्री कविसंमेलन, करमणुकीचे कार्यक्रम होतात. त्यात लोक भाग घेतात.
परंतु आज काल होळीच्या दिवशी दारू पिऊन गोंधळ करतात
आणि होळीचा बेरंग करतात म्हणून होळीच्या दिवशी दारू पिऊन गोंधळ करू नये,
माती, शेण, तेजाब, अंगावर टाकू नये कुणावर होळी खेळण्याची जबरदस्ती करू नये.
होळी न खेळता इतरांपासून वेगळे राहु नये.
हाच एक असा सण आहे जो राग लोभ, जातिभेद, उच्च नीचतेची भावना नष्ट करतो.