History of Samosa in Marathi
समोसा आणि चटणी नाव जरी काढलं ना तर तोंडाला पाणी सुटतय. आपण नाश्त्यामध्ये समोसा आणि चटणी नेहमीच खात असतो. बऱ्याच लोकांना समोसा म्हणजे जीव कि प्राण आहे. अर्थात काय तर आपल्या देश्यात बहुसंख्य लोक समोसा प्रेमी आहेत असं म्हणन चुकीच ठरणार नाही.
मग प्रश्न असा येतो की समोसा बनविणे भारतात कसे सुरू झाले? आणि भारतात सुरू नसेल झाले तर हा पदार्थ कोठून भारतामध्ये आला. तर आजच्या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत की समोसा ही डिश भारतात कशी आली आणि त्यामागे काय इतिहास आहे. आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडणार, तर चला सुरुवात करूया..
समोस्याच्या पोटातील इतिहास, समोसा भारतात आला तरी कोठून – History of Samosa in Marathi
बऱ्याच जणांचे असे म्हणणे आहे की समोसा हा सर्वात आधी मध्य पूर्व च्या कोणत्या तरी देशातून आलेला आहे. इराण चे इतिहास एक लेखक अबूफजल बेहाईकी यांनी सुध्दा समोस्याचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केलेला आहे. ते लिहितात की इराण मधून १३ व्या किंवा १४ व्या शतकात समोसा हा मध्य आशियात आला. तेथे याला सम्बोसा या नावाने संबोधले जायचे. तेव्हाचे काही लेखकांपैकी अमीर खुसरो हे सुध्दा समोस्याविषयी सांगताना म्हणतात की समोस्याला राजेशाही जेवणात मटण, तूप, आणि कांद्याला मिळवून बनवत असत.
इब्ने बतूता हे १४ व्या शतकात बऱ्याच देशांमध्ये फिरले होते. आणि ते समोस्याला मुहम्मद बिन तुगलग यांच्या काळातील डिश म्हणतात. तेव्हा या समोस्याला समुशाक या नावाने ओळखले जायचे. याला मिट आणि वेगवेगळे ड्रायफ्रूट तसेच मसाले यांचे मिश्रण करून बनविल्या जात असे. १६ व्या शतकातील आइन-ए-अकबरी या पुस्तकात सुध्दा समोस्याचा उल्लेख केल्याचे दिसून येते.
समोसा किती प्रकारचा असतो? – Types of Samosas
जर आपण पाहिले तर समोसे साधारणतः दोन प्रकारचे असतात. एक शाकाहारी आणि एक मांसाहारी.
शाकाहारी समोस्या मध्ये आपल्याला आलू, मिर्ची, कांदा, कोथिंबीर, आणि काही मसाले यांचे मिश्रण करून समोस्याला बनविल्या जाते, आणि यालाच शाकाहारी समोसा म्हणतात. हाच समोसा आपल्याला हैद्राबाद मध्ये आपल्याला मटण आणि आणखी काही मांसाहारी गोष्टींपासून बनल्याचे दिसून येते.
आपण जर मुंबईत असाल तर आपण समोसा आणि पाव चा आंनद घेऊ शकता, तसेच आपल्याला बर्याच ठिकाणी गोड समोसा सुध्दा मिळून जाईल. ओडिशा, पश्चिम बंगाल और झारखंड या राज्यांमध्ये समोस्याला सिंगारा म्हटल्या जात.
भारत सोडून आणखी कोणत्या देशात मिळतो समोसा ? – Which Countries get Samosa
भारत सोडून ब्राझील, पाकिस्तान, नेपाळ, मालदीव, बांग्लादेश, पूर्वोत्तर आफ्रिका च्या देशांमध्ये, इस्राईल, इंडोनेशिया, या देशात आपल्याला समोसा वेगवेगळ्या प्रकारात मिळून जाईल.
तर आजच्या लेखात आपण पाहिले समोस्या विषयी थोडक्यात माहिती. आशा करतो आपल्याला हा लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!