Hindi Diwas mahiti
आपल्या भारत देशात दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेच्या विकासाची समिक्षा करत या दिवसास साजरे केले जाते. १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी ला भारताच्या कार्यकारी आणि राष्ट्रभाषेचा दर्जा अधिकारीक रूपात देण्यात आला तसेच संपूर्ण देशात १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आज आपण हिंदी दिवसाविषयी माहीती जाणून घेउया.
हिंदी दिवसाचे महत्व आणि इतिहास – Hindi Diwas Mahiti
हिंदी दिवस भारतात सर्व शाळा, कॉलेज, ऑफिस, विविध संस्थांच्या कार्यालयात, खाजगी कार्यालयात, बॅंका इतर कार्यप्रवण स्थळांवर मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. कार्यक्रमात हिंदी विषयी जनजागृती केल्या जाते. हिंदीचा वापर आणि प्रसार करण्याहेतू विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. वक्तृत्व, नाटयस्पर्धा, कविता व निबंधस्पर्धा, वाचन स्पर्धा, इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते.
या स्पर्धांमधून आपणांस हिंदी विषयी ज्ञान व आदर वाढविण्याची एक संधी मिळते. लेखन स्पर्धांमध्ये हिंदी भाषेचे महत्व आणि रोचक माहिती सांगितली जाते. संभाषण आणि विचार विनिमयात हिंदीचा प्रयोग करावा तसेच इंग्रजीचे वाढते महत्व लक्षात घेत हिंदीविषयी जनजागृती केली जाते. हिंदी विषयी आदर निर्माण करणे, हिंदीचा वापर लहानांमध्ये जास्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे याबाबत विविध मार्गांची अंमलबजावणी करण्यास प्रेरित केले जाते.
हिंदी जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणारी भाषा मानली जाते. जगात हिंदीचा वापर वाढवण्यासाठी प्रथम भारतात अहिंदी भाषीक राज्यांमध्ये हिंदीचा वापर जास्त करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. हिंदी पाकिस्तान, नेपाल, मॉरिशस, बांग्लादेश, सूर्रानाम या देशांमध्येही बोलली जाते. भारतात सर्वाधीक लोक मातृभाषा म्हणून हिंदीचा प्रयोग करतात.
हिंदी दिवसानिमित्य राष्ट्रपतींच्या हस्ते विविध अवार्ड आणि पुरस्कार दिले जातात. दिल्ली येथील विज्ञान भवन येथे दरवर्षी प्रमाणे वार्षीक समारोह घेतला जातो. त्यात हिंदीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना विशेष पारितोषिके आणि प्रोत्साहन दिले जाते. शासकिय कार्यालयातील हिंदी विषयक उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना विशेष प्रोत्साहन दिले जाते. भारत सरकारने २५ मार्च २०१५ रोजी हिंदीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठीच्या दोन अवार्डचे नाव बदलले होते. त्यापैकी राजीव गांधी राष्ट्रीय ज्ञान विज्ञान मौलीक पुस्तक लेखन पुरस्कार चे नाव बदलून राजभाषा गौरव पुरस्कार व इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार चे नाव बदलून राजभाषा किर्ती पुरस्कार केले.
हिंदीतील नामवंत लेखक व कवीसोबत उत्कृष्ट लेखन कार्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे आणि आपल्याला त्याचा सन्मान आणि अंगिकार करणे हा आपल्या देशाचा सन्मान मानला पाहिजे. जगात प्रत्येक देशाची राष्ट्रभाषा आहे. हिंदी भारताची राजभाषा आहे. भारतात अजूनही हिंदीस राष्ट्रभाषेचा अधिकृत हक्क मिळाला नाही.
कारण भारतात प्रत्येक राज्यात आपली राज्यभाषा अस्तित्वात आहे. तरीही हिंदीचा प्रयोग सर्वाधिक होतो. काहीच राज्यांमधे हिंदीस इंग्रजीसोबत दूय्यम स्थान प्राप्त आहे. त्यामुळे देशात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेस खऱ्या अर्थाने हिंदीस राष्ट्रभाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.
आज अनेक राज्यांमध्ये इंग्रजी हिंदीपेक्षा जास्त महत्वाची मानली जाते. हिंदी बोलणे एक सर्वसाधारण स्तरीय मानले जाते. इंग्रजीचा वापर बोलणे आणि इतर प्रकारे करणे एक उच्च दर्जाचा मान प्राप्त करते त्यामुळे हिंदी विषयी आदर कमी होवू न देण्यासाठी हिंदीचा वापर वाढविणे जरूरी आहे.
भारत सरकारने आपल्या शासकीय व निमशासकीय संस्थांचा कारभार हिंदीतून करणे बंधनकारक मानले आहे. सोबत इंग्रजीचाही पर्याय दिला आहे त्यामुळे हिंदीचा सन्मान वाढविणे जरूरी आहे. देशाच्या विकासात त्याच्या राष्ट्रभाषेचा मोलाचा सहभाग असतो. मुळातच आपली संस्कृती हिंदीशी पुर्णपणे जुळली आहे.
तसेच देशाच्या विकासात राष्ट्रभाषेचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदीचा विकास हा राष्ट्राच्या विकासास सहाय्यक ठरू शकतो. भारताच्या इतिहासाची माहिती आपणास हिंदीतून मिळते साहित्य कला आणि वाङ्मयाचा परिचय हिंदीतून मिळतो. पूढील पिढीस हिंदीच्या इतिहासाबाबत तसेच हिंदीच्या सांस्कृतिक महत्वास जाणणे फार जरूरी आहे.
आज युवावर्गात इंग्रजी आणि इतर विदेशी भाषा शिकण्याचे वेड लागले आहे. त्यामुळे या सर्वांत हिंदीचे महत्व टिकून ठेवण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन हिंदी विषयी आदर निर्माण करणे फार जरूरी आहे. आपण सर्वांना हिंदीवर गर्व असावा. देशभरात हिंदी बोलण्यात केव्हाही कोठेही लाज वाटायला नको असे जर होत असेल तर हा आपल्या राष्ट्राचा अपमान मानल्या जाईल. त्यासाठी सामान्यांमध्ये देशाप्रती जागृती निर्माण करणे आणि हिंदीचे महत्व समजावून सांगणे या करीता हिंदी दिवसाची संकल्पना तयार झाली.
ज्या प्रमाणे आपण राष्ट्राच्या विविध प्रतिकांचे योग्य तो आदर सत्कार करतो त्याच प्रकारे देशाची एक प्रमुख भाषा ज्यास आपण राष्ट्रभाषा म्हणतो तर हिंदी आपली अप्रत्यक्षरित्या राष्ट्रभाषा आहे त्यामुळे तिचा सन्मान नक्कीच व्हायला पाहीजे प्रत्येक नागरीकांचे परम कर्तव्य आहे की आपल्या राष्ट्रभाषेचा आदर करावा.
बहुसंख्य भारतीयांची मातृभाषा हिंदी आहे हिंदी भाषा जगातील प्राचीनतम भाषांपैकी एक मानली जाते. हिचा स्वतंत्र इतिहास, संस्कृति आदि अपार साहित्य रचनांचा भंडार आहे ज्यांमध्ये कलेचे सर्व अंगांचा समावेश आहे. त्यामुळे एवढया प्रगाढ भाषेप्रती आपणांस गर्व आणि भाग्यशाली समजावे.
हिंदी दिवस हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी खऱ्या अर्थाने हिंदी विषयी आपले प्रेम आपण सर्वांसमोर अभिप्रेत करू शकतो. हिंदीच्या अंगीकाराने कोणकोणते फायदे होवू शकतात त्याचा राष्ट्रविकासात कसा सहभाग होऊ शकतो तसेच आपल्या सर्वांमध्ये राष्ट्रभावना कशी निर्माण केली जाते हा हिंदी दिवस साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे.
शिक्षणात स्पर्धापरीक्षा आणि साहित्यात योगदान इतर सर्व बाबतीत हिंदी विषयी अनुकुलता निर्माण करणे तसेच संगीत कला साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात हिंदीचे योगदान काय यावरही प्रकाश टाकला जातो. शाळा कॉलेज संस्था कार्यालये आकाशवाणी प्रसारमाध्यमे यांसोबत प्रत्येक संपर्काच्या ठिकाणी हिंदी वापरण्यास कसा वाव मिळेल हे जाणले जाते. आपणही हिंदी विषयी आदर व्यक्त करणे, आपल्या मातृभाषेसोबतच हिंदीचाही एक संपर्काच्या दृष्टीने उपयोग करावा. राष्ट्रनिर्माणात हिंदीचे योगदान आणखी मजबूत करावे हे गरजेचे आहे.
अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझीमराठी सोबत.
धन्यवाद!