Haunted Places in Maharashtra
मंडळी आपल्याला घाबरायला आवडतं? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला! अहो खरच आपल्यातलेच काही लोक असे असतात की त्यांना घाबरायला फार आवडतं!
उदाहरणच घ्यायचं झालं तर आता बघाना एखादा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हां आपल्याला ठाऊक असतं की तो चित्रपट भुताचा आहे, भितीदायक आहे, रहस्यमय आहे तरी देखील आपण पैसे देऊन ती भिती विकत घेतो….. आहे की नाही गंमत
मॉलमधे देखील आजकाल Ghost house पहायला मिळतातच की! आपण पैसे देउन तिकीट काढुन जातो आत स्वतःला घाबरवायला.
हा हा हा…. मंडळी Human Behaviour अर्थात मानवी स्वभाव असं आपण म्हणु शकतो.
आवडतं आपल्याला घाबरायला!
मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात देखील अशी काही ठिकाणं आहेत ज्यांच्याबद्दल ब.याच रहस्यमय आणि भुताटकी गोष्टी जोडल्या गेल्या आहेत.
या लेखात अश्याच काही ठिकाणांबद्दल आपल्याला अवगत करीत आहोत.
महाराष्ट्रातील रहस्यमय ठिकाणे – Haunted Places in Maharashtra
शनिवारवाडा – Shaniwar wada
पुणे तिथे काय उणे! अगदी खरय मित्रांनो, विदयेचे माहेरघर असलेल्या पुण्यात पेशव्यांचा शनिवारवाडा अतिशय प्रसिध्द अशी वास्तु आहे.
या शनिवारवाडयाला घेउन अनेक रहस्यमय कथा नेहमी ऐकायला मिळतात.
शनिवारवाडयात नारायणराव पेशव्यांना रघुनाथरावांनी धरायचे आदेश दिल्यानंतर आनंदीबाईंनी ध चा मा केला आणि त्यांना जिवानीशी मारण्यात आले. त्यांच्या शेवटच्या किंकाळया “काका मला वाचवा” आज देखील या वाडयात ऐकायला मिळतात.
या महालात त्यांची आत्मा भटकत असल्याचे सुध्दा बरेच जण सांगतात. त्यांच्या रडण्याचा ओरडण्याचा आवाज कित्येकांनी ऐकल्याचे सुध्दा सांगितले जाते.
पुण्यासारख्या आधुनिक शहरात आज देखील ही वास्तु एक रहस्य होवुन उभी राहिलेली आपल्याला दिसते.
मुंबई येथील डिसुजा चाळ:
मुंबईत पुर्वी प्रचंड प्रमाणात चाळी अस्तित्वात होत्या. या चाळींची राहाणीमानाची आपली एक वेगळीच संस्कृती होती
कुणीही कधीही कुणाच्या घरात डोकावु शकत होतं. एका कुटुंबाकडे आलेले पाहुणे संपुर्ण चाळीचेच पाहुणे असायचे
कालांतराने या चाळी पडुन येथे मोठमोठया ईमारती आणि मॉल्स उभे राहिले. परंतु आजदेखील काही चाळी मुंबईत अस्तित्वात आहेत.
मुंबई येथील डिसुजा चाळ येथील विहीरीत पाणी काढतांना एका महिलेचा बुडुन मृत्यु झाला. ती महिला कित्येकांना आज देखील विहीरीजवळ फिरतांना दिसत असल्याचे किस्से आहेत. त्या महिलेचा चेहेरा फार भेसुर आणि भयावह असल्याचे पाहाणा.यांचे म्हणणे आहे.
राजकिरण हॉटेल लोणावळा – Rajkiran Hotel Lonavala
थंड हवेचे ठिकाण लोणावळा! ब.याच प्रमाणात पर्यटक या ठिकाणी फिरण्याकरता आणि सुट्ठीचा आनंद एन्जॉय करण्याकरता येथे येत असतात.
अश्या या लोणावळयात एक प्रसिध्द हॉटेल आहे राजकिरण!
या हॉटेलमधील तळमजल्यावर असलेली एक रूम ज्यामधे जो कोणी राहातो तो दुस.या दिवशी काही ना काही किस्सा घेउनच हॉटेलच्या बाहेर पडतो.
हॉटेलरूम मधे राहिल्यानंतर प्रवाश्यांचे म्हणणे आहे की रात्री अचानक हवा सुरू झाली, खिडक्यांचे पडदे उडायला लागले. काहीजण म्हणतात की रात्री झोपल्यानंतर कुणी तरी बेडवरची चादर ओढत असल्याचे देखील जाणवते.
प्रवाश्यांच्या या अनुभवानंतर ही रूम आता नेहमीकरता बंद करण्यात आली आहे.
हॉटेल ताज मुंबई – The Taj Mahal Palace
मुंबई ला आल्यानंतर हॉटेल ताज न पाहाता कुणीही पर्यटक सहसा माघारी फिरत नाही.
गेट वे ऑफ इंडिया च्या एका बाजुला विशाल समुद्र तर एका बाजुला आलिशान असे दिमाखात उभे असलेले हॉटेल ताज!
सामान्य माणसाला या हॉटेल मधला खर्च तसा न परवडणाराच!
पण निदान त्याच्या बाहेर उभे राहुन फोटो काढण्याचा मोह त्याला आवरत नाही.
असे हे हॉटेल ताज…. पण ही गोष्ट फार कमी लोकांना माहित असेल की ज्या वास्तुरचनाकराने या हॉटेल ची निर्मीती केली त्याचा मृत्यु या हॉटेलमधेच झाला!
वाचण्यात असे आले आहे की त्याने स्वतः या हॉटेल मधे आत्महत्या केली होती कारण तो ज्या पध्दतीचे डिझाईन बनवण्यास ईच्छुक होता तसे काही केल्या तयार झाले नाही
तेव्हांपासुन येथे येणा.या पाहुणे मंडळींच्या मते या हाॅटेल मधे नेहमी कुणाची तरी सावली दिसत असते.
संजय गांधी राष्ट्रीय उदयान मुंबई – Sanjay Gandhi National Park
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उदयान अतिशय प्रसिध्द असुन सकाळ संध्याकाळ येथे येणा.यांची बरीच संख्या आहे.
मॉर्निंग वॉक करता देखील येथे मोठया प्रमाणात रहिवासी येत असतात. या ठिकाणी हवेत वेगात जाणा.या सावल्या बरेचदा दिसत असल्याचे कित्येकांचे म्हणणे आहे.
येथील सुरक्षा रक्षक देखील म्हणतात की येथे बरेचदा त्यांना हवेत क्षणार्धात नाहीश्या होणा.या सावल्या दिसल्या आहेत.
मुंबईतील भितीदायक ठिकाणांमधे या राष्ट्रीय उदयानाचा समावेश केला जातो. गडद छाया या ठिकाणी बरेचदा दिसत असल्याचे कित्येकांचे म्हणणे आहे.
कित्येकदा येथे उडणारे पक्षी अचानक गायब होउन जातात किंवा मेलेले आढळतात त्याचे नेमके कारण अदयाप देखील कुणालाही सांगता आलेले नाही.
मलबार हिल येथील टॉवर ऑफ सायलेंस:
मुंबईत मलबार हिल या चांगल्या नावाजलेल्या भागात टॉवर ऑफ सायलेंस हे पारशी लोकांचे कब्रस्तान प्रख्यात आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर अश्या तरूणीला रात्रीच्या वेळी पाहिल्याचे लोक सांगतात. ही तरूण स्त्री येणा.या जाणा.या लोकांना थांबवुन लिफ्ट मागते.
या शिवाय या ठिकाणी एका पारशी कुटूंबाला देखील नेहमी पाहिल्याचे लोक सांगतात ज्यांच्या या भागात कार अपघात झाला होता. हे कुटुंब आपली कार खराब झाल्याचे सांगुन इतरांना आपल्याकडे येण्यास आकर्षीत करतात आणि मदतीकरता विनंती देखील करतात
अनेकांना यांचा कटु अनुभव आल्याची देखील उदाहरणं आहेत.
नागपुर चे मेडीकल कॉलेज फार प्रख्यात असुन गरीब जनतेकरता ते वरदाना पेक्षा कमी नाही. तेथे अतिशय कमी दरात आणि निशुल्क उपचार होत असल्याने नेहमीच मोठया प्रमाणात गर्दी पहायला मिळते. हे मेडीकल कॉलेज आणि तिथला परिसर नेहमीच एक रहस्य बनुन राहिलाय.
अनेक कथा त्यामागे ऐकायला मिळतात. शवागार परिसर भुतीया परिसर म्हणुन ओळखला जायचा. अनेक प्रेतात्मा या ठिकाणी भटकत असल्याच्या कहाण्या आजही कित्येकजण सांगतात.
येथे शिकाऊ नर्सेस नी देखील आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे या वातावरणात अधिकच भितीदायक वातावरणाची भर पडली.
संध्याकाळ होताच हा परिसर निर्मनुष्य होउन जातो.
मुकेश मिल्स कुलाबा मुंबई:
अनेक आत्मांचे निवासस्थान म्हणुन कुलाबा येथील मुकेश मिल्सकडे पाहिले जाते. अत्यंत भयग्रस्त जागा असुन त्यामुळे सहसा कुणीही येथे येण्यास धजत नाही.
पुर्वी येथे अनेक रहस्यमय आणि भुताटकी चित्रपटांचे चित्रीकरण होत असे. पण आता या मिल मधे चित्रीकरण करायचे जरी म्हंटले तरी संपुर्ण टिम च्या अंगावर काटे उभे राहातात. येथे येण्या.यांना अनेक विचीत्र अनुभवांना सामोरे जावे लागते
ज्या कलाकारांनी येथे चित्रीकरणादरम्यान अनेक भयप्रद अनुभव घेतले आहेत ते तर याच्या नावाने देखील कापतांना दिसतात. भारतातील भयग्रस्त जागांमधे मुकेश मिल्स चा समावेश नेहमीच अग्रक्रमावर राहिलेला आहे.
ग्रॅंड पॅराडी टॉवर मुंबई:
या टॉवर च्या निर्मीती नंतर आजतागायत येथे जवळजवळ 20 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत.
लहान मुलांपासुन तर वृध्द लोकांपर्यंत लोकांच्या आत्महत्या या ईमारतीवरून आजतागायत झाल्या आहेत.
कित्येकांनी तर आपल्या मुलांसमवेत खिडकीमधुन उडी घेउन जिवन संपवले आहे. येथे घरकाम करणा.या कामगार बायांनी देखील आत्महत्या केल्याचे किस्से आहेत.
या सर्व घटनांमागे एक दृष्ट शक्ती कार्यरत असल्याचे देखील येथे बोलल्या जाते.
सगळयात जास्त आत्महत्या येथील आठव्या मजल्यावरून झाल्या आहेत.
अश्या घटना जास्त घडल्या की ते ठिकाण आपोआप भयाने ग्रासले जाते.
शासकिय स्त्री रूग्णालय अकोला:
अकोल्यातील शासकीय रूग्णालय देखील या गोष्टींमुळे चांगलेच नावाजलेले आहे.
अमावस्या पौर्णिमा या काळात येथे चित्रविचीत्र घटनांमधे वाढ होत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात.
या ठिकाणी एका वार्ड मधे एका गर्भवती महिलेचा मृत्यु झाला असुन तिची आत्मा आज देखील दिसत असल्याचे सांगतात. त्या वार्ड कडे आज देखील नर्सेस जातांना घाबरतात.
सायंकाळी आणि रात्री येथे कुणी एकटे दुकटे जाण्याची हिम्मत देखील करत नाही.
बरेच जणं येथे अनेक शापीत शक्तींचा संचार असल्याचे अनुभव वारंवार येत असल्याचे सांगतात.
या सर्व घटनां ऐकण्यात आल्या आहेत. सांगोपांगी घटना असल्याने त्यात जेवढी तोंड तेवढे अनुभव असे आहे.
लेखकाचा लेख लिहीतांना या घटना घडलेल्याच आहेत असा कोणत्याही प्रकारचा दावा नाही. या घटनांमधे कोणतेही साधम्र्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
नक्की वाचा:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी महाराष्ट्रातील रहस्यमय ठिकाणांबद्दल माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्