Hartalika Aarti in Marathi
आरती संग्रह या लेखाच्या माध्यमातून आज आपण हरतालिकेच्या दिवशी देवी पार्वती यांना अनुसरून पठन करण्यात येणाऱ्या देवी हरतालिकेच्या आरतीचे लिखाण करणार आहोत. आपल्या माझी मराठीच्या महिला मैत्रीणीना हरतालिका निमित्त या आरतीचे पठन करता यावे या उद्देश्याने आम्ही या आरतीचे लिखाण केलं असून आपण सर्व महिला मंडळींनी या हरतालिका आरतीचे पठन करावे. याशिवाय, आज आपण या लेखात हरतालिका पुजे संबंधी थोडक्यात लिखाण करणार आहोत आणि त्या पूजेचे महत्व समजवून घेणार आहोत. तरी आपण या लेखाचे आवश्य वाचन करावे.
हरतालिकेची आरती – Hartalika Aarti in Marathi
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें। ज्ञानदीपकळिके।। धृ.।।
हरअर्धांगी वससी। जासी यज्ञा माहेरासी।
तेथें अपमान पावसी। यज्ञकुंडींत गुप्त होसी। जय. ।।1।।रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी।
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ।।जय. ।।2।।तापपंचाग्निसाधनें। धूम्रपानें अधोवदनें।केली बहु उपोषणें। शंभु भ्रताराकारणें। ।।जय.।।3।।
लीला दाखविसी दृष्टी। हें व्रत करिसी लोकांसाठी।
पुन्हां वरिसी धूर्जटी। मज रक्षावें संकटीं।। जय.।। 4।।काय वर्ण तव गुण। अल्पमति नारायण।
मातें दाखवीं चरण। चुकवावें जन्म मरण। जय. देवी।।5।।
हिंदू धार्मिक कथानुसार हिंदू धर्मातील महिला आणि कुमारीकांसाठी सांगण्यात आलेले सर्वात पवित्र आणि महत्वपूर्ण व्रत म्हणजे हरतालिका हे व्रत होय. या व्रताचे विशेष असे महत्व असल्याने महिला व कुमारिका मोठ्या संख्येने हे व्रत दरवर्षी करीत असतात. आपले सौभाग्य अखंड रहावे या करिता हे हरतालिका व्रत केलं जाते.
हिंदू धार्मिक पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले जाते.
हरतालिकेची पौराणिक कथा – Hartalika Vrat Katha in Marathi
या व्रताबद्दल पौराणिक कथा देखील प्रसिद्ध आहे. या व्रतानिमित्ताने महिला व कुमारिका भगवान शंकराची आराधना करत असतात. हरतालिका या नावातील हरि म्हणजे भगवान विष्णू होय.
या दिवसाचे विशेष महत्व सांगायचं म्हणजे देवी पार्वती यांनी भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या सख्यांना सोबत घेऊन आरण्यात गेल्या आणि त्याठिकाणी त्यांनी शिवलिंग उभारून त्याची मनोभावे पूजा केली. तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेचा.
हरतालिका कथेत वर्णिल्या प्रमाणे, देवी पार्वती भगवान शंकर यांची पूजा करण्यासाठी आपल्या सख्यांसोबत घनदाट आरण्यात गेल्या. आरण्यात गेल्यानंतर त्यांनी नदीत स्नान केले आणि शिवांची पूजा करण्यासाठी नदीकाठी नदीतील रेती आणून त्यापासून सुंदर शिवलिंग तयार केले.
यानंतर अरण्यातील विविध वनस्पतींची पाने, फुले आणि फळे गोळा करून त्यांची सुरेख पूजा मांडली तसचं, त्या दिवशी निरंकार व्रत केले. माता पार्वती यांचे हे कठोर व्रत पाहून भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले.
भगवंतानी माता पार्वतीला वर मागण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी, महादेवाला विनंती केली की, आपण माझ्या सोबत लग्न करावे. तेव्हा भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होवून त्यांनी माता पार्वतीला आशीर्वाद दिला.
अश्या स्वरुपात हरतालिके संबंधी पौराणिक कथा प्रचलित असून कालांतराने हे व्रत हरतालिका या नावाने प्रसिध्द झाले. हिंदू धर्मातील महिला आणि कुमारिका हे व्रत करीत असतात. या व्रताचे काही नियम असून त्या दिवशी महिला पाणी ग्रहण न करता निरंकार व्रत करतात. या दिवशी महिला हरतालिका कथेत वर्णिल्या प्रमाणे पूजा मांडून भगवान शिवाची आराधना म्हणून हरतालिका कथेचे पठन केले जाते.
हरतालिका कथेचे पठन पूर्ण झाल्यानंतर आरती म्हटली जाते. या दिवशी महादेवाच्या मंदिरात महिलांची खूपच गर्दी असते. रात्रभर हरतालिका कथा हरिपाठ तसचं, आरतीचे पठन करून दुसऱ्या दिवशी विधिवत पूजा आरती करून या पूजेचे समापन करण्यात येते.