Harshad Mehta Information
“स्कॅम १९९२” वेब सिरीज आल्यापासून सगळीकडे प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव आहे ते म्हणजे हर्षद मेहता. एकेकाळी शेयर मार्केट चा अमिताभ बच्चन म्हणून ओळखल्या जाणारी व्यक्ती म्हणजे हर्षद शांतीलाल मेहता. शेयर मार्केट मधून स्वतःची एक ओळख निर्माण केली आणि याच शेयर मार्केट मधून त्याने पैशांची कमाई केली. तर आजच्या लेखात आपण स्कॅम १९९२ मधील हर्षद मेहता यांच्या विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला लिहिलेली माहिती आवडणार.
“द बिग बुल’’ हर्षद मेहता – Harshad Mehta
हर्षद मेहता यांचे सुरुवाती जीवन – Harshad Mehta Biography
हर्षद मेहता यांचा जन्म गुजरात मध्ये २९ जुलै १९५४ ला एका गरीब परिवारात झाला होता, हर्षद यांच्या वडिलांचा साड्यांचा व्यवसाय होता आणि आई गृहिणी होती, हर्षद यांचे सुरुवातीचे जीवन हे छत्तीसगढ च्या रायपुर मध्ये गेले, त्यानंतर त्यांचे नशीब त्यांना घेऊन आले ते तेव्हाच्या बॉम्बे शहरात (आत्ताचे मुंबई शहर).
मुंबईच्या चाळीतील दोन खोल्यांमध्ये राहणारा एक साधा सरळ मुलगा देशाच्या अर्थव्यवस्थेला हलवणार असा विचार कोणीही केला नसेल. बीकॉम मध्ये आपले शिक्षण पूर्ण करून हर्षद यांनी न्यू इंडिया इन्शुरंस कंपनी लिमिटेड मध्ये सेल्समन चे काम केले. पण म्हणतात ना माणसाचे स्वप्न मोठे असतात तेव्हा त्याला कोणीही बांधून ठेवू शकत नाही त्याचप्रमाणे हर्षद यांचे सुद्धा त्या इन्शुरंस कंपनी मध्ये मन लागले नाही आणि त्यांनी एका ब्रोकरेज फर्म मध्ये नोकरी शोधली.
शेयर मार्केट मध्ये एंट्री – Harshad Mehta Story
या फर्म मध्ये त्यांनी जवळजवळ तीन वर्ष काम केले, येथे काम केल्यानंतर त्यांची शेयर मार्केट मध्ये रुची वाढली. आणि या तीन वर्षात त्यांनी एवढा अनुभव घेऊन घेतला. कि त्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी १९८४ साली बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची मेंबरशिप घेतली आणि स्वतःच्या “ग्रो मोर रिसर्च फंड एसेट मैनेजमेंट कंपनी” ची सुरुवात केली.
त्यानंतर त्यांची कंपनी लोकांना कोणत्या शेयर मध्ये पैसे गुंतवायचे या विषयी सांगायचे, आणि लोक त्या शेयर मध्ये स्वतःचे पैसे गुंतवायचे आणि सुरुवातीला नफा सुद्धा मिळवायचे. आणि हर्षद यांनी मार्केट ला कसे चालवायचे हे योग्य रित्या समजून घेतले होते, एकदाची गोष्ट आहे २०० रुपयांच्या ACC च्या शेयर ला हर्षद यांनी ९००० रुपयांवर नेऊन ठेवले होते, मग आपण विचार करू शकता मार्केट सोबत कश्या प्रकारे खेळायचे हे हर्षद यांनी व्यवस्थित ओळखले होते.
शेयर मार्केट मुळे चाळीत राहणारा हर्षद यांचा परिवार आता मोठ्या इमारतीमध्ये राहायला लागला, हर्षद यांच्या जवळ भरपूर संपत्ती आली होती. एवढंच नाही तर त्या काळी हर्षद जवळ लक्झरी कार आणि मोठमोठे बंगले घेऊन झाले होते.
लोक त्यांना शेयर मार्केट चा अमिताभ बच्चन म्हणायला लागले होते. सोबतच मोठमोठे व्यक्ती हर्षद यांच्याशी भेटायला वेळ काढत असत, याच दरम्यान हर्षद यांची ओळख बऱ्याच मोठमोठ्या व्यक्तींशी सुद्धा झाली होती,
हर्षद नेमकं करायचे काय? – Harshad Mehta Scam 1992
हर्षद लोकांना त्याच शेयर मध्ये पैसा गुंतवायला सांगायचे ज्यामध्ये त्यांनी स्वतः मोठ्या प्रमाणात पैसा गुंवलेला असायचा आणि जेव्हा शेयर ची किमंत अमाप वाढायची तेव्हा स्वतः त्या शेयर ला विकून मोकळे व्हायचे, आणि यामुळे ज्यांनी त्या शेयर मध्ये गुंतवणूक केलेली असे त्यांना नुकसान व्हायचे. याप्रकारे हर्षद स्वतःचा नफा काढून घ्यायचे, आणि सोबतच काही लोकांना तेव्हा काही प्रमाणात फायदा व्हायचा तर ते हर्षद ने सांगितलेल्या शेयर मध्ये पैसे लावायचे,
असेच बरेच दिवस चालत राहिले, १९८४ ते १९९२ पर्यंत सर्व व्यवस्थित चालले होते, हर्षद यांच्या जवळ नाव, पैसा, आणि पावर ह्या सर्व गोष्टी आल्या होत्या. पण काही लोक होते ज्यांना हर्षद शेयर मार्केट सोबत खेळत आहे अशी शंका आली होती, कारण शेयर मार्केट दिवसेंदिवस मोठा उच्चांक गाठत होता.
तेव्हा एका व्यक्तीने यावर शोध घेण्याचे ठरवले, कोण होती ती व्यक्ती? आणि कश्याप्रकारे हर्षद यांचे गुपित जगासमोर आले?
पत्रकारामुळे गुपित आले जगासमोर – Scam 1992 Web Series
हर्षद मेहता शेयर मार्केट मध्ये जो पैसा गुंतावयाचे तो पैसा यायचा कुठून? आणि एवढ्या पैश्यांचे हर्षद कश्या प्रकारे व्यवस्थापन करायचे, याविषयी तेव्हाच्या टाईम्स ऑफ इंडिया च्या रिपोर्टर “सुचिता दलाल” यांनी या सर्व गोष्टींची तपासणी करण्याचे ठरविले.
तेव्हा त्यांनी तपास केल्यावर त्यांच्या लक्षात आले कि हर्षद बँकिंग सिस्टम सोबत खेळत आहेत आणि तेव्हाच्या बँकिंग सिस्टम चा फायदा घेऊन स्वतःचा फायदा करत आहेत. सुचिता दलाल आणि देबशीस बसू या दोघांनी मिळून या गोष्टीला सर्वांसमोर उघडीस करण्याचे ठरविले,
तेव्हा देबशीस बसू यांनी जेव्हा बँकिंग सिस्टम मधील काही लोकांशी संपर्क केला आणि माहिती काढण्याचे प्रयत्न केले तेव्हा त्यांना कळले कि हर्षद बँक जवळून पैसे घेतात आणि तो पैसा फक्त एका बँक रीसीप वर मिळालेला असतो, आणि त्या बँक रीसीप ची मुदत हि १५ दिवसांपर्यंत असते, आणि हर्षद तो पैसा घेऊन १५ दिवसात शेयर मार्केट मध्ये गुंतवून स्वतःचा नफा काढून बँक चे पैसे त्या कालावधीत पुन्हा परत करतात. तेही दोन तीन बँकाच्या संपर्कात राहून.
हा एक प्रकारचा गुन्हाच होता, आणि एक दिवस हर्षद कडे बँक ला वेळेवर पैसे भरता आले नाहीत तेव्हा त्यांचे हे कारस्थान सुचेता दलाल यांच्या सारख्या पत्रकारांच्या लक्षात आले, आणि त्यांनी जगासमोर ठेवले, आणि हर्षद यांचे भांडे फुटले. त्यानंतर हर्षद यांच्यावर शंभर पेक्षा अधिक केसेस लागल्या त्यापैकी बरेचश्या ह्या सिविलीयन केसेस होत्या.
हा घोटाळा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यातील एक घोटाळा होता, हा घोटाळा जवळ जवळ ४०२५ करोड रुपयांचा होता, सुचिता दलाल यांनी या घोटाळ्याला “स्कॅम” असे नाव दिले, त्यांनी या घोटाळ्यावर एक पुस्तक सुद्धा लिहिले होते त्याचे नाव “द स्कॅम” असे होते. या घोटाळ्याची संपूर्ण स्टोरी आता ९ ऑक्टोबर ला एक वेब सिरीज रिलीज झाली आहे “स्कॅम १९९२” यामध्ये आपल्याला या घोटाळ्याविषयी संपूर्ण माहिती मिळेल.
या घोटाळ्यानंतर हर्षद यांनी पत्रकार परिषदे मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव राव यांच्या वर १ करोड रुपये लाच घेण्याचा आरोप लावला होता. पण तत्कालीन पिएमो ने या आरोपांना नकार दिला होता.
हर्षद यांचे शेवटचे दिवस – Harshad Mehta Death
हर्षद यांच्यावर बरेचश्या केसेस लागलेल्या होत्या आणि त्यांनी त्यासाठी बरीच वर्ष जेल मध्ये काढली होती, बरेचश्या केसेस मधून त्यांना आता जमानत सुद्धा मिळाली होती, पण २००१ ला त्यांना परत पोलिस पकडून जेल मध्ये घेऊन गेले, काही दिवसानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड आला आणि ३१ डिसेंबर २००१ ला त्यांना जेल मध्ये हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचे ठाण्याच्या जेल मध्ये रात्रीच्या सुमारास निधन झाले.
तर हि स्टोरी होती हर्षद मेहता यांची आशा करतो आपल्याला लिहिलेली हि स्टोरी आवडली असेल आपल्याला लिहिलेली हि स्टोरी आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत,
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!