Har Gobind Khorana in Marathi
मित्रांनो, डॉ. हर गोविंद खुराना हे भारत वंशीय अमेरिकन जीवरसायन शास्त्रज्ञ होते. त्यांनी जीवरसायन शांस्त्रात केलेल्या संशोधनामुळे आज ते पूर्ण जगभर ओळखले जातात. आज आपण या लेखाच्या माध्यमातून हर गोविंद खुराना यांच्या बद्दल महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेवूया.
हर गोविंद खुराना यांचा जीवन परिचय – Har Gobind Khorana Information in Marathi
हर गोविंद खुराना यांचा जीवन परिचय – Dr. Har Gobind Khorana Biography in Marathi
पूर्ण नाव (Full Name) | डॉ. हर गोविंद खुराना |
जन्म (Birth Date) | ९ जानेवारी १९२२ रायपुर, मुल्तान (विद्यमान पाकिस्तान) |
निधन (Death) | ९ नोव्हेंबर २०११ कॉनकॉर्ड, मॅसाचूसिट्स, अमेरिका |
डॉ. हरगोविंद खुराना यांचे प्रारंभिक जीवन – Har Gobind Khorana Marathi Information
हर गोविंद खुराना यांचा जन्म अविभाजित भारतातील पंजाब राज्याच्या मुल्तान जिल्हातील रायपुर या गावी झाला होता. खुराना यांचे वडिल पटवारी होते. डॉ. खुराना हे आपल्या चार भावंडांपैकी सर्वात लहान होते. डॉ. खुराना यांची कुटुंबिक परिस्थिती बेताची असतांना देखील, त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष दिल.
डॉ. खुराना केवळ १२ वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांचे मोठे भाऊ नंदलाल यांनी सांभाळली. अश्या परीस्थित डॉ. खुराना यांनी शालेय तसचं महाविद्यालयीन शिक्षण आपल्या प्रतिभेच्या बळावर स्कॉलरशिप मिळवून पूर्ण केलं.
डॉ. खुराना यांचे प्रारंभिक शिक्षण स्थानिक शाळेतच पूर्ण केलं होत. यानंतर त्यांनी मुल्तान येथील डी. ए. वी. माध्यमिक शाळेत आपल माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. डॉ. खुराना दरवर्षी आपल्या गुणवत्तेच्या आधारे स्कॉलरशिप मिळवीत असत.
यानंतर खुराना यांनी, सन १९४३ साली पंजाब मधील विश्वविद्यालया मधून बी. एस. सी. तथा सन १९४५ साली एम. एस. सी ची पदवी प्राप्त केली. डॉ. खुराना यांनी उच्च शिक्षणाकरिता भारत सरकारची शिक्षवृत्ती मिळवून इंग्लंड देशांत गेले. त्याठिकाणी त्यांनी लिवरपूल विश्वविद्यालया मधून प्रा. रॉजर जे. एस. बियर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून डॉक्टरेट ची पदवी प्राप्त केली.
यानंतर डॉ. खुराना यांना भारत सरकारतर्फे संशोधन करण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली. यावेळी ते झ्यूरिक (स्वित्झर्लंड) मधील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रोफेसर व्ही. प्रेलॉग यांच्या सोबत संशोधन करू लागले.
डॉ. हरगोविंद खुराना यांची कारकीर्द – Har Gobind Khorana Career
आपलं संशोधन पूर्ण झाल्यानंतर डॉ. खुराना पुन्हा भारतात वापस आहे. परंतु, त्यांना आपल्या जोगे काम न मिळाल्यामुळे ते इंग्लड देशांत गेले. त्याठिकाणी त्यांना कैम्ब्रिज विद्यापीठाची सदस्यता मिळाली तसच, लॉर्ड टाद यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
सन १९५२ साली डॉ. खुराना यांना कॅनडा मधील व्हँकुव्हर कोलंबिया विद्यापीठा मार्फत बोलावणी आली. डॉ. खुराना त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांना जैव रासायनशास्त्र विभागाचे अध्यक्ष पद देण्यात आले. सन १९६० साली संयुक्त राज्य अमेरिका येथील विस्कॉन्सिन विद्यापीठातील एंझाइम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सन १९६६ साली डॉ. खुराना यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.
डॉ. खुराना यांना मॅसॅच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, सन १९६८ साली डॉ. खुराना यांना अनुवांशिक संहिताची भाषा समजण्यासाठी आणि प्रथिने संश्लेषणातील भूमिकेबद्दल वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. हरगोविंद खुराना हे नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय वंशाचे तिसरे व्यक्ती होते.
डॉ. खुराना यांचे व्यक्तिगत जीवन – Har Gobind Khorana Personal Life
सन १९५२ साली डॉ. खुराना यांनी मुल स्विस वंशीय एस्थर एलिजाबेथ सिब्लर नामक महिलेशी विवाह केला. या खुराना दाप्त्यांना जूलिया एलिज़ाबेथ (1953), एमिली एन्न (1954) और डेव रॉय (1958) नामक तीन आपत्ये झाली.
डॉ. खुराना यांच्या पत्नी ने त्यांना त्यांच्या संशोधन कार्यात पूर्ण सहयोग दिला. सन २००१ साली डॉ. खुराना यांच्या पत्नी एस्थर एलिझाबेथ यांचे निधन झाले.
डॉ. खुराना यांचा मृत्यू – Har Gobind Khorana Death
सन ९ नोव्हेंबर २०११ साली डॉ. खुराना यांनी अमेरिकेतील मॅसाचूसिट्स या ठिकाणी अंतिम श्वास घेतला.
डॉ. हर गोविंद खुराना यांना मिळालेले पुरस्कार – Har Gobind Khorana Award
डॉ. हरगोविंद खुराना यांना त्यांच्या संशोधन व कार्याबद्दल अनेक पुरस्कार व सन्मानाने गौरविण्यात आले. या सर्वांमध्ये नोबेल पुरस्कार सर्वोपरि आहे.
- सन १९६८ साली त्यांना वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त झाले.
- सन १९५८ साली कॅनडा देशातील मार्क मेडल्स प्रदान करण्यात आले.
- सन १९६० साली कॅनडियन पब्लिक सर्विस तर्फे त्यांना स्वर्ण पदक देण्यात आले.
- सन १९६७ साली डॅनी हॅनमन पुरस्कार मिळाला.
- सन १९६८ साली लॉस्कर फेडरेशन पुरस्कार आणि लूसिया ग्रास हारी विट्ज पुरस्कार द्वारे सन्मानित करण्यात आलं.
- सन १९६९ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.