Hanuman Brother Name
लॉकडाऊन च्या सुरुवातीला घरामध्ये असतांना लोकांचे घरामध्ये मनोरंजन व्हावे सोबतच भूतकाळात घडलेल्या घटनांचे दर्शन लोकांना व्हावे यासाठी टेलिव्हिजन वर रामायण मालिका दाखविल्या गेली होती आणि या मालिकेला संपूर्ण देशातून भरपूर प्रतिसाद मिळाला होता हेच नाही तर रामायण मालिका देशातील पहिली मालिका बनली ज्या मालिकेला अधिकांश लोकांनी पाहिली पण रामायणात आपल्याला फक्त राम लक्ष्मण आणि सीता या पात्रांविषयी सखोल माहिती मिळाली.
परंतु रामायणातील प्रभू श्रीराम यांचे भक्त हनुमानजी यांच्या विषयी रामायणात संपूर्ण माहिती दिलेली नाही. तर आजच्या लेखात आपण रामभक्त हनुमान यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यांचा जन्म कसा झाला त्यांना किती भाऊ होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात आपण पाहणार आहोत, तर चला पाहूया रामभक्त हनुमान विषयी थोडक्यात माहिती.
Shop Now: Hanuman T shirt
रामायणात हनुमान जी विषयी जास्त माहिती पाहायला मिळत नाही, सीता मातेचे अपहरण झाल्यानंतर जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण दोघे सीता मातेला शोधायला निघतात. तेव्हा सुग्रीवाच्या सेनेत असलेल्या हनुमानाला प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांचे दर्शन होते आणि तेव्हा पासून रामायणात हनुमानजी विषयी थोडक्यात सांगितल्याचे दिसून येतं. पुढे लंका दहन असो की द्रोणागिरी पर्वत उचलून आणणे असो या गोष्टींमध्ये हनुमान जी रामायणात आपले मोठे कर्तव्य पार पडताना आपल्याला दिसतात. पण हनुमान जी चा जन्म कोणाच्या घरी झाला त्यांना पाच भाऊ सुध्दा होते या विषयी बऱ्याच लोकांना आजपर्यंत माहिती नसेल रामायणात सुध्दा याविषयी लिहिलेलं आढळत नाही तर उत्तर रामायणात सुध्दा नाही, मग कोणत्या ग्रंथात ह्याविषयी लिहिलेलं आहे.
हनुमान यांना होते पाच भावंडं – Hanuman Ji 5 Brothers Information in Marathi
वानरांविषयी ब्रह्मांड पुराण आणि वायू पुराण या दोन ग्रंथांमध्ये संपूर्ण माहिती लिहिलेली असल्याचे आपल्याला दिसून येते त्यामध्ये वानरांची वंशावळ तसेच वानरांविषयी लिहिलेल्या काही गोष्टी आढळून येतात. ब्रह्मांड पुराणामध्ये हनुमानजी यांचे वडील केसरी आणि त्यांच्या मुलांविषयी थोडक्यात सांगितल्या गेले आहे. केसरी यांनी राजा कुंजर यांच्या मुलीसोबत विवाह केला होता, ती मुलगी म्हणजे अंजना. विवाहानंतर अंजनाच्या गर्भातून हनुमान यांनी जन्म घेतला.
या पुराणामध्ये अंजना ला रूपवती सुध्दा म्हटल्या गेले आहे. या पुराणात हनुमान यांच्या आणखी चार भावांची नावे सुध्दा आपल्याला दिसून येतात. हनुमान जी यांना एकूण पाच भाऊ होते. हनुमान हे सर्वात मोठे होते. त्यांनंतर मतिमान नंतर श्रुतिमान नंतर केतुमान नंतर गतिमान आणि सर्वात लहान धृतिमान. अश्या प्रकारे त्यांच्या नावांचा उल्लेख पुराणात एका श्लोकाद्वारे केला गेला आहे.
एवढंच नाही तर पुढे या पुराणात सांगितले आहे की रामभक्त हनुमान ब्रह्मचारी होते परंतु त्यांचे बाकीचे भाऊ हे विवाहित होते. त्यांना मुलं बाळं सुध्दा होती. अश्याच प्रकारच्या अनेक गोष्टी या पुराणात लिहिलेल्या आहेत. ज्या गोष्टी बरेच जणांना माहिती नाही आहेत. आजपर्यंत आपण रामायण, महाभारत यांच्या विषयी वाचलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे. आणि काही गोष्टींचा उल्लेख यांच्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येत नाही.
तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!