Habits of Mentally Strong People
मित्रांनो तुम्ही नेहमी मानसिक रूपानं स्वस्थं कसं असावं हे शोधण्याच्या प्रयत्नात असता किंवा हे तरी जाणण्याकरता उत्सुक असता की मानसीक रूपानं मजबुत असण्याकरता कुठली कसरत वा कोणता व्यायाम करावा? याकरता बऱ्याच साईट्स् देखील शोधता,
चला तर पाहुया मानसिक रूपानं मजबुत होणे म्हणजे काय?
मानसिक रूपानं मजबुत असणं म्हणजे तुम्हाला काय हवय आणि कधी हवय हे माहीत असणं. तुमचे लक्ष्य गाठण्याकरता कोणत्याही गोष्टीला मागे न सोडणं. मानसिक मजबुती म्हणजे पुढे येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज आधीच घेउन दुसर्यापेक्षा पुढे जाणे होय. मानसिक दृष्टया मजबुत हाण्याने तुम्हाला तेव्हा हिम्मत मिळते जेव्हां प्रत्येक जण अपयशी होत असतो.
मानसिक सुदृढता तुम्हाला शक्ती प्रदान करते. मानसिक मजबुती असणारे व्यक्ती शक्तीशाली असतात. त्यांना नेहमी याची जाणीव असते की आयुष्यात सगळच आपल्या मनासारखं होत नाही परंतु मानसिकदृष्टया मजबुत राहुन पुढे येणाऱ्या समस्यांची आपण आधी तयारी करू शकतो.
काहींमधे मानसिक शक्ती नैसर्गिकच असते, त्यांना या शक्तीला मिळवण्याचे उपाय माहीत देखील नसतात.
मात्र इतरांकरता हे एक काम आहे ज्यात आपल्यातील कलेला प्रखर बनवण्याचे प्रयत्न केले जातात.
पुढे अश्या १२ गोष्टी सांगीतल्या आहेत ज्यात हे सांगीतले आहे की मानसिक दृष्टया मजबुत लोक काय करतात आणि काय करत नाहीत आणि हे सर्व नैसर्गिक असतं की प्रयत्नांचा परिणाम.
या लेखात हेच सांगीतले आहे की ते लोक जीवनातील कठीण काळात आपल्या मानसिकतेला कश्याप्रकारे स्थिर ठेवतात आणि जीवनातील चढ-उतारांना कसे सामोरे जातात.
मानसिकरित्त्या मजबूत असलेल्या लोकांच्या सवयी – Habits of Mentally Strong People
मानसिक रूपानं मजबुत लोक – Mentally Strong People
१) मानसिकदृष्टया मजबुत लोक बदलांना सहज स्विकारतात – Accept Changes Easily
बऱ्याच लोकांना बदल आवडत नाहीत परंतु बरेचदा बदल कठीण आणि अनिवार्य असतात.
मानसिक रूपानं मजबुत लोक या बदलांना स्विकारतात आणि सकारात्मक बदलांचं आनंदानं स्वागत करतात.
मानसिक रित्या मजबुत लोक नरम असतात आणि भावनाप्रधान असुन होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्याची त्यांच्यात ताकद असते.
२) मानसिक दृष्टया मजबुत लोक त्यांची शक्ती नेहमी त्यांच्यासोबत ठेवतात – Mentally Strong People Always Live with Positive Energy
तुम्हाला आणि तुमच्या भावनांना कोणीही नियंत्रीत करू शकत हे मानसिकदृष्टया मजबुत लोकांना ठाउक असतं. तुम्हाला त्यांच्याकडुन असे कधीही ऐकायला मिळणार नाही की माझ्या मित्राने मला दुःखी केले.
कारण त्यांना ठाऊक असतं की त्यांच्या भावना त्यांच्याच नियंत्रणात आहेत, जोपर्यंत त्यांना वाटत नाही तोपर्यंत त्यांना कुणीही दुःखी करू शकत नाही.
जेव्हां कधी आपण आपल्या स्वतःच्या आणि भावंनांच्या नियंत्रणात असतो तेव्हा आपल्याला हे ठाऊक असतं की नकारात्मक परिस्थितीवर काय प्रतिक्रिया दयावी.
३) मानसिकरित्या सुदृढ व्यक्ती स्वतःकरता माफी ची अपेक्षा कधीही ठेंवत नाही – Mentally Strong Person never Expects Forgiveness for Himself
अश्या व्यक्तींजवळ कधीही अपराधीपणाची भावना जोपासत माफीची अपेक्षा ठेवत विचार करायला वेळ नसतो. त्यांना हे माहीत असतं की असा विचार करणं म्हणजे वेळेला व्यर्थ गमावणं आहे.
आणि म्हणुन यश मिळवण्याच्या उद्देशाने आपल्या कामांची जवाबदारी घेणं त्यांना महत्वाचं वाटतं. त्यांना ठाऊक असतं की आयुष्य कधीही सरळ, सोपं नसतं म्हणुन ते नेहमी सतर्क असतात आणि पुढे जात राहातात.
४) मानसिक रूपानं मजबुत लोकांना ठाउक असतं की ते सगळयांना खुष नाही ठेउ शकत – Mentally Strong People are Aware that they cannot Please Everyone
मानसिकदृष्टया मजबुत राहातांना असं होऊ शकतं की तुम्ही बऱ्याच जणांना नाखुश कराल.
मानसिक रूपानं मजबुत लोकांना हे माहीत असतं की प्रत्येक वेळी सगळयांना खुश ठेवता येत नाही,
आणि जर कधी ‘नाही ’ म्हणण्याचा प्रसंग असेल तर ते संकोच न करता नाही म्हणतात.
आपल्या मनातील विचारांना, मनातील गोष्टींना सांगतांना ते जराही लाजत नाहीत उलट ते साधे आणि सरळ राहणे पसंत करतात.
जर कोणी त्यांच्या पासुन नाराज असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करत ते पुढे जात राहतात.
कारण त्यांना ठाउक असतं की प्रत्येक वेळी ते सगळयांना खुष नाही ठेऊ शकत.
५) ज्या गोष्टी ते बदलु शकत नाहीत त्याची ते जराही चिंता करत नाहीत – They don’t Worry about Things they can’t Change
एक सुप्रसिध्द सुविचार आहे, “ज्या गोष्टींना मी बदलु शकत नाही त्यांना स्विकारण्याची ताकद देवाने मला दिली आहे आणि ज्या गोष्टी मी बदलु शकतो त्या बदलण्याची मला हिम्मत दिली आहे”.
६) मानसिक दृष्टया मजबुत लोक सुनियोजीत जोखीम अर्थात रिस्क् घेतात – Mentally Strong People take Risk
सर्व जोखीम स्विकारणे एकसारखे नसते आणि मानसिक दृष्टया मजबुत लोक हे चांगल्याप्रकारे जाणुन असतात आणि म्हणुनच त्यांना ठाउक असतं की फालतु जोखीम आणि सुनियोजीत जोखीम कोणती ते.
ते परिस्थितीचा दोन्ही अंगांनी विचार करतात, निरीक्षण करतात, आणि त्या परिस्थितीसंबंधी कोणताही मोठा निर्णय पुर्णपणे विचार करून घेतात.
सुनियोजीत जोखीम घेतांना मानसिक दृष्टया मजबुत लोक जराही विचलीत होत नाहीत.
७) मानसिकरूपानं मजबुत लोक आपल्या चुकांपासुन धडा घेतात – Mentally Strong People Learn from Mistakes
अश्या व्यक्ती स्वतःव्दारे केलेल्या क्रियांची जवाबदारी स्वतःच घेतात आणि भुतकाळात आपल्याव्दारे केलेल्या चुकांपासुन धडादेखील घेतात.
आणि यामुळेच भुतकाळातील घडुन गेलेल्या चुका त्यांच्याकडुन पुनः पुन्हा होत नाहीत आणि भविष्यात आणखीन चांगले घडण्याकरता ते प्रयत्नशील राहातात.
८) मानसिकदृष्टया मजबुत लोक कधी भुतकाळाचा विचार करत नाहीत – Mentally Strong People Never Think of Past
आपल्या भुतकाळाविषयी विचार करत बसणे आणि ईच्छा व्यक्त करणे या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
ईच्छा व्यक्त करणे म्हणजे वेळे व्यर्थ घालवणे होत नाही.
मानसिक रित्या मजबुत लोक कधीही भुतकाळाचा विचार करत वेळ व्यर्थ घालवत नाहीत उलट भुतकाळातील आपल्या भुमीकेचे निरीक्षण करतात आणि त्यातुन काय शिकले हे सांगतात.
एक चांगल्या मजबुत मानसिकतेचा माणुस भुतकाळात घडलेल्या चांगल्या गोष्टींचा देखील विचार करत नाही तर तो वर्तमानात जगतो आणि भविष्याच्या योजना बनवतो.
९) दुसऱ्याला यशस्वी होतांना पाहुन मानसिकरित्या मजबुत व्यक्ती कधीही असुया बाळगत नाही – Mentally Strong Person never Jealous success of Another
मानसिकरित्या मजबुत व्यक्तीला स्वतःवर पुर्ण विश्वास असतो तो स्वतः प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो आणि दुसऱ्याच्या यशस्वी होण्यावर त्याला शुभेच्छा देतो.
जिवनात कोणी त्याच्या पुढे निघुन गेल्यास त्याच्या मनात कधीही असुयेची भावना निर्माण होत नाही.
अश्या वेळी एक मानसिक बुध्दीमान व्यक्ती वाईट वाटुन घेण्याऐवेजी यशस्वी होण्याकरता लागणाऱ्या परीश्रमाची किंमत जाणतो
आणि स्वतःला कठीण परिश्रम करण्याकरता प्रेरीत करतो जेणेकरून तो देखील जीवनात यशस्वी होईल.
१०) मानसिकरूपानं मजबुत लोक परिणामांकरता घाई करत नाहीत – Mentally Strong People do not Rush for Results
एखादा नवीन व्यवसाय असो किंवा वजन कमी करणे असो मानसिक रूपानं मजबुत माणसं हे जाणतात की परिणामांना वेळ लागतो.
आपल्या पुर्ण परिश्रमांने, एकाग्रतेने आणि बुध्दीमत्तेने ते काम करत राहातात आणि परिणामांना पुर्ण वेळ देतात.
त्यांना माहीत असतं की “सब्र का फल मिठा होता है” आणि चांगल्या परिणामांना वेळ लागतो.
११) मानसिक दृष्टया मजबुत लोक एकटं राहण्यालाही कधी घाबरत नाहीत – Mentally Strong People Never Afraid to Alone
मनसिकदृष्टया मजबुत लोक स्वतःच्याच कंपनीचा आनंद घेतात आणि एकटं राहण्याला काहीतरी नवीन निर्माण करण्याचा काळ समजतात.
एकटं राहण्याला अश्या व्यक्ती कधीही घाबरत नाहीत.
कारण असे लोक आपल्या आनंदाकरता दुसऱ्यावर अवलंबुन नसतात.
मानसिकदृष्टया मजबुत लोक आपल्यातच आनंदीत असतात.
१२) मानसिक रूपानं मजबुत व्यक्ती कधीही हार मानत नाही – Mentally Strong Person Never Gives Up
अश्या व्यक्तींकरता अयशस्वी होणे म्हणजे हार मानुन प्रयत्न सोडणे नसते उलट ते अयशस्वी होण्याला पुढे जाण्याची संधी अश्या रूपात पाहातात.
जेणेकरून ते आणखीन चांगलं करू शकतील आणि जोवर ते यशस्वी होत नाहीत तोपर्यंत ते प्रयत्न करत राहतात.
आपल्यामध्ये यापैकी कोणत्या गोष्टी आहेत आम्हाला या लेखाच्या खाली कळवा. आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझीमराठी सोबत.
धन्यवाद!