Guru Nanak
पृथ्वीवर जगाचा उद्धार करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या महापुरुषाचा जन्म होतच असतो. त्या महापुरुषांमध्ये एक नाव आहे शिखांचे पहिले धर्मगुरू गुरुनानक यांचे संपूर्ण जगामध्ये शिख धर्माला पोहचविणारे आणि जगात शिखांची एक वेगळी ओळख निर्माण करणारे गुरुनानकजी हे शिखांचे पहिलेच धर्मगुरू.
तर आजच्या लेखात आपण त्यांच्या विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत, तर आशा करतो आपल्याला लिहिलेली माहिती आवडणार तर चला तर पाहूया.
गुरुनानक साहिब यांच्या विषयी माहिती – Guru Nanak Information in Marathi
गुरुनानक यांचे सुरुवातीचे जीवन – Guru Nanak Biography in Marathi
बाबा गुरुनानक यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ ला पाकिस्तान च्या लाहोर मध्ये रावी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं तलवंडी गावामध्ये झाला होता. त्यांच्या जन्माचा दिवस हा कार्तिक पोर्णिमा म्हणून सुद्धा ओळखला जातो. कार्तिक पौर्णिमेलाच संपूर्ण देशांत त्यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या वडिलांचे नाव हे कल्याणचंद (मेहता कालू) होते, ते तेथील स्थानिक पातळीवर अधिकारी होते.
त्यांच्या आईचे नाव तृप्ता देवी असे होते आणि त्यांना एक लहान बहिण होती तिचे नाव नानकी असे होते.
गुरुनानक यांना सुरुवातीपासूनच आध्यात्मात रुची होती, लहानपणी त्यांचे मन शाळेत लागले नाही.
ते साधू संतांच्या सोबत राहून त्यांच्या सोबत अध्यात्माकडे त्यांचे विचार वळले होते.
त्यांच्या वडिलांना या गोष्टींकडून त्यांचे लक्ष काढून दुसरीकडे लावायचे होते म्हणून त्यांनी गुरुनानक जींना व्यवहार करण्यासाठी २० रुपये दिले आणि सांगितले कि या पैशांनी एक खरा सौदा (ईमानदार व्यवहार) करून ये.
गुरुनानक जी रस्त्यामध्ये त्या २० रुपयांचे साधू संतांना आणि गरिबांना अन्न दान करून आले.
तेव्हा त्यांच्या वडिलांनी विचारले कि झाला सौदा? तेव्हा त्यांनी एक खरा सौदा (ईमानदार सौदा) करून आल्याचे सांगितले.
आजही त्या जागेवर सच्चा सौदा नावाचा गुरुद्वारा आहे आणि तेथे आजही अनेक भुकेल्या लोकांना अन्नदान केल्या जात.
त्यांनतर त्यांच्या आई वडिलांनी ठरविले कि आता गुरुनानक जी चे लग्न करायचे आणि त्यांना वैवाहिक जीवनात बांधून ठेवायचे, आणि काही दिवसानंतर गुरुनानक यांचा विवाह सुलीक्षणी यांच्याशी झाला.
त्यानंतर त्यांना दोन पुत्र रत्न प्राप्त झाले, श्री चंद आणि लखमी दास. लग्नानंतर त्यांचा मूळ स्वभाव हा बदलला नाही.
त्यांचे असे म्हणणे होते कि ईश्वर आपल्या अंतरमनात असतो आपण त्याला कुठे बाहेर शोधायची गरज नसते.
ज्यांच्या हृदयात दया, क्षमा, शांती, प्रेम, ह्या गोष्टी नसून क्रोध, द्वेष, निष्ठुरपणा या गोष्टी असतात तेथे ईश्वर असूच शकत नाही.
याच प्रकारे त्यांनी समाजात लोकांना अंधश्रध्दाना बळी पडू नये म्हणून जागरूक केले.
गुरुनानक यांच्या लहानपणी अश्या काही चमत्कारिक घटना घडल्या ज्यामुळे त्यांना एक दिव्य बालक असल्याचे सगळे गाव मानायला लागले होते.
गुरुनानकजी रचित ग्रंथ आणि गुरुवाणी – Guruvani
गुरुनानक साहिब यांनी आपल्या ग्रंथ आणि गुरुवाणी द्वारे लोकांना एक सुखी जीवन कसे जगायचे या गोष्टीं खूप चांगल्या प्रकारे सांगितल्या आहे.
त्यापैकी खाली काही ग्रंथ आहेत आणि गुरुवाणी सुद्धा.
- “श्री ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब,”
- “महला १”
- “गुरबाणी तखरी”
- “बारहमाहाँ”
- “जपुजी”
गुरुनानक यांचे निधन – Guru Nanak Death
शीख धर्माची स्थापना करणारे गुरुनानक साहिब यांची संपूर्ण जगात एक ओळख निर्माण झाली होती लोक त्यांना गुरु मानायला लागले होते.
कर्तारपूर जे आज पाकिस्तान मध्ये आहे, आणि तेथेच त्यांनी १५३९ मध्ये शेवटचा श्वास सोडला.
त्या नंतर त्यांचे परम भक्त आणि शिष्य गुरु अंगद्गेव जी यांना त्यांचा उत्तराधिकारी बनवले गेले. त्यांच्या जयंती निमित्त आजही गरिबांना भोजन दिल्या जाते.
तर येणाऱ्या गुरुनानक जयंती निमित्त आपणास माझी मराठी च्या संपूर्ण परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.