Guinness Book History
जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टींची माहिती ठेवणारे एक पुस्तक आपल्याला सर्वांना माहिती आहे ते म्हणजे “गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड”. संपूर्ण जगातील लोक आपापली प्रतिभा या पुस्तकाच्या माध्यमातून जगाला दाखवू शकतात. वेगवेगळ्या प्रकाराची प्रतिभा असणारे लोकांची नावे या पुस्तकात पाहायला मिळतात.
मग ते जगातील सर्वात उंच असणारी व्यक्ती असो कि जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती. या सर्वांची यादी आपल्याला या पुस्तकात दिसून जाईल. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्ती किंवा संस्था स्वतःमध्ये असलेली प्रतिभा जगाला या पुस्तकाच्या माध्यमातून दाखवू शकते, पण आपल्याला माहिती आहे का ह्या पुस्तकाचा शोध कोणी लावला, आणि कसा लागला तो.
आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि वर्ल्ड रेकॉर्ड ठेवणाऱ्या या गिनीज बुक ची सुरवात सर्वात आधी कुठे आणि कशी झाली तर चला पाहूया या लेखातून.
मित्रांमध्ये झाला वादविवाद आणि लागला गिनीज बुक चा शोध – Guinness Book History
गिनीज बुक काय आहे? – What is Guinness Book of Record
गिनीज बुक हे असे जगातील प्रतिभावान लोकांची यादी तसेच अनोख्या घटना जमा करून ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलेले पुस्तक आहे, आणि या पुस्तकात नाव जाण्यासाठी जगातील लोक काहीही करून या पुस्तकात त्यांचे नाव यावे म्हणून बऱ्याच अप्रत्याशित गोष्टी करत असतात.
गिनीज बुक आणि त्याची सुरुवात – Guinness World Records Story
सन १९५१ च्या सुमारास ह्यू बीव्हर नावाची एक व्यक्ती आणि त्यांचे मित्र पक्षांच्या शिकारीसाठी निघाले होते, शिकारीला जाता जाता त्यांच्या डोक्यावरून भरधाव वेगाने काही पक्षांचा थवा गेला, तेव्हा मित्रांमध्ये त्या उडून जाणाऱ्या पक्षांविषयी चर्चा झाली. तेव्हा त्यांनी एकमेकांना विचारले कि हे कोणते पक्षी असतील. तेव्हा कोणी म्हणत होते कि हा तितूर आहे तर कोणी म्हणत होते व्हीवर बर्ड. त्यावर त्यांचा वादविवाद सुरु झाला.
अश्या चर्चेतून तसेही काही बाहेर येत नसतेच त्याचप्रमाणे कोणालाही त्या पक्षाला ओळखता आले नाही. तेव्हा ह्यू बीव्हर यांनी त्याविषयी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कुठेही त्याविषयी माहिती मिळाली नाही,
पण १९५४ मध्ये त्यांना एका पुस्तकात थोडीशी माहिती वाचायला मिळाली ते त्या माहितीपासून सुद्धा संतुष्ट नव्हते, म्हणून त्यांना यांना कल्पना सुचली कि बरेच लोकांना या पद्धतीची माहिती शोधण्यासाठी अडचण होत असेल. आणि माहिती न मिळाल्याने लोकांमध्ये चिडचिड आणि निराशा होत असेल,
या गोष्टीला लक्षात घेऊन त्यांनी हा विचार त्यांच्या मित्रांमध्ये मांडला आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना लंडन मधील दोन व्यक्तींचा पत्ता दिला जे असा डेटा संग्रहित करत होते. आणि ते दोन व्यक्ती दोघे भाऊ होते एक मॅकिटर आणि त्याचा भाऊ नॉरिस मॅकिटर. १९५५ मध्ये या दोघांच्या सोबत एका पुस्तकाची निर्मिती केली.
तेव्हा त्या पुस्तकाला गिनीज बुक रेकॉर्ड असे नाव दिल्या गेले होते, पण सन २००० नंतर या पुस्तकाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या नावाने संबोधल्या गेले. आज या गिनीज बुक मध्ये जगातील लाखो लोक आपले नाव येण्यासाठी एवढे उस्तुक आहेत कि त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात.
गिनीज बुक प्रमाणे लिम्का बुक – Guinness World Records Limca Book of Records
ज्याप्रमाणे जगातील लोकांच्या प्रतिभेला गिनीज बुक मध्ये स्थान मिळते आणि लोक त्यामध्ये आवर्जून आपली प्रतिभा दाखविण्यासाठी लोक आगळ्या वेगळ्या करामती करतात, त्याचप्रमाणे आपल्या देशात सुद्धा लोकांना त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी १९९० मध्ये भारतामध्ये कोका कोला ने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड पब्लिश केले आहे.
हे सुद्धा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सारखेच बुक आहे यामध्ये एखादी व्यक्ती राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवू शकते. आपल्याला आपली प्रतिभा जगाला दाखवायची असल्यास आपण गिनीज बुक आणि लिम्का बुक या दोन्ही साठी अर्ज करू शकता, फक्त आपल्याला त्यांच्या ऑफिशियल वेब साईट वर जाऊन भेट द्यावी लागेल.
तेथे स्वतःचे एक वैयक्तिक अकाऊंट बनवावे लागेल आणि आपण कोणते रेकॉर्ड तोडू शकता याविषयी लिहावे लागेल. बाकी संपूर्ण माहिती त्यांच्या ऑफिशियल वेब साईट वर मिळून जाते.
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!