Gram Sevak Information
ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. जे प्रशासकीय महत्त्व जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारीला असतो तसेच गट विकार अधिकारीला तालुका पातळीवर असतो तेव्हडेच महत्त्व गाव पातळी वर ग्राम सेवकाला असते.
ग्राम सेवकाला village development officer किवा ग्राम विकास अधिकारी या नावाने ही ओळखले जाते. ग्रामसेवकाची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या मार्फत करतो. प्रत्येक गावासाठी एक ग्रामसेवक असतो पण गावाची लोकसंख्या, विस्तार आणि उत्पन्न पाहून एका पेक्षा जास्त लोक सुधा असू शकतात.
ग्रामसेवक (ग्राम विकास अधिकारी) होण्यासाठी काय करावे लागेल संपूर्ण माहिती – Gram Sevak Information
ग्रामसेवकाचे कार्य व अधिकार – Gram Sevak Work
ग्रामसेवकाला गावाच्या विकासचेकामाचे नियोजन करणे, ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे, ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, ग्रामसभांच्या ठरावांची अंमलबजावणी करणे,
ग्रामसभेचे पत्र व्यवहार आणि शासकीय योजनेचे व्यवस्थापन अशी अनेक कामे व जबाबदारी पार पाळावी लागते.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७ प्रमाणे ग्रामसभेचा कामकाज चालवण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर असते.
शासनाकडून कडून मिळणाऱ्या अनुदानातून सरपंच व ग्रामसभा सभासद यांच्या सहकार्याने गावाच्या विकासाचा पंचवार्षिक आराखडा तयार करणे.
ग्रामसभेत प्रस्ताव पारित झाल्या नंतर सदर प्रस्ताव संबंधित खाते अधिकार्याकडे मंजुरीसाठी पाठवणे.
ग्रामपंचायतीचे विकासच्या कामाचा अहवाल तयार करणे आणि त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावणे.
सरपंच, उपसरपंच यांना सभेच्या वेळी गरज असेल तर कायदेविषयक सल्ला देणे.
ग्रामपंचायतीच्या कामाची सर्व माहिती जतन करणे व सरपंचाच्या साह्याने गावाची विकासाची कामे करणे.
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सर्व अभिलेख जतन करून ठेवणे व त्यांना अद्ययावत ठेवणे.
शासनाने निर्धारित केलेले विविध करांची वसुली करणे. प्रत्येक चार वर्षांनी कर आकारनित वाढ सुचविणे आणि ग्रामनिधीची संपूर्ण जबाब दरी संमभाळने.
ग्रामपंचायत आणि पंच्यात समिती यामधील दुवा म्हणून काम पाहणे आणि ग्रामपंचायतीचे पत्रव्यवहार सांभाळने.
ग्रामपंचायतच्या हद्दीत येणारे सर्व रस्ते,इमारती, खाली जागा याची मोजमापाचे दस्तावेज, कराराचे दस्तावेज अद्ययावत ठेवणे. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामदर्शक नकाशा ठेवणे.
जन्म-मृत्याची नोंद ठेवणे आणि विवाह नोंदणी ठेवणे.
गावातील लोकांची कमीत कामी आठवड्यातून एकदा एकत्र आणून लोकसभा भरवणे व गावातील विविध प्रश्नानावर चर्चा करणे आणि प्रश्नाचे निराकरण करणे.
जर ग्रामपंचायत एखाद्या नियमाचे उलंघन करत असेल तर त्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणे.
निवडणूक आयोगाच्या सूचना आणि अधेशाचे पालन काटेकोरपाणे करणे.
ग्रामपंच्यातीतील कर्मचार्याचे कामावर नियंत्रण ठेवणे त्याचे भत्ते व भविष्य निर्वाह निधी शासनाच्या कायद्यानुसार व नियमानुसार देणे.
गावातील दरिद्रीरेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे ही सुद्धा ग्रामसेवकाची जबाबदारी आहे.
सरकारच्या वेगवेगळ्या विकाशाच्या योजना बद्दल जनजागृती करणे व ते राबवणे.
ग्रामपाताडीवर प्रशासन चालवण्याचे महत्वाचे काम ग्रामसेवक करतो सरपंच तसेच उपसरपंच यांना मार्गदर्शन करणे तसच कनिष्ट ग्रामपंच्यायातीतील कर्मचार्यांना मार्गदर्शन करणे हे सुधा ग्रामसेवकाचे कर्तव्य आहे.
ग्रामसेवक होण्यासाठी काय करावे लागेल – How to Become Gram Sevak
ग्रामसेवकाची भारती जिल्हा परिषद मार्फत होते ग्रामसेवक भारतीची जाहिरात जिल्हा परिषद काढते.
ग्राम सेवक बनण्यासाठी वयमर्यादा १८ ते ३८ वर्ष इतकी आहे.
ग्राम सेवक होण्यासाठी कमीत कमी शैक्षणिक अहर्ता – Gram Sevak Qualification
६०% गुणांसह १२वी परीक्षा उत्तीर्ण किवा अभियांत्रिकी डिप्लोमा किवा BSW किवा कृषी डिप्लोमा.
ग्रामसेवकाची निवड ही जिल्हाधिकारीच्या मार्गदर्शनाखाली असलेली जिल्हा निवड समिती मार्फत स्पर्धा परीक्षेतून केली जाते. ग्रामसेवकाचे वेतन हे जिल्हा निधीतून दिले जाते.
ग्राम सेवक पदाबद्दल विचारल्या जाणारे प्रश्न – Quiz on Gram Sevak
उत्तर: ग्रामसेवक होण्यासाठी किमान वय १८ असले पाहिजे.
उत्तर: ग्रामसेवक होण्यासाठी कमाल वय ३८ असले पाहिजे.
उत्तर: ग्रामसेवक होण्यासाठी कमीत कमी उमेदवार १२वीत ६०% सह उतीर्ण असला पाहिजे.
उत्तर: ग्रामसेवकाची निवड जिल्हा निवड समिती जी जिल्हाधिकारीच्या मार्गदर्शनाखाली असते तिच्या मार्फत होते.
उत्तर: Village Development Officer किवा ग्राम विकास अधिकारी.