Godavari River Information in Marathi
आपल्या देशात पुर्वेपासुन पश्चिमेला, आणि उत्तर पासून दक्षिणेला जाणाऱ्या बऱ्याच नद्या पहायाला मिळतात, काही नद्यांचे आपल्या इथे धार्मिक संबंध सुद्धा पाहायला मिळतात, जसे कशी ची गंगा नदी खूप प्रसिद्ध आहे. आणि या नदीच्या पाण्याला पृथ्वी वरील अमृत म्हणून ओळखले जातं, याचप्रमाणे आपल्या देशात अनेक नद्या पाहायला मिळतात, तर आजच्या लेखात आपण गोदावरी नदी विषयी माहिती पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला आवडणार तर चला पाहूया.
नाशिकची गोदावरी नदी – Godavari River Information in Marathi
गोदावरी नदीचा उगम – Godavari Nadi Ugam & History
पौराणिक कथेनुसार त्र्यंबकेश्वर येथे जेव्हा गौतम ऋषींवर गो हत्तेचे पाप लागले होते, तेव्हा त्यांनी शंकराची पूजा करून शंकर्जींना प्रसन्न केले, तेव्हा शंकर्जींनी त्यांच्या जटा ब्रम्हगिरी पर्वतावर आदळल्या आणि नंतर गोदावरी नदीचा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ला उगम झाला, त्यानंतर गौतम ऋषींनी त्यात स्नान करून पापा पासून मुक्त झाले,
तेच दुसरीकडे शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे कि गोदावरी नदी अंटार्टिका खंडातून सुरुवातीला वाहलेली आहे. दक्खनचे पठार आणि अंटार्टिका हे एकाच खंडाचे भाग असल्याने शास्त्रज्ञांनी हा विश्वास दाखविलेला आहे.
गोदावरीचे आकारमान – Godavari River Length
गोदावरी नदीची एकूण लांबी १,४५० किलोमीटर इतकी आहे, सोबतच गोदावरीच्या खोऱ्याचे एकूण पाणलोट क्षेत्र ३,१९,८१० कि.मी इतके आहे, आणि गोदावरी नदीने भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.५ टक्के भाग व्यापलेला आहे.
गोदावरीची विशेषत – Godavari River Facts
गोदावरी हि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे, गोदावरी चा उगम नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ला झाला आहे आणि हि नदी पुढे नाशिकजवळ आपला प्रवाह बदलून पूर्वेकडे वाहते, आणि जेथून नदी प्रवाह बदलते तेथून तेथे चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे, म्हणून येथे संपूर्ण देशातून बरेच लोक अस्थी विसर्जनासाठी येतात, कारण या ठिकाणी मनुष्याचे अस्थी पाण्यात विरघळतात.
जेव्हा भगवान श्रीरामांना वनवास झाला होता तेव्हा जवळजवळ १३ वर्ष भगवान श्रीराम आपल्या पत्नीसोबत आणि अनुज लक्ष्मणा सोबत येथे कुटी उभारून राहिले होते, म्हणून आजही पंचवटी मध्ये रामकुंड, सिताकुंड, यासारखे पवित्र कुंड आहेत.
दर १२ वर्षांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे कुंभ मेळ्याचे आयोजन होतं. कारण समुद्र मंथनातून निघालेले अमृताचे काही थेंब येथे पडले होते. म्हणून गोदावरीला गंगा नदी एवढेच महत्व दिल्या जातं.
गोदावरी नदी कोठून कुठे वाहते – Godavari River Flows Through which States
गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर ला झाला आहे, आणि हि नदी नाशिक, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांना पार करत आंध्रप्रदेश मध्ये प्रवेश करते, आंध्रप्रदेश मध्ये प्रवेश केल्यावर हीच गोदावरी नदी कंदाकुर्ती येथे हरिद्रा आणि मंजिरा या नद्यांसोबत मिळते, आणि या ठिकाणी या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. या नंतर आग्नेय दिशेला वाहून हि नदी राजमहेंद्रीजवळ बंगाल च्या उपसागराला जाऊन मिळते.
गोदावरी नदी हि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची नदी आहे, आणि देशातून दुसऱ्या क्रमांकावर आहे तर जगातून ९२ वा क्रमांक लागतो, तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!