Gateway of India Mahiti
मुंबई हे नाव जरी ऐकले कि डोळ्यांसमोर एक मोठ्ठ शहर उभं राहतं. तिथला सुमुद्र, पंचतारांकित हॉटेल्स, नट, नट्यांचे बंगले, बस, लोकल ट्रेन्स आणि काळजात धस्स करणारी तिथली गर्दी. ती गर्दी पाहून तर असे वाटते नको बाबा ती मुंबई. पण तरीही प्रत्येकालाच वाटते कि एकदातरी जीवाची मुंबई करावीच म्हणून..! भारतातच काय अख्ख्या जगातून लोकं येतात जीवाची मुंबई करायला, मुंबई पाहायला.मुंबई मध्ये बरेच प्रेक्षणीय स्थळे आहेत पण आपण एका अशा स्थळाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्याचं ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे. ते स्थळ म्हणजे गेटवे ऑफ इंडिया.ताजमहाल हॉटेलच्या ठीक अगदी समोर हे ठिकाण स्थित आहे. हि वास्तू भारतातील ऐतिहासिक लोकप्रिय वास्तूंपैकी एक आहे. अरबी समुद्रमार्गे येणाऱ्या जहाजांसाठी भारताचे हे एक प्रवेशद्वारच. समुद्रमार्गे येणाऱ्या पर्यटकांचे हि वास्तू स्वागत करते.
Contents
show
गेटवे ऑफ इंडिया माहिती – Gateway of India Information in Marathi

स्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
निर्माण कार्य आरंभ | 31 मार्च 1913 |
निर्माण कार्य पूर्ण | 1924 |
उद्घाटन | 4 डिसेंबर 1924 |
स्थापनेचा उद्देश | 1911 साली ज्यावेळी किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी हे दोघे भारत भेटीसाठी आले होते त्यावेळी या भेटीची इतिहासात आठवण राहावी त्या उद्देशाने या वास्तूचे निर्माण करण्यात आले. |
पाहण्याची वेळ | सातही दिवस पाहण्यासाठी सुरु असते |
गेटवे ऑफ इंडियाचे निर्माण – Gateway of India History
1911 साली ज्यावेळी किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांनी भारतात भेट दिली होती त्यामुळे त्यांचा एक सन्मान म्हणून या वास्तूची रचना करण्यात आली. प्रत्यक्ष ते दोघे या वास्तूचं फक्त मॉडलच पाहू शकले.त्यांची भारत भेट हि ऐतिहासिक व्हावी हा त्यामागचा उद्देश. गेट वे ऑफ इंडियाचा पाया 31 मार्च 1911 ला मुंबईचे त्यावेळचे राज्यपाल सर जॉर्ज सिडेनहम क्लार्क यांच्याद्वारे ठेवण्यात आला.भारतातील हि प्रसिध्द वास्तू पिवळ्या बेसाल्ट दगडात बांधण्यात आली आहे. अपोलो बंदराची भिंत हि 1915 ते 1919 या दरम्यान बांधली आहे. याच दरम्यान गेटवे ऑफ इंडीयाचेही निर्माण कार्य सुरूच होते. 1924 मध्ये याचे काम पूर्ण झाले.एक स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज वीट्टेट याने या वास्तूचं डीजाईन तयार केलं होतं तर गॅमन इंडिया या कंपनीद्वारे त्याचे निर्माण करण्यात आले. यामध्ये पिवळ्या बेसाल्ट दगडाचा वापर करण्यात आला आहे. हा दगड येथीलच परिसरातून आणण्यात आला मात्र सछिद्र असा जो दगड वापरण्यात आला आहे तो मध्यप्रदेशातील ग्वालियर या ठिकाणाहून आणण्यात आला होता.हि वास्तू म्हणजे इंडो-सारसेनिक वास्तुकलेच्या शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लीम वास्तुकलेतील कोरीव काम, घुमट इत्यादी शैलींचा वापर त्यात करण्यात आला आहे.त्यावेळी याच्या बांधकामासाठी 21 लाख रुपयांचे बजेट तयार करण्यात आले होते.हि वास्तू आयताकार असून ज्यात तीन भाग आहेत. त्यातील मोठ्या द्वाराची उंची हि 26 मीटर असून त्याच्या घुमटाचा व्यास हा 15 मीटर आहे. आणि त्याचे जे चार जाळीदार मिनार आहेत तेही सुंदर आहेत. समुद्रकिनारी वसलेली हि भव्य वास्तू आणि त्यालगतच समुद्र किनाऱ्याने गेलेला प्रसिद्ध असा मरीन ड्राईवचा रस्ता.भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा इंग्रज भारत सोडून गेले तेव्हा त्याचं शेवटचं जहाजा याच ठिकाणाहून रवाना झालं.काही काळानंतर यामध्ये स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्त्यासुद्धा लावण्यात आल्या आहेत.मुंबई मधील गेटवे ऑफ इंडिया हि वास्तू भारतातीलच नाही तर विदेशी पर्यटकांचेही आकर्षण केंद्र झाले आहे.रात्रीच्या वेळी तर या वास्तूचे सौंदर्य आणखीच बहरते. मुंबईवासियांसाठी तर हे ठिकाण फार महत्वपूर्ण आहे.भारताच्या महत्वपूर्ण वास्तूंपैकी एक अशी म्हणजे गेटवे ऑफ इंडिया!हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि जुळून रहा माझी मराठी सोबत.
गेटवे ऑफ इंडिया बद्दल विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न – FAQ About Gateway of India
प्र. 1. गेटवे ऑफ इंडिया हि वास्तू कोठे स्थित आहे?
उ. मुंबई.
प्र. 2. गेटवे ऑफ इंडिया उभारण्याचा उद्देश?
उ. किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांची भारतभेट हि एक ऐतिहासिक आठवण ठरावी या उद्देशाने?
प्र. 3. गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती केव्हा सुरु झाली?
उ. 1911 साली.
प्र. 4. गेटवे ऑफ इंडियाचे निर्माण कार्य केव्हा पूर्ण झाले?
उ. 1924 साली.