Ganpati Stotra
नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांचे लाडके, बुद्धीचे अधिष्ठाता आणि विघनांचे नियंत्रक मानले जाणारे भगवान शिव आणि देवी पार्वती नंदन भगवान गणेश यांच्या स्त्रोतांचे लिखाण करणार आहोत.
गणपती (श्री गणेश) स्तोत्र – Ganpati Stotra Marathi
।। श्री गणपती स्तोत्र।।
जय जयाजी गणपती। मज द्यावी विपुल मती। करावया तुमची स्तुती। स्पुर्ती द्यावी मज अपार।।०१।।
तुझे नाम मंगलमूर्ती। तुज इंद्र-चंद्र ध्याती। विष्णू शंकर तुज पूजिती। अव्यया ध्याती नित्य काळी।।०२।।
तुझे नाव विनायक। गजवदना तू मंगल दायक। सकल नाम कलिमलदाहक। नाम-स्मरणे भस्म होती।।०३।।
मी तव चरणांचा अंकित। तव चरणा माझे प्रणिपात। देवधीदेवा तू एकदंत। परिसे विज्ञापना माझी।।०४।।
माझा लडिवाळ तुज करणे। सर्वापरी तू मज सांभाळणे। संकटामाझारी रक्षिणे। सर्व करणे तुज स्वामी।।०५।।
गौरी पुत्र तू गणपती। परिसावी सेवकाची विनंती। मी तुमचा अनन्यार्थी। रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया।।०६।।
तूच माझा बाप माय। तूच माझा देवराय। तूच माझी करिशी सोय। अनाथ नाथा गणपती।।०७।।
गजवदना श्री लम्बोदरा। सिद्धीविनायका भालचंद्रा। हेरंभा शिव पुत्रा। विघ्नेश्वरा अनाथ बंधू।।०८।।
भक्त पालका करि करुणा। वरद मूर्ती गजानना। परशुहस्ता सिंदुरवर्णा। विघ्ननाशना मंगलमूर्ती।।०९।।
विश्ववदना विघ्नेश्वरा। मंगलाधीषा परशुधरा। पाप मोचन सर्वेश्वरा। दिन बंधो नाम तुझे।।१०।।
नमन माझे श्री गणनाथा। नमन माझे विघ्नहर्ता। नमन माझे एकदंता। दीनबंधू नमन माझे।।११।।
नमन माझे शंभूतनया। नमन माझे करुणांलया। नमन माझे गणराया। तुज स्वामिया नमन माझे।।१२।।
नमन माझे देवराया। नमन माझे गौरीतनया। भालचंद्रा मोरया। तुझे चरणी नमन माझे।।१३।।
नाही आशा स्तुतीची। नाही आशा तव भक्तीची। सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची। आशा मनी उपजली।।१४।।
मी मूढ केवल अज्ञान। ध्यानी सदा तुझे चरण। लंबोदरा मज देई दर्शन। कृपा करि जगदीशा।।१५।।
मती मंद मी बालक। तूच सर्वांचा चालक। भक्तजनांचा पालक। गजमुखा तू होशी।। १६।।
मी दरिद्री अभागी स्वामी। चित्त जडावे तुझिया नामी। अनन्य शरण तुजला मी। दर्शन देई कृपाळुवा।।१७।।
हे गणपती स्तोत्र जो करी पठण। त्यासी स्वामी देईल अपार धन। विद्या सिद्धी चे अगाध ज्ञान। सिंदूरवदन देईल पै।।१८।।
त्यासी पिशाच भूत प्रेत। न बाधिती कळी काळात। स्वामीची पूजा करोनी यथास्थित। स्तुती स्तोत्र हे जपावे।।१९।।
होईल सिद्धी षड्मास हे जपता। नव्हे कदा असत्य वार्ता। गणपती चरणी माथा। दिवाकरे ठेविला।।२०।।
।। इति श्री गणपती स्तोत्र संपूर्ण।।
श्री गणेश म्हटलं तर हे देवलोकातील सर्व देवांचेच नाही तर भूलोकावर राहणाऱ्या सर्व प्राणी मात्रांचे देखील ते सर्वात लाडके आणि पूजनीय दैवत आहेत. आधुनिक युगात भगवान गणेश यांच्याबद्दल अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्या पौराणिक कथानुसार त्यांची १२ नावे प्रसिध्द असून त्यांना इतरही नावाने संबोधले जाते.
बारा गणेश नावांपैकी आठ नावांची अष्टविनायक मंदिर आपल्या महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आहेत. श्री गणेश यांच्याबद्दल अनेक पौराणिक कथा लिखित स्वरुपात अस्तित्वात असल्या तरी त्यांचे वाचन करायला खुप अवधी लागतो. म्हणून काही संतानी गणपती स्तोत्रांची निर्मिती करून श्री गणेशांची महती सांगणाऱ्या पोथ्यांचे काम सोप केलं आहे.
भगवान गणेश यांच्या संपूर्ण जीवन गाथा त्यांनी थोडक्या शब्दांत आपल्या समोर सदर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे स्तोत्र संस्कृत आणि मराठी अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत. या स्तोत्रांचे नियमित पठन केल्याने आपणास श्री गणेश यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळते. या स्तोत्रांमध्ये भगवान गणेश यांची सगळी नावे, त्यांची कार्यगाथा, आणि आपल्या भक्तांप्रती असलेल प्रेम या सर्व गोष्टींचा या गणपती स्तोत्रांमध्ये उल्लेख केला गेला आहे.
मित्रांनो, आम्ही देखील अश्याच सावरूपाचे काही गणपती स्तोत्रांचे लिखाण खास आपल्यासाठी केलं आहे. तरी, आपण या स्तोत्रांचे नियमित पठन करून गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवा. धन्यवाद..
गणपती स्तोत्र (संकटनाशन स्तोत्र) – Sankat Nashan Ganpati Stotra
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम॥३॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम॥४॥
द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय:॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:॥८॥
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम॥
नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया अश्या प्रकारची हाक आपल्या कानी पडताच आपलं मन कस प्रफुलीत होते. आपण दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची प्रतिष्ठापना आपल्या घरी करीत असतो.
श्री गणेश हे एकमेव असे देव आहेत जे वृद्धांपासून बालगोपालांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत आहेत. भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या लाडके पुत्र भगवान गणेश यांना सर्व देवांमध्ये प्रथम स्थान देण्यात आलं आहे. म्हणून कोणत्याही शुभ प्रसंगी प्रथम गणपती पूजन केलं जाते. तसचं, गणपती आरती व गणपती स्तोत्र यांचे पठन देखील केलं जाते.
तसचं, भगवान गणेश यांना बुद्धीचे दैवत मानलं जाते तसचं, त्यांच्याजवळ माता रिद्धी आणि माता सिद्धी या दोन महत्वपूर्ण शक्ती आहेत. आधुनिक काळात तर त्यांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यानुसार आपण दर महिन्यात येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी आणि महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी गणेश मंदिरामध्ये श्री गणेश स्तोत्र पठन करीत असतो.
त्यामुळे आपल्याला सु:ख शांती प्राप्त होते. गणपतीला सु:ख कर्ता आणि दु:ख हरता अश्या प्रकारची उपमा देण्यात आली आहे.
गणपती बाप्पांच्या स्तोत्रांचे नियमित पठन करीत राहल्याने आपले सर्व दुख, दारिद्र्य नाहीसे होवून जाते. अशी लोकांची भावना आहे. संस्कृत आणि मराठी भाषेत रचल्या गेलेल्या गणेश स्तोत्रांमध्ये भगवान गणेश यांची संपूर्ण माहिती सांगितली आहे. त्यांच्या अनेक नावांचे वर्णन त्यात केलं गेल आहे.
मित्रांनो, आपण देखील या गणेश स्तोत्रांचे नियमित वाचन करावे म्हणून आम्ही देखील या लेखात आज श्री गणेश स्तोत्रांचे लिखाण केलं आहे. तरी आपण या स्तोत्रांचे नियमित वाचन करून आपल्या मित्रानांची सांगा धन्यवाद..