Ganesh Pooja
आपल्या भारतात लोकांच्या मनात देवाप्रती श्रध्दा, धार्मीकता, विश्वास, पहायला मिळतो. लोक अतिशय विश्वासाने परमेश्वराप्रती आपला भाव अर्पीत करून व्रत नियम उपास करतांना बघायला मिळतात. हया पुजा करतांना त्यांना सुलभ पध्दतीने करता यावी म्हणुन काही पुजा विधी आम्ही त्यांच्याकरता घेउन आलो आहोत. या पुजाविधीच्या मार्गदर्शनाने त्यांना पुजाविधी अगदी सहजतेने करता येईल.
भगवान गणेशाची पुजा ज्याला विनायक चतुर्थी पुजेच्या नावाने देखील लोक ओळखतात, या पुजे दरम्यान पुराण मंत्र जपा सोबत सगळया देवतांसोबतच सोळा अनष्ठानाची देखील पुजा केली जाते, जी पुजा आपल्याला शोडषोपचार पुजेच्या नावाने देखील माहीती आहे.
भगवान गणेश पुजाविधी – Ganesh Pooja Vidhi
गणेश पुजन प्रातः काळी, मध्य काळी, सायं काळी करता येतं. मध्यकाळ गणेश पुजनाकरता सर्वश्रेष्ठ मानल्या गेला आहे. जेव्हा मध्यकाळात गणेश पुजा होते त्याला मुहूर्त म्हंटल्या जातं. भारतीय अनुष्ठानात गणेश पुजा सोळा चरणात पुर्ण होते.
नवी गणेश प्रतिमा, मुर्ती किंवा चीत्राचे पुजन, आवाहन, संकल्प एक एक चरणात पुर्ण केल्या जातं. पुजेच्या शेवटी आपण प्रतीमेचे विसर्जन केले किंवा नाही केले तरी उत्तरपुजेने पुजेची समाप्ती होते.
गणेश पुजनाकरता लागणारे साहित्य – Ganesh Pooja Sahitya
- 1 चैरंग आणि 1 लाल रंगाचे कापड
- गणेशाची मुर्ती किंवा प्रतिमा
- अक्षदा
- तुपाची वात असलेला दिवा
- धुपबत्ती
- कुंकु
- फुलं आणि हार
- अत्तर
- जानवी जोड
- गंगाजल
- दुर्वा
- मोदक, लाडु, किंवा पेढे
गणेश पुजेचा विधी – Ganesh Pooja Vidhi
- सर्वप्रथम पुजेच्या ठिकाणी चैरंग ठेउन त्यावर लाल कापड टाकावे, त्यावर मुर्ती किंवा प्रतिमा ठेउन तुपाचा दिवा आणि धुपबत्ती लावावी.
- भगवान गणेशाचं आवाहन अश्या प्रकारे करावं – हे भगवंता आपण आमच्या इथे येउन या पुजेचा स्विकार करावा.
- यानंतर मुर्ती किंवा प्रतिमा जे असेल त्याला गंगाजलाने स्नान घालावे मग वस्त्र घालावे आणि जानवी जोड घालावा.
- कपाळावर रोळी चा टिळा लावावा त्यावर कुंकु लावुन अक्षदा वाहावी.
- पेढे, लाडु, मोदक यापैकी जे असेल त्याचा नैवेद्य दाखवावा.
- अत्तर लावुन फुलं आणि हार घालावा, मुर्तीला सजवावे. दुर्वा वाहाव्या.
- गणेशाचे ध्यान करून ओम गंः गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
गणेश विसर्जनाचा विधी – How to do Ganesh Visarjan
भगवान गणेशाला वाहीलेले फुलं, हार, अक्षदा, सजावट काढण्यापुर्वी भगवंताला क्षमाप्रार्थना करावी. आपण आमच्या इथं आले त्याकरता आपला धन्यवाद. पुजेत जे काही कमी, उणीव राहीली असेल त्याकरता आम्हाला क्षमा करा आणि आमच्या पुजेचा स्विकार करून आम्हाला आशिर्वाद द्या. याप्रकारे क्षमाप्रार्थना करावी.
ही गणेश पुजनाची सरळ आणि अत्यंत सोपी पध्दत आहे. याला कोणीही सहज करून भगवान गणेशाचा आशिर्वाद प्राप्त करू शकतो.
Read More:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी भगवान गणेश पुजाबद्द्ल माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा भगवान गणेश पुजाविधी / Ganesh Pooja Information In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.