Ganga Aarti
नमस्कार मित्र/ मैत्रिणींनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून देवी गंगा यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या गंगा देवी यांची विविध रूपे, नावे तसचं त्यांची स्तुती करण्यात आलेल्या आरतीचे लिखाण करणार आहोत.
गंगा देवीची आरती – Ganga Aarti
ॐ जय गंगे माता, मैया जय गंगे माता।
जो नर तुमको ध्याता, मनवांछित फल पाता।
ॐ जय गंगे माता, मैया जय गंगे माता।
चंद्र सी ज्योति तुम्हारी, जल निर्मल आता।
शरण पड़े जो तेरी, सो नर तर जाता।
ॐ जय गंगे माता, मैया जय गंगे माता।
पुत्र सगर के तारे, सब जग को ज्ञाता।
कृपा दृष्टि हो तुम्हारी, त्रिभुवन सुख दाता।
ॐ जय गंगे माता, मैया जय गंगे माता।
एक बार जो प्राणी, शरण तेरी आता।
यम की त्रास मिटाकर, परमगति पाता।
ॐ जय गंगे माता, मैया जय गंगे माता।
आरति मातु तुम्हारी, जो नर नित गाता।
सेवक वही सहज में, मुक्ति को पाता।
ॐ जय गंगे माता, मैया जय गंगे माता।
तसचं, देवी गंगा यांच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. देवी गंगेला मातेचा दर्जा दिला असल्याने ती आपल्या बालकांच्या सर्व दुखांचा नाश करते. गंगा देवी ही ब्रह्म देवाच्या कमंडल मधून वाहत असल्याने आणि भगवान शिव यांनी आपल्या जटेत तिला स्थान दिले असल्याने गंगा देवीला खूप पवित्र मानलं जाते.
हिंदू धार्मिक लोकांची अशी मान्यता आहे की, गंगा नदीत स्नान केल्याने आपली सर्व वाईट कर्म नाहीसे होतात. म्हणून भाविक मोठ्या संख्येने गंगा नदीच्या जल पत्रात स्नान करीत असतात. तसेच गंगा नदीचे पाणी तीर्थप्रसादाच्या स्वरुपात ग्रहण करीत असतात.
हिंदू धार्मिक पौराणिक धर्म ग्रंथांमध्ये गंगा देवीला विशेष महत्व दिले असून त्यांच्या उत्पत्तीबाबत अनेक दंतकथा देखील प्रसिद्ध आहेत.
ग्रंथ कथात वर्णन केल्याप्रमाणे गंगा देवीच्या उत्पत्तीबाबत लोकांच्या विविध धारणा आहेत. त्यांपैकी काही लोकांच्या मते, देवी गंगा यांचा उगम ब्रह्म देवाच्या कमंडल मधून गंगा नावाच्या मुलीच्या रुपात झाला. दुसऱ्या कथेनुसार, ब्रह्म देवाने विष्णू भगवान यांचे चरण धुतले आणि ते जल आपल्या कमंडल मध्ये जमा केले त्यातून देवी गंगेचा उगम झाला आहे.
या कथांप्रमाणे देवी गंगा यांच्या उगम होण्याबाबत असे देखील सांगण्यात येते की, देवी गंगा या पर्वतांचे राजा हिमालय आणि त्यांची पत्नी मीना यांच्या कन्या आहेत. यानुसार त्या देवी पार्वती यांच्या बहिण झाल्या. परंतु, या सर्व कथांमध्ये एक गोष्ट सामन्य आढळून येते ती म्हणजे देवी गंगा यांचे पालन पोषण ब्रह्म देवांच्या संरक्षणात झाले.
याचप्रमाणे, देवी गंगा यांचे धरतीवर आगमन होण्यामागे देखील एक दंत कथा प्रचलित आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेवूया. सागर नामक राजाने आपल्या साम्राज्याच्या समृद्धीसाठी एक विशाल यज्ञाचे आयोजन केले होते. तसचं, या यज्ञ विधीचा अविभाज भाग एक घोडा होता जो इंद्र देवाने इर्षेने चोरून नेला.
राजा सागर यांना घोड्या बद्दल बातमी कळताच त्यांनी आपल्या साठ हजार पुत्रांना घोड्याचा शोध घेण्यासाठी पृथ्वीच्या चारी दिशेला पाठवले. घोड्याचा शोध करण्यासाठी जेंव्हा पृथ्वी खोदण्यात आली तेंव्हा त्यांना दिसले की, देव ‘महर्षी कपिल’ यांच्या रुपात तपस्या करीत आहेत आणि त्यांच्या बाजूला आपल्या राजा सागर यांचा घोडा गवत चरत आहे.
हे दृश्य पाहताच ते बंधू चोर चोर म्हणून जोर जोरात गर्जना करू लागले. त्यांच्या आवाजाने कपिल ऋषींचे ध्यान हटले त्यांनी क्रोधात आपले डोळे उघडले. परिणामी ऋषींच्या डोळ्यातून अग्नी निर्माण होवून राजा सागर यांची सर्व प्रजा भस्म झाली. तेंव्हा प्रजेच्या उद्धारासाठी महाराज दिलीप यांचे पुत्र भगीरथ यांनी कठोर तपश्चर्या केली.
भगीरथाच्या तपस्येने ब्रह्म देव प्रसन्न झाले आणि त्यांनी राजा भगीरथ यांना वर मागण्यास सांगितले. राजा भगीरथ यांनी गंगा नदीला पृथ्वीवर अवतरीत करण्यास सांगितले. ब्रह्म देवाने राजा भगीरथ यांचे वर ऐकताच त्यांनी प्रश्न केला की, पृथ्वीवर देवी गंगा यांचा भार आणि वेग कोण सांभाळेल? शिवाय, त्यांनी राजा भगीरथ यांना सांगितल की, देवी गंगा यांचा भार आणि वेग सांभाळण्याची शक्ती केवळ भगवान शंकरजी यांच्यातच आहे. तेंव्हा तुम्ही त्यांची आराधना करा.
राजा भगीरथ यांना ब्रह्म देवाचे म्हणने पटले त्यांनी भगवान शिव यांची कठोर तपश्चर्या केली. राजा भगीरथ यांच्या तपश्चर्याने महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी गंगा यांचा वेग आणि भार सांभाळण्याचे राजा दशरथ यांना वचन दिले. यानंतर, ब्रह्म देवाने आपल्या कमंडल मधून देवी गंगा पृथ्वीवर सोडली आणि तिचा भार भगवान शिव यांनी आपल्या जटामध्ये तिला सामावून घेतले.
हिमालय पर्वतातून उगम पावत गंगा नदीने घाट माथ्यांच्या वळणावरून प्रवास करत मैदानी प्रदेशांत प्रवेश केला. अश्या प्रकारे राजा भगीरथ यांनी देवी गंगाला पृथ्वीवर अवतरीत करून भाग्याचे हकदार झाले. राजा भगीरथ यांच्या कठोर तपश्चर्या मुळे आज पृथ्विरील सर्व प्रनिमात्राना तिच्या दर्शनाचा लाभ मिळाला आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी या शहरांत गंगा नदीचे पवित्र घाट असून त्याठिकाणी देवी गंगेची दररोज आरती करण्यात येते. तसचं या नदीच्या काठी दर बारा वर्षातून कुंभ मेळा देखील भरला जातो. गंगा देवीच्या आरतीचे विशेष महत्व असल्याने आपण नियमित या आरतीचे पठन केले पाहिजे.