Funny Google Tricks
गुगल हे जगातील सगळ्यात लोकप्रिय सर्च इंजिन आहे, गुगल चा उपयोग लोक इंटरनेट वर आवश्यक माहिती शोधण्यासाठी करतात.
पण बऱ्याच लोकांना गुगल मध्ये असलेल्या काही ट्रिक्स आणि सिक्रेट माहितच नाहीत.
म्हणून आपण आज या लेखात पाहणार आहोत २० अश्या गमतीदार ट्रिक्स आणि सिक्रेट – Magic Tricks of Google ज्या तुमच मनोरंजन करतील.
गुगल च्या २० गमतीदार माहिती नसलेल्या बेस्ट ट्रिक्स आणि सिक्रेट – Funny Google Tricks
1) Tic Tac Toe:
Tic Tac Toe हा एक जुन्या प्रकार चा सोपा खेळ आहे, आणि या खेळाला काही भागात चौसर म्हणून सुद्धा ओळखतात. जेव्हा तुम्ही गुगल च्या सर्च बार मध्ये Tic Tac Toe टाईप करता तेव्हा तुम्हाला तुमच्या कम्प्युटर वर त्या खेळाची स्क्रीन उघडते आणि तुम्ही तो खेळ खेळू शकता, हा खेळ तुम्ही कम्प्युटर च्या विरोधातहि खेळू शकता आणि त्यामध्ये तुमच्यासाठी तीन वेगवेगळे फॉरमेट मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.
२) Super Mario Bros:
Super Mario Bros हा एक प्रसिद्ध गेम आहे, गुगल मध्ये जेव्हा तुम्ही सर्च बॉक्स मध्ये “Super Mario Bros” टाईप करता आणि सर्च करता.
तेव्हा तुमच्या कॅम्पुटर स्क्रीन च्या उजव्या बाजूला एक प्रश्नार्थक चिन्हाचा ब्लॉक दिसतो.
ज्यावर जर तुम्ही क्लीक केले तर त्यामधून २०० अंक निघताना दिसतात जसे गेम मध्ये होताना दिसते.
आणि जर तुम्ही पेशंस ठेवून त्यावर क्लीक करत राहिले तर गेम मध्ये जसा आवाज येतो तशी आपल्याला अनुभूती येते आणि आपल्याला असे वाटते कि आपणच तो गेम खेळत आहोत.
३) I’m feeling lucky:
“I’m feeling lucky” हे बटन गुगल सर्च बॉक्स च्या खाली असते पण काही कॅम्पुटर मध्ये ते नसू हि शकते, त्याचे कारण कम्प्युटर मधील ब्राउझर पण असू शकते, पण जवळपास सगळ्या कम्प्युटर मध्ये ते उपलब्ध च असते.
ह्या ट्रिक्स मध्ये तुम्हाला तीन प्रकारच्या गमती पाहायला मिळू शकतात.
जेव्हा तुम्ही गुगल च्या स्पेस बॉक्स मध्ये “Google Gravity” टाकता आणि “I’m feeling lucky” या बटनावर क्लिक करता तेव्हा स्क्रीन वरील सगळे लोगो खालच्या बाजूला येतात आणि तुम्ही त्या सगळ्या लोगोंना तुमच्या माउस नुसार हलवू सुद्धा शकता.
तसेच तुम्ही जर सर्च बॉक्स मध्ये Google Space टाकून I’m feeling lucky या बटनवर क्लिक केले तर तुमच्या स्क्रीन वर space सारखा इंटरफेस उघडतो आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या माउस च्या मदतीने सगळे लोगो इकडे तिकडे उडवू शकता
४) BLINK HTML:
BLINK HTML हे गुगल चे आणखी एक गमतीदार फिचर आहे, ज्यामध्ये तुम्ही जेव्हा सर्च बॉक्स मध्ये “BLINK HTML” हे टाईप करता आणि तुमच्या समोर जेवढे पण रीझल्ट येतील त्यामध्ये ते दोन च शब्द तुम्हाला चांदण्यांसारखे लुकलुकतांना दिसतील.
५) PACMAN:
हे गुगल च अस हिडन फिचर आहे जे खूप वर्षांपासून गुगल वर अस्तित्वात आहे.
आणि खूप लोकांना त्याविषयी माहिती सुद्धा आहे, गुगल ने २०१० ला PACMAN चा तिसावा वर्धापन दिन साजरा केला होता.
आणि PACMAN हे गुगल वर सर्च केल्या जाणाऱ्या जुन्या ऐंशी पेज पैकी एक पेज आहे.
ह्याविषयी आणखी जाणण्यासाठी सर्च बार मध्ये “PACMAN” टाईप करा आणि सर्च बटन वर क्लिक करा.
आणि त्यानंतर प्ले बटनावर क्लीक करा.
आता तुमच्या समोर PACMAN चे पाच वेगवेगळे वर्जन दिसून येतील तुम्हाला जो आवडेल तो सिलेक्ट करा व खेळा.
आणि हा गेम खेळण्यासाठी तुम्ही तुमच्या कीबोर्ड च्या अप-डाऊन या बटनांचा वापर करू शकता.
६) कॅल्क्युलेटर – Calculator :
जवळजवळ सगळे सोपे कॅल्क्युलेशन करण्यासाठी सर्च बार चा वापर करतात, पण एखादे कठीण कॅल्क्युलेशन करणे सर्च बार मध्ये सुद्धा कठीण जाते आणि त्यासाठी आपण कॅल्क्युलेटरचा वापर करतो, गूगल सर्च बार मध्ये “Calculator” असे टाईप करा, त्यानंतर तुमच्या समोर एक मॉडर्न कॅल्क्युलेटर उघडेल.
आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या किबोर्ड चे बटन वापरून सुद्धा करू शकता.
७) एकापेक्षा जास्त भाषा – More Than One Language:
गुगल मध्ये हे एक असे फिचर आहे ज्यामध्ये एकापेक्षा जास्त भाषा उपलब्ध आहेत.
आणि गुगल जवळ हा एक वेगळा सर्च बार आहे तुमच्या साठी, “Search Setting” वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला जी हवी ती भाषा निवडा,पण भाषा निवडल्यानंतर तुमच्या गुगल सर्च पेज ची भाषा सुद्धा बदलणार आहे हे लक्षात घ्या.
ह्या ट्रिक्सचा अनुभव घेतल्यानंतर आठवणीने तुमच्या गुगल सर्च पेज ची भाषा पहिल्यासारखी करा.
८) GOOGLE IN 1998:
१९९८ मध्ये गुगल कश्या प्रकारे दिसायचं हे या ट्रिक मध्ये आहे.
फक्त तुम्हाला गुगल सर्च बार मध्ये ”GOOGLE IN 1998” असे टाईप करावे लागेल,त्यानंतर तुम्हाला दिसेल कि गुगल १९९८ मध्ये कश्या प्रकारे दिसत होत.
आणि तुम्हाला त्या पेज वरून पुन्हा चालू पेज वर परत येण्या साठी “Take Me Back To The Present” यावर क्लिक करावे लागेल.
आणि तुम्ही २० वर्षानंतर च्या पेजवर परत आले असाल.
९) Flip a coin:
बरेचदा खूप जणांना कठीण जात निर्णय घ्यायला म्हणून ते नाणेफेक करून निर्णय घेतात,पण बऱ्याच वेळा नाणे जवळ नसते मग आपण आपल्या संगणकाचा सर्च बार वापरून नाणेफेक करू शकतो.
आपण विचार कराल आता हे कशाप्रकारे होत असेल तर चला जाणून घेऊया हि ट्रिक्स.
Flip a coin हि अशी एक गमतीदार ट्रिक्स आहे, ज्यामध्ये नाणे हेड किंवा टेल दाखवते.
तुम्हाला फक्त तुमच्या सर्च बार मध्ये जाऊन “Flip a coin” टाईप करायचे आहे, आणि सर्च करायचे आहे.सर्च केल्यांनतर हि ट्रिक्स तुमच्या समोर असेल
१०) Roll the dice:
गणितातील संभाव्यता शिकताना तसेच सापशिडी खेळतांना बरेच लोक Dice चा वापर करतात,तश्याच प्रकारे गुगल तुम्हाला Dice सोबत खेळण्याचा अनुभव देते.
फक्त तुम्हाला सर्च बार मध्ये “Roll the dice “ टाईप करावे लागेल त्यानंतर तुम्हाला हि ट्रिक अनुभवता येईल,
११) Festivus:
या ट्रिक्स चा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला गुगल च्या सर्च बार मध्ये “Festivus” टाईप करावे लागेल.
त्यांनतर तुम्हाला गुगल च्या पेज वर डाव्या बाजूला एक खांब दिसेल जो कि पूर्ण पेज वर उभा असेलेला तुम्हाला दिसून येईल.
१२) Solitaire:
दैनिंदिन जीवनात बरेच लोक पत्ते खेळतात,आणि मनोरंजन करतात, गुगल सर्च बार वर सर्च करून सुद्धा गुगल वर पण मनोरंजन करता येऊ शकते.
फक्त तुम्हाला सर्च बार मध्ये “Solitaire” म्हणून सर्च करावे लागेल आणि “Play” बटन वर क्लिक करावे लागेल.
यामध्ये दोन प्रकारचे मोड राहतील एक सोप आणि एक कठीण.
१३) fun facts:
जर तुम्हाला शिकण्यात इंटरेस्ट असेल आणि ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करण्यात रस असेल तर हि ट्रिक्स आपल्यासाठी खूप उपयोगाची आहे.
तुम्हाला फक्त गुगल सर्च बार मध्ये “fun facts” असे टाईप करावे लागेल.
त्यानंतर “सर्च” बटन वर क्लिक करावे लागेल.
तुमच्या समोर एकापेक्षा एक आणि तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी येतील.
ज्यामुळे तुम्ही तुमच ज्ञान वाढवू शकता.
१४) Teapot:
गुगल ची हि ट्रिक थोडीफार मनोरंजनासाठी आहे.
गुगल ने ह्या ट्रिक वर मेहनत घेतली आहे.
तुम्हाला हि ट्रिक अनुभवण्यासाठी तुमच्या सर्च बार मध्ये “Google.com/teapot” असे टाईप करावे लागेल.
त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर अॅनिमेशन मध्ये चहाची कॅटली उघडेल, आणि जेव्हा तुम्ही त्या कॅटली वर आपल्या माउसने क्लिक कराल, तेव्हा ती कॅटली कप मध्ये चहा ओतताना दिसेल,
१५) Annoying Google:
Annoying Google हि गुगल ची एक अशी ट्रिक्स आहे,ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कम्प्युटर ला पर्सनल ठेवू इच्छिता आणि तुमच्या व्यतिरिक्त जर कोणी तुमच कम्प्युटर वापरले तर त्याला ते वाचण्यास त्रासदायक वाटेल.
त्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्च बार मध्ये “Annoying Google” सर्च करावे लागेल त्यांनंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल आणि पहिल्या रीझल्ट वर क्लिक केल्या नंतर तुमच्या गुगल चे होम पेज वेगळ्या प्रकारे उघडेल,
आणि त्यामध्ये जर कोणी सर्च बार मध्ये काही टाईप केले तर आपोआप त्याचे मोठ्या आणि लहान अक्षरात रुपांतर होईल.
आणि ते वाचायला त्रासदायक जाईल.
१६) Atari Breakout:
हे गुगल सिक्रेट मधील सगळ्यात आवडीची सिक्रेट ट्रिक आहे.
२०१३ मध्ये गुगल ने Atari Breakout चा ३० वा वर्धापन दिन साजरा केला.
ह्या ट्रिक चा अनुभव घेण्यासाठी गुगल बार मध्ये “Atari Breakout” टाईप करा, त्यानंतर तुम्ही तुमच्या माउस च्या मदतीने त्या स्क्रीन ला हाताळू शकता.
१७) ASKEW:
ASKEW हि गुगल ची अशी गमतीदार ट्रिक आहे, आणि ह्या ट्रिक चा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला गुगल च्या सर्च बार मध्ये “ASKEW” असे टाईप करावे लागेल.
आणि सर्च बटन वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला एखादी गोष्ट शोधण्यासाठी तुमच्या गुगल पेज वर थोडा तिरपा असलेला रिसल्ट येईल.
तुम्ही त्यामध्ये एखादा शब्द टाकून तो शब्द शोधू शकता.
१८) DO A BARREL ROLL:
DO A BARREL ROLL हे गुगल चे गमतीदार आणि जवळजवळ शेवटचे हिडन सिक्रेट आहे.
जेव्हा तुम्ही तुमच्या गुगल सर्च बार मध्ये “DO A BARREL ROLL” असे टाईप करता, आणि सर्च बटन वर क्लिक करता.
त्यानंतर तुमचे गुगल चे पेज तुम्हाला ३६० अंशात फिरताना दिसेल.
१९) दोन ठिकाणांमधील अंतर किंवा फ्लाईट शोधणे – Find Different Flits:
दोन ठिकाणांमधील अंतर किंवा फ्लाईट शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल सर्च बार मध्ये आपल्या शहराचे नाव आणि आपल्याला शोधायचे असलेल्या शहरापर्यंत चे नाव टाकावे लागेल.
(उदा- Mumbai To Delhi) त्यांनतर तुम्हाला त्या दोन शहरांमधील अंतर आणि फ्लाईट दाखवल्या जातील.
ह्या ट्रिक मुळे तुम्हाला दोन शहरांमधील अंतर आणि फ्लाईट शोधण्यासाठी सोपी जाईल.
२०) ZERG RUSH:
जर तुम्हाला गेम खेळायला आवडत असेल तर तुम्ही या ट्रिक चा आनंद घेऊ शकता.
फक्त तुम्हाला तुमच्या सर्च बार मध्ये “ZERG RUSH” टाकावे लागेल आणि सर्च करावे लागेल, यामध्ये तुम्हाला तुमचे गुगल चे पेज पूर्णपणे उलटे होताना सुद्धा दिसेल.
आणि त्यासोबत तुम्हाला आणखी गमती दिसतील,
तर आपण आजच्या लेखात पाहिल्या गुगल च्या २० हिडन सिक्रेट आणि ट्रिक्स.
गुगल कडे अश्याच खूप ट्रिक्स आहेत पण ते या एका लेखामध्ये समाविष्ट करणे शक्य नाही.
पण आम्ही प्रयत्न करू कि या विषयावर आणखीन शोध घेऊन, आपल्यासाठी नवीन ट्रिक्स शोधून आणू आणि आपल्याला योग्य माहिती देऊ.
त्यासाठी कनेक्ट राहा आमच्या सोबत.
आणि आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर याला तुमच्या मित्रांपर्यंत पोहचवा.
अश्याच गुगल ट्रिक्स आणि सिक्रेट जाणून घेण्यासाठी जुडून राहा आमच्या माझी मराठी सोबत.