Friendship Captions

मनाच्या इवल्याश्या कोपर्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात.

जिथे बोलण्यासाठी “शब्दांची”गरज नसते, आनंद दाखवायला “हास्याची”गरज नसते, दुःख दाखवायला “आसवांची” गरज नसते,न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे “मैत्री” असते.

आयुष्य बदलत असत वर्गातून ऑफिस पर्यंत पुस्तकापासून फाईल पर्यंत जीन्स पासून फॉर्मल पर्यंत पॉकेटमनी पासून पगारापासून प्रेयसी पासून बायकोपर्यंत पण मित्र ते तसेच राहतात.

मैत्रीत नसे कसली रीती, मैत्री म्हणजे निखळ प्रीती, मैत्रीत दाटतो एकच भाव, मैत्री म्हणजे एकमेकांच्या काळजाचा अचूक ठाव.

काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर उगाच जवळ वाटतात, खरंतर ही मैत्रीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.