Flipkart Success Story
आयुष्य हे अतिशय धावपळीचे झालं आहे, आणि मार्केट मध्ये जाऊन शॉपिंग करणे प्रत्येकाला शक्य नाही. रांगेत लागणे,गर्दीत उभे राहणे या सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी बरेच लोक ऑनलाईन शॉपिंग वर भर देतात, त्यांना घरूनच आपली शॉपिंग करायला आवडते. ते आपल्याला हवे असणारे प्रॉडक्ट्स एका क्लिकवर खरेदी करतात, ऑनलाईन शॉपिंग मध्ये भारतात मोठ्या संख्येत वाढ करणारी कोणती कंपनी असेल तर ती फ्लिपकार्ट कंपनी आहे.
फ्लिपकार्ट ही एक ई- कॉमर्स कंपनी आहे. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स बाजारात विकते. आजच्या स्टार्टअप स्टोरी मध्ये आपण या फ्लिपकार्ट कंपनीची स्टार्टअप स्टोरी पाहणार आहोत, कशाप्रकारे फ्लिपकार्ट भारताची एक नावाजलेली ई- कॉमर्स कंपनी बनली. आशा करतो आपल्याला लिहिलेली स्टार्टअप स्टोरी आवडणार, तर चला पाहूया..
देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट – Flipkart History in Marathi
फ्लिपकार्ट च्या स्टार्टअप स्टोरी ची सुरुवात झाली भारताच्या दिल्ली शहरातून, अमेरिकेच्या प्रसिध्द ई- कॉमर्स कंपनी अमेझॉन मध्ये नोकरी ला असणारे दोन मित्र त्यांची दिल्लीला २००५ ला भेट झाली आणि त्यांनी विचार केला की अमेझॉन प्रमाणे भारतात सुध्दा ई- कॉमर्स चे भविष्य उज्वल आहे.
अमेझॉन कंपनीच्या ग्राहकांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यावर उपाय काढून आपण भारतात एक नवीन ई- कॉमर्स कंपनी सुरू करू. दोघांचे विचार जुळले आणि त्यांनी ऑक्टोबर २००७ ला एक नवीन कंपनी सुरू केली त्या कंपनीचे नाव होते फ्लिपकार्ट, आणि त्या कंपनीला सुरुवात करणारे दोघे होते सचिन बन्सल आणि विकी बन्सल.
सुरुवातीला कंपनी ग्राहकांना ऑनलाईन पुस्तके देऊ लागली तेही पोस्टाच्या माध्यमातून. तेव्हा कंपनीला लोकांनी एवढा प्रतिसाद दिला नाही, कारण तेव्हा लोक हा विचार करत होते की कोणीही कोणतीही वस्तू पडताळून पहिल्या शिवाय विकत घेत नाही. मग या कंपनी वर कसा विश्वास ठेवावा.
सुरुवातीला फ्लिपकार्ट कंपनीला लोकांपर्यंत पोहचण्यासाठी बराच वेळ लागला. त्यांनंतर दोन तीन वर्षानंतर फ्लिपकार्ट ने ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री सुरू केली, सोबतच मोबाईल, लॅपटॉप ह्या वस्तूंची विक्री फ्लिपकार्ट ने सुरू केली, आणि त्यांचा अमेझॉन कंपनीत आलेला अनुभव तेव्हा त्यांच्या कामी आला.
भारतामध्ये सुरुवातीला ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी घाबरत होते कारण लोकांची अशी धारणा होती की पेमेंट केल्या नंतर जर प्रॉडक्ट्स मिळाले नाही तर. यावर उपाय काढत फ्लिपकार्ट ने आपल्या ग्राहकांसाठी कॅश ऑन डिलिव्हरी चा पर्याय सुरू केला. ज्यामुळे ग्राहकांमध्ये असलेली भीती संपुष्टात आली आणि त्यांनंतर फ्लिपकार्ट चा व्यवसाय हा वाढतच गेला.
भारतामध्ये ई- कॉमर्स चा व्यवसाय करणाऱ्या आणखी काही भारतीय कंपन्या बाजारात उतरल्या. आणि त्याही या काळात यशस्वी होत गेल्या. भारतामध्ये ई- कॉमर्स ची उलाढाल ३० अब्ज डॉलर एवढी झाली. आणि येणाऱ्या २०२६ पर्यंत हा व्यवसाय २०० अब्ज डॉलर इतका होणार आहे.
फ्लिपकार्ट ची सुरुवात दोन रूम पासून झाली होती आज बँगलोर मध्ये असलेले ऑफीस जवळजवळ ७००० कर्मचाऱ्यांना घेऊन आपले काम करते. फ्लिपकार्ट चे देशात वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसेस आहेत. वॉलमार्ट कंपनी ने फ्लिपकार्ट ला ७७% हिस्सेदारी सोबत १६ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले आहे.
तर ही होती आजची एक नवीन स्टार्टअप स्टोरी जी आपल्याला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देऊन जाईल, की कोणत्याही मोठ्या बदलाला होण्यासाठी जीवनात वेळ लागतेच, तर आशा करतो आपल्याला ही स्टार्टअप स्टोरी आवडली असणार आपल्याला ही स्टार्टअप स्टोरी आवडल्यास या स्टोरी ला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!