Masa chi Mahiti
पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना ‘जलचर प्राणी’ म्हणतात, आपल्या सर्वांना माहीत असलेला जलचर प्राणी म्हणजे मासा होय, आपल्याला सर्व ठिकाणी नदी, विहिरी मध्ये मासे पाहायला मिळतात. बरेच जन घरी सुद्धा मासे पाळतात. तर मासे खूप जन खातात. माश्यांच्या २५००० पेक्षा जास्त प्रजाती आपल्याला संपूर्ण जगभरात पाहायला मिळतात. तसेच ५०% माश्या ह्या गोड्या पाण्यात आढळून येतात.
मासा बद्दल संपूर्ण माहिती – Fish Information in Marathi
हिंदी नाव: | मछली |
शास्त्रीय नाव: | Pisces |
माशाला दोन डोळे असतात, हा प्राणी पाण्यात पोहण्यासाठी आपल्या परांचा उपयोग करतो. माशाचे डोके आकाराने त्रिकोणी व चपटे असते. याचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. माशाच्या शरीरावर खवले असतात. मासा हा प्राणी गोड्या व खाऱ्या पाण्यात राहतो
मासा चे अन्न : Fish Food
पाण्यातील कीटक, किडे हे माशांचे प्रमुख अन्न होय,
वैशिष्ट्य : मासा हा प्राणी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. यांच्या डोळ्यांना पापण्या नसतात.
इतर माहिती : माशांच्या शरीराला पाठीमागील बाजूस दोन पर असतात. त्याचा उपयोग मासे पोहताना दिशा बदलण्यासाठी करतात, बहतेक लोक मासे खाण्यासाठी वापरतात. बाजारात माशांना भरपूर मागणी आहे. त्यामुळे कोळी समाजातील लोक समुद्रातील मासे पकडून विकण्याचा व्यवसाय करतात. तो त्यांच्या अर्थार्जनाचा एक व्यवसाय आहे. माशांचे हृदय दोन कप्प्यांनी बनलेले असते.
उपयोग : मासे माणसांना विविध प्रकारांनी उपयोगी ठरतात. मासे हे अन्न म्हणून वापरतात. तसेच माशांपासून तेल, औषधेदेखील तयार करतात. साबण व सौंदर्य प्रसाधने तयार करताना माशांच्या तेलाचा उपयोग केला जातो. तसेच टाकाऊ माशांचा उपयोग खत म्हणून केला जातो.
मासे हे नेहमी पाण्याच्या तळाशी जाऊन झोप घेतात. काही प्रकारचे मासे दिवसा झोपतात व काही प्रकारचे मासे रात्री झोपतात. माशांना बाह्यकर्ण नसतात. मासे हे नेहमीसमूहाने राहतात.