Marathi Father Day Quotes
जीवनातील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला मिठी मारणे खूप कठीण असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले वडील. जीवनात आपण आई, भाऊ, बहीण, यांच्याशी मनसोक्त पणे बोलू शकतो त्यांच्यासोबत मनसोक्त पणे भांडू पण शकतो त्यांच्यावर रागावू शकतो आणि आपले त्यांच्यावरील प्रेम दाखवू शकतो परंतु आपण वडिलांना आपले प्रेम दाखवू शकत नाही, माझ्या मते वडिलांना मिठी मारणे हे खरच जगातील खूप कठीण कामांमधून एक असेल.
आई जर घराची शोभा असेल तर त्या घराचा आधार असतो एक पिता. स्वतः फाटके बनियान घालेल पण लेकराला कधी कशाची कमतरता भासू देणार नाही. आयुष्यात स्वतः उपाशी राहून दिवस काढेल पण लेकराला कधी उपाशी ठेवणार नाही. मुलांच्या शिक्षणासाठी व्याजाने पैसे काढून मुलाला शिकविण्यासाठी बापाचे हाथ कधी मागे येत नाहीत. तो बापच असतो जो जीवनात मुलांच्या भल्यासाठी काहीही करतो. तर या आजच्या लेखात आपण पाहणार आहोत वडिलांवर काही उत्कृष्ट Quotes. ज्या आपल्याला Father Day मनविण्यासाठी उपयोगी येतील. तर चला पाहूया..
फादर्स डे कोट्स इन मराठी – Happy Father Day Quotes in Marathi
“वडील हे जगासाठी एक व्यक्ती असेल, पण त्याच्या मुलांसाठी संपूर्ण जग असते.”
Marathi Quotes on Fathers Day
“मुलं कितीही मोठे झालेत तरीही असा एकमेव माणूस ज्याच्याकडे ते मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि ते म्हणजे तुमचे बाबा”
Quotes on Father Day in Marathi
“काही न सांगताच त्यांना सर्व कळत होतं, माझ्या बाबांना काही सांगावंच लागत नव्हतं, न मागताच कायम सर्व मिळत गेलं. फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा.”
Few Lines on Father in Marathi
“बाबा म्हणजे अगणित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे सतत काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणार अंतःकरण.”
Status on Father in Marathi
“तुम्ही हरल्यावरही, जी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवते, ती म्हणजे तुमचे वडील.”
Happy Father Day Wishes from Daughter in Marathi
“माझे वडील जरी आज माझ्या सोबत नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्याबरोबर आहे.”
Thoughts on Father in Marathi
“स्वतः Keypad चा Mobile वापरून, तुम्हाला Smart Phone घेऊन देतो, तुमच्या Prepaid चे पैसे स्वतःच भरून , तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो, तो बाप असतो… Father’s Day च्या शुभेच्छा.”
पितृदिनासाठी मराठी शुभेच्छा – Father Day Wishes in Marathi
वडील म्हणजे जीवनातील ती व्यक्ती आहे जी एका छताप्रमाणे काम करते, आयुष्यभर आपल्या डोक्यावरील छत बनून वडील कार्य करतात. आणि जर ती छत आपल्या आयुष्यात नसेल ना तर प्रत्येक सकाळ आपल्याला त्या व्यक्तीची नसल्याची जाणीव करून देते सोबतच रोजची सकाळ ही जबाबदारी घेऊन उगवते आणि माणसाला स्वतःसाठी खूप कमी वेळ भेटतो त्यानंतर माणसाला छत नसण्याची किंमत कळते. म्हणून ज्यांच्याकडे हे छत आहे त्यांनी त्या छताची किंमत समजून घ्या आणि त्या छताला म्हणजेच वडिलांना आपल्या जीवनात त्यांची किती मोठी किंमत आहे हे दाखवून द्या.
जीवनातील ही एकमेव व्यक्ती असते जी आपल्या मुलाच्या चांगल्या कामगिरी पासून ईर्ष्या करत नाहीत, नाहीतर आपल्या जीवनात आपण थोडस काही चांगलं कार्य करायला गेलं की आपले पाय मागे खेचतात. म्हणून आयुष्यात आई वडिलांची किंमत करा. कारण जर आपण त्यांच्या पायाशी राहिलो तर आपल्याला जगात कोणाचे पाय पकडण्याची वेळ येत नाही. चित्रपटांमध्ये आपल्याला पाहायला मिळते की एखादा सुपरहिरो असतो आणि तो पूर्ण जगाला वाचवतो, पण काहीच जग हे त्यांचं आयुष्यच असत आणि त्या आयुष्याचा खरा हिरो त्यांचे वडील असतात. या लेखात पुढेही काही Quotes आहेत ते पाहूया चला..
“वडील म्हणजे समुद्रातील जहाज, जे आपल्याला पाण्यात न भिजवता, किनाऱ्यावर पोचवत असते.”
Happy Father Day Wishes in Marathi
“D = Demand मागितलं ते देणारा, A = Ability क्षमता नसतानाही स्वप्न पूर्ण करणारा, D = Desire उत्साह निर्माण करणारा, म्हणजे बाबा. संपूर्ण जग सामावले आहे, “DAD ” या नावात.”
Fathers Day Greetings in Marathi
“मी मोठा नाही, पण माझ्या पाठीमागे जी ताकद आहे ना, ती खूप मोठी आहे.”
Pitru Divas Quotes
“जरी खिसा रिकामा असला, तरी कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणाले नाही, माझ्या बाबांसारखा मनाने श्रीमंत, मी दुसर कोणाला पाहिलं नाही.”
Fathers Day Messages In Marathi
“एकमेव व्यक्ती जो माझ्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो, ते म्हणजे माझे बाबा.”
Father Day SMS in Marathi
“नशीबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.”
Father Day Status in Marathi
“आयुष्यात बापच असा, एकमेव व्यक्ती असतो, ज्याला वाटतं त्याचा मुलगा त्याच्यापेक्षा successful झाला पाहिजे. “
वडिलांची आयुष्यातली उपस्थिती म्हणजे पौर्णिमेचा चंद्रच ज्याप्रमाणे चंद्र उपस्थित असतो, त्या चंद्राचा सर्वदूर प्रकाश पडलेला असतो. त्याचप्रमाणे आपले आयुष्य असते. वडिलांची आपल्या जीवनातील उपस्थिती म्हणजे आपले जीवन प्रकाशमय असते, परंतु जर वडिल आपल्या जीवनातून निघून गेले तर आपण पोरके होऊन जातो. आयुष्यात आई वडिलांना सर्वात जास्त किंमत द्या, आणि त्यांच्या सांगण्यानुसार पुढे पाऊल टाकत चला. कारण ते तुम्हाला कधीही चुकीचा रस्ता दाखवणारं नाहीत, कारण त्यांच्या मनात फक्त त्यांच्या मुलाला नेहमी सर्वोत्तम पाहायचे असते, Father Day च्या माझी मराठी कडुन सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आशा करतो लेखात लिहिलेल्या Quotes आपल्याला आवडल्या असतील आपल्याला लिहिलेल्या Quotes आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी तसेच Quotes साठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!