Indian Entrepreneurs Success Stories
उद्योजक म्हटलं कि त्यांचा काही ना काही व्यवसाय असतो हे प्रत्येकाला माहितच आहे पण लक्षात घ्या, त्या यशस्वी व्यवसायाच्या मागे त्यांची अफाट अशी मेहनत असते. आणि त्यांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करता कामा नये.
तसेच आज मी आपल्यासाठी एक लेख घेऊन येत आहे, ज्यामध्ये त्या यशस्वी उद्योजकांची संपूर्ण माहिती दिली आहे, आणि त्यांची व्यवसाय करण्याची पद्धत कश्या प्रकारे आहे ते सांगितले आहे.
तर चला जाणून घेऊया त्या व्यक्तींची नावे…
भारतातील यशस्वी उद्योजकांची माहिती – Information About Famous Entrepreneurs of India in Marathi
भारतातील पाच यशस्वी उद्योजकांची यादी – List of Famous Entrepreneurs of India
१) रितेश अग्रवाल – Ritesh Agarwal
रितेश अग्रवाल यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ रोजी ओडीसा राज्यामधील कट्टक येथे झाला. त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षीपासूनच मोबाईलचे सीमकार्ड विकण्यापासून सुरुवात केली, त्यांनी दिल्ली मधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
कोटा मध्ये असतानाच टाटा इंस्टीट्यूट मध्ये एशियन सायन्स कॅम्प मध्ये त्यांची निवड झाली, ज्यामध्ये आशियातील वेगवेगळे विध्यार्थी एकत्र येऊन विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील समस्यांचे निवारण करण्याचे काम करत.
यादरम्यान त्यांना वेगवेगळ्या संमेलनांना जावे लागत असे त्या ठिकाणी त्यांना रहावे लागत असे,एक दिवस असेच त्यांना विचार आला कि आपण ज्याप्रमाणे हॉटेल मध्ये काही वेळापुरते राहतो आणि एवढे पैसे खर्च होतात त्याच प्रमाणे बाकी लोकांनाही ह्या समस्सेला सामोरे जावे लागत असेल,
त्या नंतर त्यांच्या डोक्यात एक व्यवसायाची कल्पना आली आणि त्यांनी सुरुवातीला २०१२ मध्ये ओरवल स्टे नावाची कंपनी सुरु केली. या कंपनीचा एकच उद्देश होता कमी पैशामध्ये लोकांसाठी रूम उपलब्ध करून देणे पण कमी पैशामध्ये असल्यामुळे सुरुवातीला लोकांना त्यामध्ये सुविधा मिळाल्या नाहीत म्हणून सुरुवातीला ह्या कंपनीला अपयशाचा सामना करावा लागला.
त्यानंतर अपयश न पाहता त्यांनी सुधार करत OYO नावाची कंपनी सुरु केली, व त्यामध्ये लोकांना कमी पैश्यामध्ये चांगल्या सुविधा दिल्या आज फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये OYO च्या हॉटेल चे जाळे उपलब्ध आहेत. आणि रितेश अग्रवाल यांच्या OYO ची एक वर्षाची कमाई हि जवळपास ७२५३ करोड रुपये इतकी आहे.
२) विजय शेखर शर्मा – Vijay Shekhar Sharma
विजय शेखर शर्मा यांचा जन्म ८ जुलै १९७८ साली उत्तर प्रदेश मधील अलिगढ जिल्ह्यामध्ये झाला.त्यांनी त्यांचे शिक्षण हे दिल्लीच्या इंजिनीरिंग कॉलेज मधून पूर्ण केले. बरेच लोक म्हणतात कि आम्हाला इंग्रजी भाषा येत नाही म्हणून आम्ही जीवनात काही करू शकत नाही,
पण आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि विजय शर्मा ह्यांनी त्यांचे शिक्षण त्यांची मातृभाषा हिंदीतून पूर्ण केले. जेव्हा त्यांनी इंजिनीरिंग ला प्रवेश घेतला, तेव्हा एक दिवस त्यांना त्यांच्या शिक्षकांनी एक प्रश्न विचारला जो कि इंग्रजी भाषेतून होता तेव्हा त्यांना सुद्धा त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही,आणि जे विजय शर्मा पहिल्या बाकावर बसायचे त्या दिवसापासून शेवटी बसायला लागले.
पण म्हणतात ना जे होते ते चांगल्या साठीच होते ते त्यामुळे वर्गात कमी आणि कॉलेज च्या ग्रंथालयात जास्त वेळ घालवू लागले, त्यामुळे त्यांना प्रेरक गोष्टी वाचायला मिळत. तसेच वेगवेगळ्या गोष्टींचे ज्ञान त्यांना झाले त्यांनी सुरुवातीला आपल्या मित्रांसोबत एक छोटीशी कंपनी सुरु केली पण ती कंपनी जास्त दिवस आपले पाय बाजारात रोऊ शकली नाही आणि त्यांनतर त्यांना बरेच नुकसान झाले.एवढच नाही तर त्यांना त्या कंपनीतील काही लोकांचे वेतन पैसे व्याजावर घेवून करावे लागले.
पण त्यांनी हार न मानता आपले प्रयत्न सुरु ठेवले आणि त्यांनी बाजाराच्या दृष्टीकोनाला पाहता, तेव्हा प्रत्येक व्यक्ती हा स्वतःजवळ एक स्मार्टफोन वापरत होता, त्यांनी अश्या एका वेबसाईटचे निर्माण केले, ज्या वेब साईट चे नाव होते Paytm होते. जेथून प्रत्येक व्यक्ती आपले सर्व बिल्स ऑनलाईन भरू शकत होता, आणि सर्व पेमेंट सुद्धा ऑनलाईन करू शकत होता.
आणि आज भारतामध्ये असे काहीच व्यक्ती मिळणार नाही कि ज्याला Paytm विषयी माहिती नसेल,आज Paytm ची एक वर्षाची कमाई हि जवळपास करोडो रुपये आहे.
३) सचिन बंसल – Sachin Bansal
सचिन बंसल यांचा जन्म ५ ऑगस्ट १९८१ साली पंजाब च्या चंडीगड मध्ये झाला, त्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण हे सॉफ्टवेअर इंजिनीयरिंग मधून पूर्ण केले. बिन्नी बंसल त्यांचे एक चांगले मित्र होते, सुरुवातीला ते दोघेही AMAZON कंपनी मध्ये कार्यरत होते, पण तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला कि आपण स्वतःची एक ई-कॉमर्स कंपनी सुरु करावी. आणि त्यांनी AMAZON सारख्या एका मोठ्या कंपनीला सोडले आणि स्वतःच्या कंपनीला उभे करण्यासाठी प्रयत्न करू लागले.
तेव्हा असा काळ होता कि लोक विचार करत होते कि एखादी गोष्ट न पाहता अगोदरच कसे पैसे भरावे आणि वस्तू खराब निघाली तर काय कराव, त्यावर सचिन बंसल यांनी त्यांच्या Flipkart कंपनी मध्ये कॅश ऑन डीलीवरी चा पर्याय आणून ई-कॉमर्सच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती सुरु केली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाह्लेच नाही, आज त्यांची कंपनी जवळजवळ वर्षाला १ बिलियन डॉलर इतकी कमाई करते आहे. आणि हे आजच्या उद्योग क्षेत्रात खूप मोठे यश आहे.
४) श्रद्धा शर्मा – Shraddha Sharma
श्रद्धा शर्मा यांचा जन्म ६ जुलै १९८३ साली बिहार च्या पटना मधील एका छोट्या शहरात झाला आहे,त्यांनी दिल्ली मधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करत, मैरीलैंड इंस्टीट्यूट कॉलेज ऑफ आर्ट मधून त्यांनी आपले एम.बी.ए चे शिक्षण पूर्ण केले, तसेच ते आज च्या दिवशी एक महिला सशक्तीकरनाचे एक चांगले उदाहरण बनले आहे.
आज त्या Your Story च्या कार्यकारी अधिकारी आहेत, तसेच एक भारतीय रिपोर्टर म्हणून त्यांची चांगली ओळख आहे. आज त्या यशस्वी उद्योजकांच्या यादीत येतात.त्यांचे एक वाक्य मला आठवते त्या म्हणतात कि जी गोष्टी मिळत नाही तीच गोष्ट पळवते. एक महिला असूनहि न घाबरता त्यांनी आज मोठी उपलब्धी मिळवली हे महिलांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. आज त्यांची कमाई जवळ जवळ करोडो रुपये आहे.
अश्या स्त्री ला माझी मराठी चा मुजरा.
५) फणींद्र समा – Phanindra Samaj
फणींद्र समा यांचा जन्म १५ ऑगस्ट १९८० साली आंध्रप्रदेश मध्ये झाला, फणींद्र समा हे सुरुवातीपासूनच शालेय जीवनात हुशार होते, त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी येथून त्यांचे इंजिनीरिंग चे शिक्षण पूर्ण केले.
२००५-०६ मध्ये फणींद्र समा हे प्रवासासाठी जास्त बस चा उपयोग करत असत, एक दिवस ते प्रवासासाठी जात असताना त्यांची बस सुटून गेली. तेव्हा त्यांनी विचार केला कि हि समस्या मला आली तर प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी या समस्सेला सामोरे जावे लागत असेल.
तिथेच त्यांना एक कल्पना सुचली, व त्यांनी Redbus चे निर्माण करण्याचे ठरवले, पण सुरुवातीला त्यांना सुद्धा प्रत्येक व्यवसायासारखे काही कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला,पण त्यांनतर त्यांनी मागे न वळता आपला मार्ग चालू ठेवला आज फक्त भारतातच नव्हे तर भारत सोडून बाकी काही देशातहि Redbus चे जाळे पसरले आहे.
आपल्याला तर माहीतच असेल कि Redbus हे प्रवाश्यांच्या आणि बस यांच्या मधील एक दुवा बनलेल आहे. आज Redbus ची कमाई जवळजवळ ५९०-६५० करोड रुपये इतकी आहे.म्हणतात न जर एक वेळ एखादी गोष्ठ करायची ठरवली ना मग मागे पाहू नका त्याचप्रमाणे जसे ह्या सर्व उद्योजकांनी आपल्याला आलेल्या समस्सेतून लोकांसाठी उपाय काढता काढता आज भारतातील यशस्वी उद्योजकांच्या यादीत येऊन बसले,तसेच सर्व सामर्थ्य हे माणसाच्या आतमधेच असते गरज आहे फक्त त्या सामर्थ्याला जागे करण्याची.
तर आशा करतो मित्रहो आपल्याला आजचा लेख आवडला असेल, आपल्याला आजचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका.
आपला अमुल्य वेळ दिल्या बद्दल धन्यवाद !
Thank You So Much And Keep Loving Us!