Indian Railways Information
रेल्वेविषयी तर सर्वांनाच माहिती आहे, कारण आपल्या देशातील रेल्वेचे जाळे हे जवळ जवळ आशियातील सर्वात मोठे जाळे आहे. आपल्या संपूर्ण भारतात जवळ जवळ १७ वेगवेगळे रेल्वेचे विभाग आहेत. रेल्वे हे देशातील या प्रकारचे वाहतूक साधन आहे, जे दिवसाला हजारो किलोमीटर अंतर पार करत, प्रवाश्यांना त्यांच्या योग्य ठिकाणावर पोहचविण्याचे कार्य करते.
रेल्वेची रचना पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी चे डबे हे रेल्वेच्या मधोमध असतात, परंतु सामान्य डबे रेल्वेच्या सुरुवातीला आणि शेवटी असतात,असं का असेल बर, यामागचं नेमकं काय कारण असेल तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की जनरल डब्यांचे स्थान हे रेल्वेच्या सुरुवातीला आणि शेवटी का असते? तर चला पाहूया.
रेल्वेमध्ये जनरल डब्यांची जागा ही समोर आणि मागे का असते – Facts about Indian Railways in Marathi
यामागे एक कारण नाही तर अशे अनेक कारण आहेत ज्यामुळे जनरल डब्यांना पुढे आणि मागे ठेवल्या गेल आहे,
पहिलं कारण अस की जनरल डबे म्हणजेच रेल्वेचे सामान्य डबे हे आतून एकमेकांना जुळलेले नसतात
आणि जर हे जनरल डबे मधोमध ठेवले असते तर ते जुळलेले नसल्याने TTE / TC आणि पन्ट्रीकार वाल्यांना त्यांची सेवा देण्याकरिता एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता आले नसते.
TC / TTE यांना प्रत्येक स्टेशन ला उतरून तिकीट्स चेक करावे लागले असते, आणि यामध्ये खूप वेळ वाया गेला असता.
दुसरं कारण अस की जनरल डब्यांमध्ये चढण्यासाठी खूप गर्दी असते आणि या डब्यांना जवळ जवळ ठेवले असते तर प्लॅटफॉर्म वर गर्दी होऊन चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असती,
कारण जनरल डब्यांमध्ये जास्त प्रमाणात गर्दी असते.
आणि ही गर्दी एकाच ठिकाणी जमा होऊ नये म्हणून दोन्हीही जनरल डब्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या गेलं आहे.
म्हणजेच एक समोर आणि एक मागे.
त्यामुळे गर्दीचे विभाजन होत आणि प्लॅटफॉर्म कमी गर्दी पाहायला मिळते.
आणि तिसर कारण असं की प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि AC च्या डब्यांना प्रमुख प्राधान्य दिल्या जातं.
काही स्टेशन वर रेल्वेच्या लांबीपेक्षा प्लॅटफॉर्म ची लांबी कमी असते, मग ह्या प्रमुख प्राधान्य असणाऱ्या डब्यांना उतरायला प्लॅटफॉर्म मिळावा,
त्याचसाठी प्रथम आणि द्वितीय श्रेणींना मध्ये ठेवून जनरल डब्यांना समोर आणि मागे ठेवल्या जाते.
तर हे होते जनरल डब्यांना मागे आणि समोर ठेवण्या मागचे कारण.
आशा करतो आपल्याला हा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!