Exam Preparation Tips
परीक्षेचे ओझे हे जीवनात प्रत्येकाच्या वाटेला आले आहेच. परीक्षा आली कि काय करावे सुचत नाही कारण अभ्यासक्रम हा जास्त प्रमाणात असतो आणि वेळ कमी, मग अश्या वेळी काय करावे सुचत नाही, आणि अभ्यास करणे कंटाळवाने वाटते.
आपल्याला अभासाचा कंटाळा येत असेल तर आमचा आणखी एक लेख आहे त्या लेखाची मदत घेऊन आपण आपला कंटाळा दूर करू शकता,
“अभ्यासाचा कंटाळा येतोय! मग वाचा ह्या टिप्स कंटाळाच निघून जाईल”
पण या लेखात आपण पाहणार आहोत कि दुसऱ्या दिवशीच परीक्षा असेल तर अगोदरच्या दिवशी आपण काय करू शकता जेणेकरून आपला पेपर चांगला जाण्यास मदत होईल.
तसेच आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगले गुण मिळवण्यासाठी सुद्धा मदत होईल.
परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराल – Exam Preparation Tips in Marathi
चला तर जाणून घेऊया काही टिप्स!
१) अभ्यासाला उशीर करू नका – Do not delay the study:
परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी तसाच तर आपल्या जवळ खूप कमी वेळ असतो म्हणून आपण आपली वेळ जपून वापरावी.
जेणेकरून आपल्याला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
जेवढ्या लवकर अभ्यासाला सुरुवात करता येईल तेवढ्या लवकर अभ्यासाला सुरुवात करा. त्या थोड्याशा वेळेचा चांगल्या प्रकारे वापर करा.
आपला जसा वेळ जात राहील तसाच आपल्याला जास्त तणावाचा सामना करावा लागेल. म्हणून आपली वेळ वाया जाऊ देऊ नका.
२) आपण काढलेल्या नोट्स चे वाचन करून घ्या – Make Summary Points:
नोट्स म्हणजे प्रत्येक धड्यामधील काढलेले महत्वाचे मुद्दे होय. मग परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी त्या सर्व मुद्यांवर एक वेळ वाचन करून चांगल्या प्रकारे समजून घ्यावे ते आपल्याला आपल्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मदत करतील.
तसेच एक दिवसाचे वाचन हे दुसऱ्या दिवशी आठवण ठेवण्यासाठी सोपी जाईल.
३) वाचलेल्या नोट्स पेपर वर लिहून पहा – Write Points On Paper:
जे महत्वाचे प्रश्न असतील ते आपण पेपर वर सोडून पहावे. त्या प्रश्नांचा केलेला सराव आपल्याला आपल्या परीक्षेत आपले गुण वाढविण्यास मदत करतील. म्हणून ते सर्व प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करा, जे आपल्या नोट्स मध्ये काढलेले आहेत. त्यांना पेपर वर सोडवून पहा.
४) रात्री चांगले जेवण करा – Good Dinner:
रात्री झोपण्याच्या अगोदर चांगल्या प्रकारे जेवण करून घ्या, ज्यामध्ये हलक्या अन्नाचा समावेश असेल, रात्री जड अन्न घेऊ नका कारण आपल्याला जेवल्यानंतर लगेच झोपायचे नाही आहे, त्यासाठी आपण आपल्या जेवणात हलक्या अन्नाचा समावेश करू शकता.
५) नोट्स चे वाचन करून झोपा – Read Notes Before Sleep:
झोपायच्या अगोदर आपण एकवेळ आपल्या नोट्स वाचून झोपा, कारण असं म्हणतात कि जेव्हा आपण झोप घेतो तेव्हा आपला मेंदू कार्य करत असतो.
मग झोपायच्या अगोदर आपण आपल्या मेंदूला काही तरी काम देऊन झोपावे ते आपल्या साठी उत्तम राहील. रात्रीच्या वेळी आपला मेंदू अधिक कार्यशील होऊन कार्य करत असतो.
६) अलार्म सेट करून झोपावे – Set Alerm Before Sleep:
रात्री नोट्स वाचल्यानंतर झोपायच्या आधी सकाळचा अलार्म सेट करून झोपावे. त्यामुळे आपल्याrला सकाळी उठण्यास मदत होईल, परीक्षेच्या दिवशी आपल्याला सकाळी उठण्यास अलार्म आपली चांगल्या प्रकारे मदत करतो. आपण अलार्म न लावता झोपले तर सकाळी उशिरा उठून आपल्याला सर्व गोष्टी घाई घाईत कराव्या लागतील. त्यासाठी झोपायच्या आधी अलार्म सेट करून झोपावे.
७) पुरेशी झोप घ्या – Sleep Well:
परीक्षेच्या अगोदरच्या रात्री पुरेशी झोप घ्या. पुरेशी झोप घेतल्यामुळे तुमचा मेंदू कार्यरत राहील, जर तुम्ही अगोदरच्या दिवशी चांगली झोप घेतली नाही तर परीक्षेच्या दिवशी आपली चिडचीड होऊ शकते.
आणि त्याचा परिणाम आपल्या परीक्षेवर पडू शकतो.
म्हणून परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी पुरेशी झोप घ्या.
८) सकाळी उठल्यावर व्यायाम करावा – Do Exercise In The Morning:
परीक्षेच्या दिवशी सकाळी उठून फ्रेश झाल्यानंतर १०-१५ मिनिटे व्यायाम-प्राणायाम करावे. प्राणायाम तसेच व्यायाम तुम्हाला पूर्ण दिवसभर फ्रेश राहण्यासाठी मदत करतील. तसेच आपल्या शरीराला व्यायामाची आवश्यकता सुद्धा असतेच.
आपल्या मेंदूला अधिक कार्यशील ठेवण्यासाठी व्यायामाची आणि प्राणायामाची आवश्यकता असतेच. म्हणून सकाळी उठल्यावर दररोज व्यायाम करावा.
९) पुरेसा नाश्ता करून जा – Take Breakfast In The Morning.
जेव्हा आपण परीक्षेला जाणार असाल तेव्हा घरी पुरेसा नाश्ता करून जावे. पोट भरून केलेला नाश्ता आपल्याला परीक्षेला झोप आणू शकते.
त्यासाठी परीक्षेला जायच्या अगोदर पुरेसा नाश्ता करून जा.
पुरेसा नाश्ता आपल्याला फक्त भूक लागू नये यासाठी मदत करेल.
१०) ओवरलुक करून घ्यावे – Should Be Overlooked:
परीक्षेला जायच्या अगोदर आपल्या जवळ असलेल्या सर्व नोट्स ना पूर्णपणे ओवरलुक करून घ्यावे.
आपल्याला त्याची परीक्षेत मदत होईल, आपण परीक्षेत त्या मुद्यांना चांगल्या प्रकारे लिहू शकू.
तसेच सर्व मुद्दे आपल्या लक्षात राहायला मदत होईल. आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू परीक्षेला सोबत घेऊन जावे. (उदा.पाण्याची बॉटल, कंपास, पेन, पॅड, रुलर, पेन्सिल, रबर)
आजच्या लेखात आपण त्या गोष्टींवर उजेड टाकला ज्या गोष्टी परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी आवश्यक आहेत.
तसेच त्यामुळे आपली परीक्षा चांगली जाण्यास मदत होईल.
आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांपर्यंत या लेखाला शेयर करायला विसरू नका.
तसेच या लेखावर आपला अभिप्राय द्यायला सुद्धा विसरू नका. कारण आपला अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहे.
तसेच आपल्या येणाऱ्या परीक्षेला आमच्याकडून शुभेच्छा आपली परीक्षा चांगली जावो हि ईश्वरचरणी प्रार्थना!
असेच लेख जाणून घेण्यासाठी आंमच्या माझी मराठी ला भेट द्या.