Euclid Jivani
युक्लिड हे अलेक्झांड्रिया चे युक्लिड तसेच मेमारा चे युक्लिड या नावाने ओळखले जात होते. ते एक महान गणितज्ञ आणि भुमिती जॉ मेट्रीचे जनक मानले जातात. गणितीय शास्त्रातील त्यांचे योगदान अतुलनीय मानल्या जाते.
१९ व्या शतकापासुन ते २० व्या शतकातील त्यांच्या व्दारा लिखीत गणितीय पुस्तकांचा सर्वत्र उपयोग केला जातो. आजही त्याच्या सिध्दांताचा वापर करूनच विविध भुमितीय रचनांचा अभ्यास केला जातो.
तसेच विविध जगप्रसिध्द वास्तुंची निर्मीती केली गेली.
त्यांचे युक्लिडीयन ज्यामिती हे पुस्तक आजही संशोधक व गणितींना प्रेरणा देत आहे. युक्लिड यांनी दृष्टीकोन, शाक्व वर्ग गोलीय ज्यामिती संख्या सिध्दांत आणि भुमितीय सिध्दांताची निर्मिती केली होती.
भूमितीचा जन्मदाता महान युक्लीड यांचे जिवनचरित्र – Euclid Biography & Father Of Geometry
युक्लीड यांचे जीवन – Euclid life History in Marathi
युक्लिड यांच्या अस्तित्वाबाबत फार कमी माहिती उपलब्ध आहे.
इतिहासात त्यांच्या जीवनाबाबत कमी पुरावे आहेत त्यांच्या जन्माबाबत तारीख ठिकाण व तत्कालीन जीवनपध्दती बाबत फारच कमी पुरावे आहेत.
काही अभ्यासकांच्या माहितीप्रमाणे त्यांचे प्रारंभिक जीवन एका धनिक कुटूंबात व्यतीत झाले होते.
ते एक उत्तम अभ्यासक विदयार्थी होते. त्यांच्या बालपणीच त्यांनी विविध भुमितीय सिध्दातांची रचना केलेली होती.
त्यांच्या मृत्युबाबत अलेक्झांड्रिया च्या पप्पूस यांनी इ.स.पूर्व ३०० मध्ये आपल्या पुस्तकातील उल्लेखानुसार त्यांचा मृत्यु इ.स. पूर्व ४५० च्या आसपास झाल्याचे अंदाज बांधले होते.
प्रोक्लूस यांच्यानुसार युक्लिड यांचा संबंध प्लेटो यांच्याशी होता. त्यांच्या अनेक शिष्यांच्या मदतीने त्यांनी अनेक भौमितीक रचनांचे रहस्य समोर आणले प्लेटो यांच्या शिष्यांमध्ये च्निदूस यूडोक्सूस, केएटेतुस आणि ओपूस के फिलिप यांचा समावेश आहे.
प्रोक्लूस यांच्या मते युक्लिड त्यांच्यापेक्षा छोटे होते.
त्यांच्या मते ते मेली च्या काळात युक्लिड होते, आर्कमिडिज च्या काळातही त्यांचे वर्णन आहे.
प्रोक्लुस यांनी युक्लिड चे विस्तृत ज्ञान शब्दांच्या माध्यमातून सांगितले आहे,
यानंतर युक्लिड च्या अस्तित्वासंदर्भात चौथ्या शताब्दीत पप्पूस यांनी म्हंटले होते की अप्पोलानियस यांच्या लोकांनी एलेग्जाड्रियात युक्लिड सोबत बराच वेळ व्यतीत केला होता.
युक्लिड यांच्या प्रत्येक बोलण्यात एक सिध्दांत लपलेला होता. पप्पूस यांच्या मते ते इ.स.पूर्व ४५० ते ३८० च्या आसपास राहीले असतील.
त्यांच्या व्दारा रेखागणित व भुमिती हे शास्त्र उत्पत्तीस आले.
त्यांच्या अस्तित्वाबाबत फार कमी पुरावे उपलब्ध आहेत त्यांच्या व्दारा निर्मित सिध्दातांना आजही मान्यता दिली जाते.
आपल्या मानवीय इतिहासातील एक प्रख्यात शास्त्रज्ञ व भुमितीय शास्त्रांचे जनक म्हणून युक्लिड यांची गणना केली जाते.
तर हि होती संपूर्ण माहिती भूमितीचे जनक युक्लिक यांची आशा करतो हा लेख आपल्याला आवडला असेल
आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद!