My Favourite Bird Peacock Essay
मित्रांनो शाळेच्या परीक्षेत निबंध हा एक महत्वाचा भाग असतो, प्रत्येक परीक्षेत कुठल्याना कुठल्या विषयावर निबंध लिहिण्यासाठी सांगतात, शाळेत असतांना परीक्षेतच काय तर कुठल्या हि स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धा हि असतेच, हीच गोष्ट लक्षात ठेवून आम्ही आज आमच्या या लेखात “माझा आवडता पक्षी: मोर” या विषयावर निबंध घेऊन आलो, चला तर पाहूया.
“माझा आवडता पक्षी : मोर” निबंध – Essay on Peacock in Marathi
नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच……..
सर्वांनी ही कविता नक्कीच ऐकली किंवा गायली असेल. मोर एक छान, सुंदर, आणि आकर्षक पक्षी. सुबक आकार, रंगबेरंगी पिसारा, डौलात चालणारा हा पक्षी. शिवाय आपल्या ग्रंथ आणि पुराणांमध्येदेखील मोराचा उल्लेख आहे. माता सरस्वती आणि शिवपुत्र कार्तिकस्वामी यांचे वाहन म्हणजे मोर. भगवान श्रीकृष्ण यांचे डोक्यावर नेहमी मोरपंख दिसते.
मला मोर आवडतो या मागे अनेक कारणे आहेत. सर्वात प्रथम म्हणजे त्याचा रंग. गर्द निळ्या रंगाची त्याची मान, हिरवा आणि अनके रंगांनी सजलेले त्याचे पंख आणि विशेष आकर्षण म्हणजे त्याचा पिसारा आणि डोक्यावरील तुरा तसेच पिसाऱ्यावरील छान डोळे.
हा मोर जेव्हा गाणे गातो तेव्हा त्याचा आवाज खूप मनमोहक वाटतो. त्याच्या या गाण्याला ‘केकावली’ असे म्हणतात. एकंदरीत काय तर कितीही वर्णन केले तरी संपणार नाही असा एकमेव पक्षी म्हणजे मोर.
जेव्हा आकाशात ढग दाटून येतात आणि पाऊस पडण्याचे संकेत मिळतात, त्यावेळी मोर आपला पूर्ण पिसारा फुलवून छान नृत्य सादर करतो. यावेळी हा नजारा बघण्यासाठी खरोखरच नशीब असावं लागतं. मोर आपला पिसारा फुलवून मादीला म्हणजेच ‘लांडोर’ला आपल्याकडे आकर्षित करत असतो. लांडोरला मोरासारखा आकर्षक पिसारा नसतो. तसेच लांडोरचा रंग मातकट असतो.
मोर हा लहान-सहन किडे, कीटक, धान्य आणि फळ वगैरे खातो. इतर प्राणी आहे पक्षांपासून आपले रक्षण करण्यासाठी तो नेहमी उंच झाडावर राहणे पसंत करतो. तो जास्त वेळ उडू शकत नाही. परंतु जेव्हा धावण्याचा प्रश्न येतो तेव्हा तो खूप जलद गतीने धावतो.
मोर हा सहसा गट करून राहतो. या गटामध्ये एक नर तर ३ किंवा ४ मादी असू शकतात. शेतीचे नुकसान करणारे किट मोर खातो त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र देखील म्हणतात.
दरवर्षी मोराला नवीन पंख येतात. त्यामुळे अगोदरचे पंख गळून पडतात. या पंखांचा उपयोग अनेक सजावटीच्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. या पंखांपासून हातपंखे तयार करण्यात येतात. पंचकर्म क्रियांमध्ये मोरपंखांचा उपयोग केला जातो. असं म्हणतात कि पुस्तकात किंवा वहीमध्ये हे पंख ठेवल्याने सरस्वती माता प्रसन्न होते.
मोरपंख एवढे आकर्षक आहेत कि स्वतः मुघल बादशहा शाहजहान यांना देखील या पंखांचा मोह आवरला नाही. त्यांनी देखील स्वतः साठी मोराच्या पंखासारखे दिसणारे मयूरासन बनवून घेतले होते.
मोर हा भारतातील जवळपास सर्वच राज्यांत पाहायला मिळतो. मोर हा विशेषतः जंगलांमध्ये किंवा आरक्षित वनांमध्ये पाहायला मिळतो. पूर्वी सर्वत्र अगदी सहजपणे वावरणारे मोर आज पाहायला मिळत नाहीत. यामागचे कारण म्हणजे शिकार. काही मांसाहारी लोक केवळ आपली भूक क्षमविण्याकरिता पक्षांची शिकार करतात. त्यामुळे आज मोरांची प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
या आकर्षक पक्षाची दाखल भारत सरकारने देखील घेतली. मोराची अप्रतिम सुंदरता आणि त्याचे धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्व लक्षात घेता १९६३ सालापासून मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर मोरांच्या विलुप्त होत चाललेल्या प्रजातीचे संरक्षण व्हावे म्हणून १९७२ साली ‘मोर संरक्षण कायदा’ संपूर्ण देशभर लागू करण्यात आला. संपूर्ण भारतात मोराच्या शिकारीवर बंधन आहे.
तर अशाप्रकारे, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय महत्व मोराला देण्यात आलेले आहे. दिसायला सुंदर, आकर्षक आणि मनमोहक प्राणी जर कुणाला आवडत नसेल तर नवलचं!