Essay on Cricket in Marathi
माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध – Essay on Cricket in Marathi
खरं तर जगात अनेक खेळ खेळले जातात. यामध्ये फुटबॉल, बेसबॉल, बास्केटबॉल इ. खेळांचा समावेश होतो. परंतु या सर्व खेळांपैकी मला आवडणारा खेळ आहे क्रिकेट. होय, क्रिकेट. जरी हा खेळ इंग्लंड देशाचा राष्ट्रीय खेळ असला तरी भारतात मात्र या खेळाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
क्रिकेट हा केवळ खेळ नसून तो सामाजिक बांधिलकी जपणारा खेळ आहे. या खेळात ११ खेळाडूंचे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. संघातील ११ खेळाडूंपैके १ कर्णधार(Captain), १ यष्टी रक्षक(Wicket Keeper), काही फलंदाज (Batsman) आणि गोलंदाज (Bowler) असतात. प्रत्येक खेळाडू हा आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करतो.
खेळाची सुरुवात नाणेफेक(Toss) करून केली जाते. प्रत्येक संघातील कर्णधार नाणेफेक मध्ये सहभागी होतात. जो संघ नाणेफेक जिंकतो, त्याला फलंदाजी करण्याचा मान मिळतो. आणि दुसरा संघ गोलंदाजी स्वीकारतो.
खेळाचे नियम अगदी साधे आणि सोपे आहेत. फलंदाजी करणारा संघ जेवढी धावसंख्या(Run score) करेल त्यापेक्षा १ धाव शिल्लक विरुद्ध संघाने केली तेव्हा तो संघ विजयी होतो. सामना किती षटकांच्या असेल हे पूर्वनियोजित असते. प्रत्येक षटकात (Over) ६ चेंडू फेकले जातात. फलंदाजाला या चेंडूंवर धावा काढाव्या लागतात.
फलंदाजापासून ठराविक अंतरावर सीमारेषा (Boundry) आखलेली असते. फलंदाजाने फटका मारल्यानंतर चेंडू जमिनीला स्पर्श करत सीमारेषा पलीकडे गेल्यास चार धावा (Four) घोषित केल्या जातात. जेव्हा चेंडू जमिनीला स्पर्श न करता सीमारेषा पलीकडे जातो, तेव्हा सर्वाधिक ६ धावा (Six) घोषित केल्या जातात. अशाप्रकारे धावसंख्या गोळा केली जाते.
मैदानावर एका वेळी दोन फलंदाज फलंदाजी करू शकतात. विरुद्ध संघातील एक खेळाडू गोलंदाजी करतो आणि इतर खेळाडू क्षेत्ररक्षण(Fielding) करतात. धावसंख्या गोळा करत असताना फलंदाज बाद (Out) होऊ शकतो. बाद ५ प्रकारे केल्या जाते.
- बाद (Out) : गोलंदाजाने फेकलेला चेंडू यष्टीला स्पर्श केल्यास त्याला बाद ठरविण्यात येते.
- झेलबाद(Catch Out) : फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाडून हवेत झेलल्यास त्याला झेल बाद देण्यात येते.
- यष्टीचित (Out by Wicket keeper) : जेव्हा फलंदाज विशिष्ठ रेषेबाहेर जाऊन खेळतो तेव्हा यष्टीरक्षकाकडून त्याला बाद केल्या जाऊ शकते.
- धावबाद(Run Out) : धावा काढत असताना फलंदाज धावबाद देखील होऊ शकतो.
- पायचित (LBW) : चेंडूचा स्पर्श फळीला न होता जर फलंदाजाच्या पायाला झाला तर त्याला पायचित बाद दिल्या जाते.
सामन्या दरम्यान प्रत्येक नियमाचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पंच उपस्थित राहतात.
आपल्या देशात क्रिकेट एवढा प्रसिद्ध आहे कि कुणी क्रिकेट खेळले नसेल असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. अगदी गल्लीबोळात क्रिकेटपटू पाहायला मिळतात. त्यामागचे कारण म्हणजे या खेळाचे नियम अतिशय सोपे आहेत, शिवाय खेळासाठी केवळ एक फळी (Bat) आणि चेंडूची (Ball) गरज असते. राहिला प्रश्न खेळाडूंचा, तर अगदी २ खेळाडूसुद्धा हा खेळ खेळू शकतात.
हल्ली क्रिकेट हा खेळ राहिलेला नसून त्याने व्यवसायाचे रूप धारण केले आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची उलाढाल या खेळामध्ये होताना पाहायला मिळते. खेळाडूंची किंमत असो वा पारितोषिकाचे स्वरूप, क्रिकेटला चहूबाजूंनी सोनेरी किनार पाहायला मिळते.
क्रिकेट खेळल्याने अनेक फायदे आपल्याला आणि शरीराला होतात. प्रथमतः सांगायचे झाल्यास, सांघिक खेळ असल्याने संघिक कार्य करण्याची सवय होते. योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि समयसूचकता हे गुण अंगीकृत होतात. शिवाय मैदानी खेळ असल्या कारणाने, शारीरिक व्यायाम देखील होतो.
या सर्व कारणांमुळे मला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो.