काही महत्वाचे प्रश्न : (FAQs)
१. आपण पर्यावरणाचे रक्षण कसे करू शकतो ?
उत्तर : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी
- भरपूर झाडे लावावी
- प्रदूषण कमी करावे
- वन्यप्राण्यांचे रक्षण करावे
- पाणी जपून वापरावे
- कचरा करू नये इ. आपण करू शकतो.
२. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर : ५ जून.
३. पर्यावरण म्हणजे काय ?
उत्तर : आपल्या आजूबाजूला ज्या काही नैसर्गिक गोष्टी आपण पाहतो त्या सर्व गोष्टी म्हणजे पर्यावरण.
४. पर्यावरण आणि वातावरण मधील अंतर काय ?
उत्तर : पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आणि वातावरण म्हणजे पृथ्वी भोवतीचे वायूंचे आवरण.
५. पर्यावरण संरक्षणाची काय गरज आहे ?
उत्तर : आपण जे जीवन जगात आहे ते फक्त आणि फक्त पर्यावरणामुळे. जर आपण पर्यावरणाचे संरक्षण केले नाही तर आपले जीवन जगणे कठीण होईल. किंबहुना पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल.