Environment Slogan in Marathi
पर्यावरणाबद्दल आपण ऐकतो आणि बोलतो. पण पर्यावरण म्हणजे नेमकं काय? शाळेत, कॉलेजमध्ये किंवा इतरत्र आपल्याला पर्यावरणाचे महत्व सांगण्यात येते. कधी कधी तर आपल्याला पर्यावरण संवर्धनाचे घोषवाक्ये, फलक, आणि काही माहिती जमा करावी लागते.
तुम्हाला देखील या गोष्टींची आवश्यकता नेहमीच भासली असेल किंवा भासत असेल देखील. आज या लेखात आपल्याला या बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. सोबतच आपल्याला पर्यावरणाबद्दलचे भरपूर घोषवाक्ये आणि फलक सुद्धा दिसतील.
पर्यावरण संरक्षणाविषयी काही घोषवाक्ये – Environment Slogan in Marathi

“पर्यावरणाचे ठेऊया ध्यान, तेव्हाच बनेल देश महान.”
“वसुधैव कुटुम्बकम्”
“ना तुमचं, ना माझं, पर्यावरण आहे आपल्या सर्वांच.”
“गाव असो वा असो शहर, वाचविले पाहिजे पर्यावरण.”
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.”
Marathi Slogan on Environment
पर्यावरण म्हणजे जीवनाचा अविभाज्य घटक. आपण जे जीवन जगत आहोत, ते सर्व या पर्यावरणामुळे. आपल्या आजूबाजूला दिसणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे पर्यावरण. हा निसर्ग, झाडे, हवा, पाणी हे सर्व पर्यावरणाची रूपे.
या पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कारण जर पर्यावरण वाचेल तरच आपण जिवंत राहू.

“पर्यावरणाला वाचवूया, हेच अभियान चालवूया.”
“उठा जागे व्हा, वृक्षतोड थांबवा.”
“पृथ्वीची खरी संपदा, स्वच्छ जल, स्वच्छ वायू आणि स्वच्छ मृदा.”
“उज्ज्वल भविष्याचे एकाच धोरण, पर्यावरणाचे करा रक्षण.”
“या पर्यावरणाला स्वच्छ बनवूया, झाडे लावूया, झाडे जगवूया.”
Paryavaran Ghosh Vakya
पर्यावरणाचा ढासाळत चाललेला हा समतोल सांभाळणे आता आपली जबाबदारी आहे. जर आपण आज पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर भविष्यात आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील हे निश्चित.

“नका करू पर्यावरणाचा अपमान, नाही तर होईल सर्वांचे नुकसान.”
“पर्यावरणाला वाचवूया, पृथ्वीला जगण्यायोग्य बनवूया.”
“पर्यावरणाचा कराल नाश, तर होइर्ल सर्वनाश.”
“पर्यावरण संरक्षण काळाची गरज.”
“काम करा मोलाचे, पर्यावरण संवर्धनाचे.”
Paryavaran Sanrakshan Slogan in Marathi
पर्यावरण म्हणा किंवा निसर्ग, दोन्हींची गरज मनुष्य जातीला आहे. यांशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्यच आहे.
पर्यावरणाचा नाश होण्यामागे खूप कारणे आहेत. जसे कि, प्रदूषण, वृक्षतोड, लोकसंख्या वाढ, औद्योगीकरण इ. ही सर्व कारणे मनुष्यामुळे उद्भवलेली आहेत. याला जर आळा घालायचा असेल तर ते सुद्धा मनुष्यालाच करावे लागेल.

“वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण, या मुळे कमी होते प्रदूषण.”
“मुलांना द्या पर्यावरण रक्षणाची शिक्षा, हीच असेल आपल्या जीवनाची रक्षा.”
“करू नका दुर्लक्ष, पर्यावरण संरक्षणाकडे द्या लक्ष.”
“जर तोडून टाकले जंगल, तर होणार मनुष्याचे अमंगल.”
“कापडाची पिशवी घरोघरी, निसर्गाचे संरक्षण करी.”
Paryavaran Slogan in Marathi
आपण आज विकासाच्या नावाखाली मोठ-मोठे कारखाने उभारत आहोत. गगनचुंबी इमारती, मोबाईल टावर्स, रस्ते या सर्वांचे निर्माणकार्य होत आहे. हे निर्माणकार्य करण्यासाठी भरपूर प्रमाणात वृक्षांची तोड सुरु आहे.
याला प्रगती म्हणता येणार का? असच जर का सुरु राहिलं तर लवकरच आपल्याला भल्या मोठ्या विनाशाला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल.

“पर्यावरण वाचेल तरच जग वाचेल.”
“स्वच्छ पर्यावरणाशी नाते जोडुया, आजारांना हरवूया.”
“खरा-खुरा नारायण म्हणजे आपले पर्यावरण.”
“जर कराल पर्यावरणाची हानी, तर होईल जीविताची हानी.”
Paryavaran Slogan
पर्यावरण रक्षण काळाची गरज हे अगदी खर आहे. रक्षण म्हणजे काय ? तर जे काही निसर्गाची देन आपल्याला लाभली आहे, तिला सांभाळून ठेवणे. तसेच प्रकृतीला आपल्या कृत्यामुळे कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घेणे.

“पर्यावरणचा करूया सन्मान, कारण हेच आहे आपल्यासाठी वरदान.”
“झाडे लावा, देश वाचवा.”
“उज्ज्वल भविष्याची एकच हमी, प्रदूषण करा कमी.”
“पृथ्वी देते सर्वांना निवारा, प्रदूषणाला घाला आळा.”
A slogan on Environment in Marathi
पर्यावरण रक्षणासाठी सरकार जागरूक आहे. परंतू ही जबाबदारी फक्त सरकारचीच नाही. यासाठी आपण सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. आपण सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करावा लागेल.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावावी. शिवाय प्रदूषण कमी करण्यावर जोर द्यावा. फक्त झाडे लावून भागणार नाही तर, त्यांची काळजी आणि संवर्धन देखील करावे लागेल.

“करूया पर्यावरणाचे रक्षण, कमी करून प्रदूषण.”
“ठेऊया पर्यावरणाचे ध्यान, नाहीतर होईल आपलेच. नुकसान.”
“निरोगी असेल धरा तर सुख नांदेल घरा-घरा.”
“देईल आपल्याला औषध पाणी, पर्यावरणाची करा निगराणी.”
Slogans on Environment in Marathi Language
दरवर्षी ५ जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केल्या जातो. या दिवशी आपण पर्यावरण वाचवण्याची शपथ घेतली पाहिजे. प्रत्येकाने एक तरी झाड दरवर्षी लावले पाहिजे. सार्वजनिक वृक्ष लागवड, सामाजिक वनिकरण, स्वच्छता अभियान, प्रदूषण नियंत्रण यांसारखे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे.
चला तर मग निर्धार करूया पर्यावरण संवर्धनाचा. कारण आज जर आपण पर्यावरणाचे रक्षण केले तरच आपले भविष्य उज्ज्वल आहे.

“मुलांना द्या पर्यावरण रक्षणाची शिक्षा, हीच असेल आपल्या जीवनाची रक्षा.”
“नका करू निसर्गाचे हरण, या वाचवूया पर्यावरण.”
“जगाला समृद्ध बनवूया, चला पर्यावरण वाचवूया.”
“पर्यावरण वाचणार तरच मनुष्य वाचणार.”
पुढील पानावर आणखी…