Hatti chi Mahiti Marathi
हत्ती हा जंगलात राहणारा प्राणी आहे. हा जंगली प्राणी आकाराने अवाढव्य व बुद्धिमान असतो.
हत्तीची माहिती – Elephant Information in Marathi
हिंदी नाव : | हाथी |
इंग्रजी नाव : | ELEPHANT |
हत्ती जंगलातील सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. त्याला दोन मोठे सुपासारखे कान, एक आखूड शेपटी, दोन बारीक डोळे, एक सोंड असते ज्याच्या मदतीने तो झाडांच्या फांद्या, फळ, फुल तोडून खाऊ शकतो. तो आपल्या सोंडेचा वापर हात म्हणून सुद्धा करतो आणि धारदार सुळे असतात.
हत्तीचे अन्न – Elephant Food
हत्ती एक शाकाहारी प्राणी आहे. जंगली हत्ती हिरवे हिरवे गवत, झाडाची पाने, वेळूचे अंकुर खातात, तर पाळीव हत्ती गवत, चारा, नारळ, झाडाची पाने, कणकेचे रोट, ऊस, केळी, फळे इ. खातात. हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे.
हत्ती आपल्या सोंडेने लाकडाचे जड ओंडके उचलून नेऊन दुसऱ्या ठिकाणी वाहन नेवू शकतो, झाडाच्या फांद्या पटकन मोडू शकतो. त्याची सोंड इतकी बळकट आणि मजबूत असते, की त्या सोडेने हत्ती माणसालाही उचलू शकतो. हत्तीच्या सोंडेचा एक फटकारा म्हणजे जणू गदेचा प्रहारच होय.
हत्तीणीचा गर्भधारणेचा वेळ हा खूप जास्त असतो २२ महिने एवढा हा कालावधी असतो. हत्ती हा ५० ते ६० वर्ष जगू शकतो. भारतामध्ये हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
हत्तीचे वजन – Elephant Weight
हत्तीचे वजन ४००० किलो राहते. तर जन्माच्या वेळेस हत्तीच्या पिल्लाचे वजन १५० ते १८० किलो या दरम्यान राहते.
पूर्वी हत्ती राजे-रजवाड्यांत पाळले जात. हत्तीच्या प्रचंड शक्तीमुळेच त्याचा पूर्वी युद्धात वापर केला जात असे. हत्ती पाळणे, शिकार करणे, हत्तीवरून सैर करणे, हत्ती झुंजवणे हा राजे-रजवाड्यांचा शौक होता.
हत्तीला पाण्यात डुंबायला, एकमेकांच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवायला फार आवडते. तलाव, नदी, सरोवरे, या जागा हत्तीला फार प्रिय आहेत.
हत्ती कळपात राहतो. हत्तींच्या कळपाचे नेतृत्व मात्र चाणाक्ष व चतुर हत्तीण करत असते. शत्रूची चाहूल लागताच हत्तीण लगेच चीत्कार (आवाज करून ) करून साथीदारांना सावध करते.
हत्ती हा एक हुशार प्राणी आहे. बर्याच सर्कशी मध्ये हत्ती चा वापर करतात.
आशियात काम करून घेण्यासाठी हत्ती चा वापर केला जातो.
सोबतच हत्ती हा कृतज्ञ प्राणी आहे. त्याला माया-ममतेने वागवणाऱ्या व्यक्तीवर तो जिवापाड प्रेम करतो. स्वामिनिष्ठा हा त्याचा विशेष गुण आहे.
असा मंद चालीचा, बलवान व बुद्धिमान प्राणी मृत्यूनंतरही उपयोगी पडतो.
हत्तीचे दात म्हणजेच हस्तिदंतापासून अनेक मौल्यवान व शोभेच्या वस्तू तयार करतात. त्याला बाजारात भरपूर प्रमाणात मागणी असते.
नवरात्रात मुली पाटावर हत्तीचे चित्र काढून ते मध्यभागी ठेवून फेर धरतात व गाणी म्हणतात. याला “हादगा” म्हणतात.
भारतात हा प्राणी कर्नाटक, आसाम, बंगाल, उत्तर प्रदेश, करळ, तामिळनाडू इत्यादी राज्यांत आढळतो.