Eiffel tower – एफिल टॉवर फ्रान्स च्या पॅरीस शहरातील कॅंप दी मार्स परिसरात स्थापीत एक लोखंडी सळयांच्या जाळयांनी बनविलेले एक टॉवर आहे. या टॉवर चे एफिल हे नाव यास बनवणा-या व डिझाईन करणारे कंपनी चे मालक गुस्तावे एफिल यांच्या स्मरणार्थ ठेवले गेले आहे. ज्यांनी याच्या बांधकामाची पूर्ण जवाबदारी घेतली होती.
एफिल टॉवर चा इतिहास – Eiffel tower history information in Marathi
अॅपिल टॉवरचा सुझाव माॅरिस कोएचली आणि एमिले नौगूइयेर यांनी बनविलेल्या डिझाईन वरून अॅपिल यांना आला होता. अॅपिल यांनी अनेक डिझाईनवर स्थगिती दिल्यावर 1889 मध्ये एपिल यांनी आपले फाईनल डिझाईन तयार करून बांधकामास सुरूवात केली यावेळी फ्रान्समध्ये क्रांतीचा उत्सव साजरा होत होता. या डिझाईन ची तपासणी अनेक महानुभावांनीही केली त्यापैंकी काहींनी प्रशंसा तर काही लोकांनी याचा विरोध व आलोचना ही केली. परंतू जेव्हां हे टॉवर बांधुन पूर्ण झाले, सर्वांच्या मनात उतरले. आजही जगातून अनेक पर्यटक हयास बघण्याकरीता आतुर असतात.
मे 1884 मध्ये घरीच काम करतांना एपिल यांच्या जवळचे मित्र कोएचली यांनी एक साध्या जाळीदार टॉवरची रचना तयार केली ती एपिल यांना फारच पसंत पडली, त्यांनी याच डिझाईनला मान्य करीत टॉवर चे बांधकाम पूर्ण केले. काहींनी बांधकामावेळी आलोचनाही केली तर काही यांस खुश ही होते. पण जेव्हां हे टॉवर जसे जसे तयार होत गेले ते लोकांच्या मनात उतरत गेले.
या टॉवरच्या फायनल डिझाईन मध्ये वेळेवर काही बदलही केले गेले. त्याच्या मित्रांच्या व्दारा सर्व बदल त्यांनी मान्य करून शेवटी हे टॉवर उभे राहीले. हे टॉवर तयार झाल्यावर लोक वेडयासारखे याच्या खाली बरेच दिवस बसून यास बघत राहीले. या डिझाईन चे पेटेंट ही अॅपिल यांनी घेतले.
1885 च्या प्रदर्शनात त्यांनी याचे प्रदर्शन ही केले होते. या डिझाईन च्या मान्यतेसाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला होता. त्यांनी लोकांना सांगीतले की हे डिझाईन आधुनिक वास्तुशास्त्राचे प्रतिक बनेल तसेच हे जगात एक आदर्श प्रस्तापित करेल, त्याचे हे म्हणणे नक्कीच खरे ठरले. एफिल टॉवरची गणना आधुनिक जगातील सर्वश्रेष्ठ आश्चर्यात केली जाते.
1886 पर्यंत जुल्स ग्रेवी यांनी फ्रान्स च्या प्रेसिडेंट पदावर पूनर्नियुक्त झाल्या पर्यंतच्या टॉवरच्या डिझाईन मध्ये काही बदल करण्यात आले होते. त्यांनी पदभार सांभाळल्यानंतर 1 मे नियुक्तीच्या 2 महिन्यानंतरच राष्ट्रपती जुल्स ग्रेवियांनी एफिल टॉवरसाठी बजेट पास केले होते, त्यावेळी एफिल टॉवरमध्ये काही आवश्यक बदल करण्यात आले होते. अनेक बदलांनंतर कमीशन ने एफिल डिझाईनला मान्यता देत याच्या निर्माणाची परवानगी दिली. त्यानंतर टॉवर बांधायच्या जागेवरून वाद सूरू झाले.
8 जाने 1887 मध्ये टॉवर बांधकामाचे काॅण्ट्रॅक्ट रजिस्टर करून संबंधीतांचे हस्ताक्षर घेण्यात आले. यात एफिल यांचे कंपनी मालक म्हणून आणि त्यांना या बांधकामासाठी 1.5 मिलीयन फ्रांसिस रूपये देण्यात आले होते. टॉवरच्या एक्झीबिशन आणि विस्ताराचे प्रदर्शनातच या टॉवरने खुप रूपये कमावले होते. टॉवरच्या बांधकामा नंतर एफिल यांनी याच्या देखभालीसाठी आणि नुतनीकरणासाठी त्यांनी दुसरी कंपनी स्थापीत केली होती.
एफिल टॉवर विषयी महत्वाची माहिती – Important information about the Eiffel tower
2015 च्या सर्वे नुसार एफिल टॉवर पाहण्यासाठी जगात सर्वात जास्त सूमारे 6.91 कोटी लोक दरवर्षी यास भेट देण्यासाठी फ्रान्स ला येतात. या टॉवरची उंची 324 मीटर ( 1063 फूट ) आहे. याची उंची 81 मजल्या इमारती इतकी आहे. एफिल टॉवर फ्रान्स मधील पॅरिस शहरातील सर्वात उंच ईमारत आहे. याचा तळमजला वर्गाकार आहे, ज्याचा एक भाग 125 मिटर ( 410 फुट ) आहे. याचे निर्माण करतानाच याने या आधीची सर्वात उंच मानवनिर्मीत टॉवर वाॅशिंग्टन मोनुमेंट चा रेकाॅर्ड तोडला होता. या वर्षापर्यंत हा रेकाॅर्ड या टॉवर च्या नावावर होता. 1957 मध्ये एफिल टॉवरच्या सर्वात उंच भागावर आकाशीय प्रसारण होउ लागले होते. त्यानंतर याचे 5.2 उंच बांधकाम परत वाढविले गेले. सध्याच्या परिस्थितीत एफिल टॉवर मिल्लाउं वैडक्ट नंतर फ्रान्स मधील सर्वात उंच इमारत मानली जाते.
या टॉवर वर पर्यटकांसाठी फिरण्यासाठी 3 लेवल तयार केले आहे. ज्यामध्ये पहिल्या आणि दुस-या लेवल मध्ये एक विशाल रेस्टाॅरंट आहे. याच्या सर्वात उंच लेवलचे तळ 276 मीटर उंच मानले जाते. या टॉवरचे टाॅप पर्यटकांसाठी फारच रमणीय मानली जाते. यास चांगल्या प्रकारे सजवले गेले आहे. पहील्या आणि दुस-या लेवल पर्यंत जाण्यासाठी पर्यटकांना तिकीट घ्यावे लागते. खालुन ते पहिल्या लेवलपर्यंत जवळपास 300 शिडया आहेत. इतक्याच शिडया पहिल्या लेवल पासून ते दुस-या लेवल पर्यंतही आहेत. पर्यटकांसाठी लिफ्टची ही व्यवस्था करण्यात आली आहे.
एफिल टॉवर विषयी काही रोचक माहिती – Interesting facts about Eiffel tower Paris
- एफिल टॉवर पॅरिस मधील एक मुख्य आकर्षण आहे. जेथे दरवर्षी जवळपास 10 कोटी लोक यास बघण्यासाठी येतात.
- एफिल टॉवर ची लिफ्ट जवळपास एका वर्षात 103,000 किलोमिटर चा प्रवास करते. जो पृथ्वीच्या परिघाच्या 2.5 पटीने जास्त आहे .
- एफिल टॉवरच्या वरील लेवल पर्यंत चढून जाता येते. परंतू यासाठी आपणांस 1665 पाय-या चढून जाव्या लागतात. फार मोजके लोक या पाय-या चढून वर जातात.
- थंडीत हा टॉवर सुमारे 6 इंच संकूचीत पावतो.
- एफिल यांनी स्टॅचु आॅफ लिबर्टीच्या आंतरीक भागासही डिझाईन केले होते.
- याच्या उद्घाटनापासुन आजवर सुमारे 250 कोटी लोक यास बघण्यासाठी आले आहे.
- आज हे टॉवर दरवर्षी 6 कोटी लोकांचे स्वागत करते.
- हे जगातील सर्वात सुंदर टॉवर मानले जाते.
- यास बनण्यासाठी 2 वर्षे 2 महिने व 5 दिवस ऐवढा कालावधी लागला.
- जर्मन सेनेने आक्रमण केल्यावर याच्या सर्व लिफ्ट बंद करण्यात आल्या होत्या. जर्मन सेनेच्या सैनिकांनी यावर जर्मन झेंडा लावण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले.
- 7 वर्षात एकदा यास पेंट दिला जातो, ज्यामध्ये सुमारे 60 टन पेंट लागतो.
- या टॉवरला 1985 मधील बाॅंड चित्रपटात यावर चित्रीकरण करण्यात आले होते.
- बीटल्स च्या गाणे आय.एम.दी वाॅलरस मध्ये सेमोलिना पिलचाई यांना या टॉवरवर चढतांना दाखविले होते.
- जगात याच्या अनेक प्रतिकृती आहेत ज्यात लाॅस वेगास मध्ये आणि चिनमध्ये थिमपार्क मध्ये बनविण्यात आल्या आहेत.
- 2008 मध्ये एका महिलेने एफिल टॉवरसोबत विवाह करून स्वतःचे नाव बदलून एरिकाला टूर एफिल असे केले होते.
- टॉवरवर 18000 मॅटलीक सूटे भाग 92.5 कोटी रिबीट बसवण्यात आले आहेत.
- हे टॉवर उन्हाळयात सूमारे 6 ते 7 से.मी झूकते.
- ग्सूतावे एफिल यांनी तिस-या मजल्यावरील छोटासा भाग त्यांच्या मित्रांसाठी ठेवला होता जो आता पर्यटकांसाठी खूला आहे.
- एफिल टॉवर आणि मार्गारेट थॅचर यांचे उपनाम एकच आहे – ला डॅम दे फेर
- एफिल टॉवरवर आतापर्यंत 3000 कोटी फ्रान्सीस रूपये खर्च झाले आहेत.
- याला बघण्यासाठी 10% फ्रेंच, 8% स्पेन, इटली 7%, ब्रिटेन 7%, USA 5%, ब्राजील आणि जर्मनी 5% लोक दरवर्षी येतात.
- रात्रीच्या वेळी या टॉवरवर सूमारे 25000 लाईट बल्ब चमकतात यास रात्री बघण्याचा आनंद फार अविस्मरणीय असतो.
- फ्रान्सच्या क्रांतीस 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदोत्सवात यास बनविण्याची प्रेरणा मिळाली.
नक्की वाचा:
लक्ष्य दया : तुमच्या जवळ एफिल टॉवर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा एफिल टॉवर चा इतिहास – Eiffel Tower Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.
नोट: Eiffel Tower History – एफिल टॉवर या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.