प्रौढ शिक्षणावर आधारित घोषवाक्ये – Adult Education Slogans in Marathi
आपण जर प्रगत देशाचा विचार केला तर तेथील जास्तीत जास्त लोकसंख्या ही सुशिक्षित वर्गातील आहे. शिक्षणाने आपण तर मोठे होतोच शिवाय आपल्या देशाची प्रगती सुद्धा होत जाते. शिक्षणाचे महत्व दिवसांदिवस वाढतच चालं आहे. आजचे युग हे विज्ञान युग असल्याने सुशिक्षित असणे खूप महत्वाचे आहे.
सरकारचा भारत देशाला पूर्णपणे डिजिटल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आता सर्व ठिकाणी यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. जसे की, बैंक, दवाखाने, रेल्वे, बस, अश्या प्रकारे सर्वच सुविधा आता यंत्राच्या सह्याने देण्यात येणार आहेत. आपण जर अशिक्षीत असलो तर आपणाला त्यातलं काहीच कळणार नाही.
शिक्षण देती जीवना आधार त्याविन असे मानवी जीवन बेकार.
देशाने दिला शिक्षणावर जोर सर्व बालकांना आता शिक्षणाची ओळ.
शिक्षण हेच असे जीवनाचा खरा आर्थ त्याविना जीवन आहे व्यर्थ.
करू नका एकचं चूक शिक्षित करू आपले मुल.
सु:खी जीवन जगण्याचा एकचं नारा सुशिक्षित करूया समाज सारा.
साक्षर असता परिवार होई उद्धार पिढ्यांचा.
शिक्षित असता समाज देईल जीवना आधार.
शिक्षणाचा एकचं मंत्र शिक्षण देणे हे एकची तंत्र.
सुखी जीवन जगण्याचा एकचं मंत्र, शिक्षण घेणे हा कानमंत्र.
शिक्षणाने मानव सुज्ञ होतो, त्याला चांगल आणि वाईट यातील फरक समजतो. तसेच त्याची कोणी फसवणूक करू शकत नाही. आपल्या देशातील बहुतेक लोकसंख्या ही ग्रामीण भागात वास्तव करते, त्यामुळे ते लोक शिक्षणाल जास्त महत्व देत नाहीत. त्यांना जागरूक करण्याचे काम आता सरकार करीत असल्याचे आपल्या निर्दर्षानात येते.
शिक्षणामुळे आपल्या सोबतच आपल्या देशाची प्रगती होत असते. आपल्या यशस्वी जीवनाचा मूलमंत्र “शिक्षण” आहे. बालवयापासून शिक्षण मिळाल्यास बालकांच्या मनावर चांगले परिणाम होतात. शालेय जीवनातच आपल्यावर चांगले संस्कार घडवले जातात. त्यामुळे आपण वाईट वृत्तीपासून दूर जातो. आपलं हित कश्यात आहे याची समज आपल्यला होते.
शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान घेणे इतकेच नाही तर, आपण आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टी पासून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणे होय. शिक्षण हे आपण कधी आणि केंव्हाही घेऊ शकतो. शिक्षण घेण्याला कोणत्याच प्रकारची परिसीमा नाही. अगदी बालवयापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत आपण शिक्षण घेऊ शकतो.