Edmond Halley Information in Marathi
आपण शाळेत असताना विज्ञानात आपल्याला शिकविल्या गेले होते. एक असा धुमकेतू असतो जो ७६ वर्षातून एकदाच दिसतो तो एक धुमकेतू म्हणजे हॅले चा धुमकेतू. ७६ वर्षातून एकदा दिसणारा हॅले चा धुमकेतू आपल्याला सर्वांना माहितीच असेलच, या धूमकेतूला दर ७६ वर्षांनी पहिले जाऊ शकते, अशी भविष्यवाणी एका शास्त्रज्ञाने केली होती आणि ते शास्त्रज्ञ होते एडमंड हॅले.
तर आजच्या लेखात आपण एडमंड हॅले या शास्त्रज्ञाविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत, कि त्यांनी कशा प्रकारे जगाला माहिती नसलेल्या गोष्टी समोर आणल्या, आणि जगाला काही नवीन गोष्टींची ओळख करून दिली. तर चला पाहूया या शास्त्रज्ञाविषयी थोडक्यात माहिती.
एडमंड हॅले यांच्या विषयी माहिती – Edmond Halley Information in Marathi
एडमंड हॅले यांचे सुरुवातीचे जीवन – Edmond Halley Biography
एडमंड हॅले यांचा जन्म ८ नोव्हेंबर १६५६ रोजी इंग्लंडच्या शोरडिच शहरात झाला, त्यांना लहान पणापासून गणितात रुची होती, त्यांचे वडील हे साबणाचे विक्रेते होते, एडमंड हॅले यांनी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी च्या क्वींस कॉलेज मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले, जेव्हा त्यांचे पदवीचे शिक्षण सुरु होते तेव्हा त्यांनी सुर्मालेतील ग्रहांच्या विषयी व सौर गुणधर्म या विषयावर लिखाण केले होते,
१६७५ मध्ये त्यांनी ग्रीनविच ऑब्सरवेटरी मध्ये जॉन फ्लैमस्टीड यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवस काम केले, एडमंड हॅले यांनी २२ व्या वर्षी मास्टर डिग्री पूर्ण केली. त्यानंतर ते रॉयल सोसाइटी मध्ये संशोधक म्हणून निवडल्या गेले.
एडमंड हॅले यांनी सांगितले धुमकेतू विषयी – Halley’s Comet
एडमंड हॅले यांना खगोलशास्त्रात खूप जास्त रुची होती, ते खगोलशास्त्रात नवीन नवीन गोष्टींचा अभ्यास करत असत. खगोलशास्त्राचा अभ्यास करत असताना त्यांना काही गोष्टींची माहिती मिळू लागली,
तेव्हा त्यांच्या अभ्यासात एक गोष्ट समोर आली कि १६८२ ला एक धुमकेतू दिसला होता, आणि हाच धुमकेतू १४६५,१५३१, आणि १६०७ ला सुद्धा दिसला होता. पण या विषयी कोणत्याही वैद्यानिकांनी कोणत्याही प्रकारचे सखोल संशोधन केले नव्हते.
पण एडमंड हॅले यांनी यावर संशोधन केले आणि एक भविष्यवाणी केली कि येणाऱ्या १७५८ साली सुद्धा पुन्हा हा धुमकेतू दिसणार. पण काही दिवसानंतर १४ जानेवारी १७४२ मध्येच त्यांचे निधन झाले, पण खरोखरच १७५८ साली रात्री २ च्या सुमारास हा धुमकेतू दिसला. पण हा धुमकेतू पाहायला एडमंड हॅले जिवंत नव्हते.
त्यानंतर या धूमकेतूला एडमंड हॅले यांचे नाव देण्यात आले. तेव्हापासून दर ७६ वर्षानंतर हा धुमकेतू पाहिल्या जातो, आणि म्हणून या धूमकेतूला हॅले चा धुमकेतू म्हणून ओळखतात. हा धुमकेतू दर ७५-७६ वर्षांनी दिसतोच.
हॅले धुमकेतू दिसलेले वर्ष – Halley Comet Years of Appearance
हॅलेचा धुमकेतू त्यानंतर खालील वर्षी दिसला.
- १८३५ च्या नोव्हेंबर महिन्यात
- १९१० च्या फेब्रुवारी महिन्यात
- १९८६ च्या फेब्रुवारी महिन्यात
आणि पुढचा हॅलेचा धुमकेतू आता २८ जुलै २०६१ ला दिसणार आहे. अशी शक्यता वर्तविल्या गेली आहे.
तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!