Gadhava chi mahiti
आपल्या परिसरात अनेक प्रकारचे पाळीव प्राणी आढळतात, त्यापैकी गाढव हा एक प्राणी आहे.
गाढव प्राणी माहिती – Donkey Information in Marathi
हिंदी नाव : | गधा |
इंग्रजी नाव : | Donkey |
गाढवाला चार पाय, दोन डोळे, दोन कान व एक शेपटी असते. गाढवाची मादी एकाच वेळी एक किंवा दोन पिल्लांना जन्म देते. तिचा गर्भधारणाकाळ १५० दिवस असतो. गाढवाच्या पिलाला ‘तट्ट म्हणतात.
गाढवाचे विविध प्रकारचे रंग आढळतात; परंतु यात पांढरा, काळा हे रंग प्रामुख्याने आढळतात.
गाढवाचे अन्न – Donkey Food
गाढवाचे अन्न गवत हे आहे. तसेच इतर अन्नपदार्थ पण गाढव खाते, गाढव हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे.
गाढवाचा उपयोग :
गाढव कष्टाची खूप कामे करते. गाढव कामाला मजबूत पण स्वभावाने थोडे हट्टी व बुद्धीने मंद आहे. दगडी खलबत्ते, जाते बनविणाऱ्या जमातीकडे गाढवे पुष्कळ प्रमाणात पाळली जातात. दगडी खलबत्ते, जाते इ. वस्तू विकण्यासाठी त्यांना लांबपर्यंत जावे लागते. त्या वेळी वाहतुकीसाठी त्यांना गाढवांचा उपयोग होतो. फार पूर्वीपासून गाढवाचा उपयोग ओझी वाहण्यासाठी केला जात आहे.
कुंभार लोक गाडगी, मडकी तयार करण्यासाठी लागणारी माती गाढवाच्या पाठीवर वाहून आणतात. डोंगराळ भागात घोड्यांबरोबर गाढवांचा वापर ओझी वाहण्यासाठी केला जातो,